आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
वाढीव लॉकडाऊनमुळे सगळ्यात जास्त कोणाची अडचण झाली असेल तर ती फिटनेस फ्रिक लोकांची. कारण आता कोणत्याही वर्कआउट साठी सगळ्या जिम, फिटनेस सेंटर बंद आहेत.
सोशल डिस्टन्ससिंगचे पालन व्हावे आणि कोरोनाव्हायरसची चेन ब्रेक व्हावी या एकाच कारणामुळे सगळ्या जिम्स आणि फिटनेस सेंटर बंद आहेत.
परंतु त्यामुळे जे रोज नियमित जिम किंवा फिटनेस सेंटर, झुंबा क्लासेस यासाठी जायचे, आणि आपला एक्झरसाइज पूर्ण करायचे, त्या लोकांना आता घरात बसून राहावे लागत आहे.
म्हणूनच अशा लोकांसाठी काही ऑनलाईन पर्याय सध्या उपलब्ध होत आहेत त्याचा जर वापर सगळ्यांनी केला तर व्यायामाची काळजी करायची गरज नाही.
घरच्या घरी देखील अनेक प्रकारे व्यायाम करता येईल आणि आपलं शरीर तंदुरुस्त ठेवता येईल असेच काही ऑप्शन्स आज पाहुयात. आणि विशेष म्हणजे यासाठी वेगळे पैसे भरायची गरज नाही.
फक्त एका क्लिकवर तुम्हाला अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. काहीकाही फिटनेस सेंटर, जिम यांनी एकत्र येऊन असे उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामध्ये एक महिन्यासाठी फ्री ट्रायल देण्यात येते.
ऑरेंज थेरी:
कार्डियो एक्सरसाइज साठी प्रसिद्ध असलेली हे क्लासेस. ज्यामध्ये हार्ट रेट वर नियंत्रण मिळवण्यासाठी कशा प्रकारचा व्यायाम आवश्यक आहे हे तिथं सांगितलं जातं.
परंतु सध्या covid-19 च्या प्रकोपामुळे याचे क्लासेस बंद आहेत. म्हणूनच ऑनलाइन ऑप्शन त्यांनी सर्वांसाठीच सुरू केला आहे. ज्यामध्ये दररोज तीस मिनिटांचा व्यायाम सांगितला जातो.
यासाठी कोणत्याही वेगळ्या इक्विपमेंटची आवश्यकता नाही. तिथला इन्स्ट्रक्टर तुम्हाला घरातल्या वस्तू वापरून वेगवेगळ्या प्रकारे कसा व्यायाम करायचा याचे प्रात्यक्षिक देतो.
बॅरिज:
हे फिटनेस सेंटर दिवसातून दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज सांगतात. ज्यामध्ये शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते व्यायाम आवश्यक आहेत ते सांगितले जाते.
रंबल:
हा एक प्रसिद्ध बॉक्सिंग स्टुडिओ आहे. सध्या सगळ्या समाजातील लोकांची प्रकृती ठीकठाक राहावी म्हणून ते दररोज सकाळी इंस्टाग्रामवर फिटनेसचे लाइव्ह व्हिडीओज शेअर करत आहेत.
ज्यामध्ये मुख्यतः कार्डियो आणि वेटलॉस बद्दल एक्झरसाइज सांगितले जातात. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जाऊन त्यांचे दररोज आणि ऑनलाईन क्लासेस कधी आहेत हे पाहता येईल.
टोनिंग अँड डान्सिंग क्लासेस
टोन इट अप :
या डान्सिंग क्लासेसचे करीना आणि कटरीना या दोघी फाउंडर आहेत. सध्या हे क्लासेस देखील तीस दिवसांसाठी सगळ्यांनाच फ्री ट्रायल देत आहेत.
सध्या बरेच लोक या क्लासेसचे मेंबर्स आहेत. दररोज टोन इट अप या ॲप वर दहा ते चाळीस मिनिटापर्यंतचे वर्कआउटचे व्हिडिओज शेअर केले जातात.
त्यांच्या @ToneItUp या इंस्टाग्राम अकाउंट वर करीना आणि कटरीना लाइव्ह देखील येत असतात.
पी वॉलव्ह(P.volve):
या फिटनेस सेंटर ने देखील सध्या ३० दिवसांसाठी नवीन मेंबर्सना फ्री स्ट्रीमींग ट्रायल दिले आहे. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त वर्कऔटस उपलब्ध आहेत. ONEPVOLVE हा कोड वापरून त्याचे फ्री ट्रायल चालू करता येतात.
इंस्टाग्राम आणि युट्युब वर याचे दिवसातून (सकाळी ८ वाजता दुपारी १वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता) तीनदा अपडेट येतात.
305 फिटनेस:
हा न्यूयॉर्क मधला सगळ्यात प्रसिद्ध कार्डियो फिटनेस सेंटर आहे. आणि सध्या covid-19 चा जो अक्षरशः प्रकोप न्यूयॉर्कमध्ये उडालेला आहे.
म्हणून सध्या हे सेंटर बंद आहे. म्हणुनच त्याचे फाउंडर सादी कुर्झबान यांनी दिवसातून दोनदा कार्डियो डान्सचे फ्री स्ट्रीमींग युट्युब वरून देत आहेत.
योगा क्लासेस
कोअर पावर योगा:
काही काही जण एक्स्ट्रीम लेव्हल्सचे वर्कआउट करण्यापेक्षा स्ट्रेचिंग आणि मेडिटेशन करण्यावर भर देतात. अशा लोकांना योगा करायला आवडतो देखील.
त्या लोकांसाठी देखील आता ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहे. कोअर पॉवर योगा यांच्याकडून दररोज सध्या लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे योगा क्लास घेतले जातात.
ज्यामध्ये २० ते ६० मिनिटांचे पॉवर योगा शिकवले जातात शिकवले. सध्या तरी मेम्बर नसलेल्या लोकांना देखील ठराविक वेळी करिता या अॅपवर एक्सेस उपलब्ध आहे त्यामुळे याचा लाभ घेता येऊ शकतो.
लुलू लेमन:
हा खरंतर स्पोर्ट्स च्या कपड्यांचा ब्रँड. पण आता यांनीदेखील योगा, वर्काऊट, मेडिटेशनचे इंस्टाग्राम वर ऑनलाईन क्लासेस चालू केले आहेत.
याशिवाय skyting आणि Y7 yoga यांचेदेखील ऑनलाइन योगा क्लासेस सध्या सगळ्यांसाठीच उपलब्ध आहेत.
याशिवाय काही सेलिब्रिटी ट्रेनर क्लासेस सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत.
डॉन सोलादिन:
हा सेलिब्रिटींचा पर्सनल ट्रेनर आहे. आणि ड्रायव्ह हेल्थ क्लबचा मालक. सध्या याच्याकडून चार आठवड्यांचा बॉडी वेट ट्रेनर प्रोग्राम देण्यात आला आहे, जो ऑनलाइन उपलब्ध आहे.
जो तुमच्या घरामध्ये कोणत्याही साधनांशिवाय करता येणे शक्य आहे. सालोदिन दररोज स्वतः इंस्टाग्राम वर आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो आणि आणि त्यांना वीस ते तीस मिनिटांसाठी बॉडी वेट प्रोग्राम सांगतो.
फिट बॉडी:
इंस्टाग्राम फिटनेस गुरु ऍना विक्टोरिया आपल्या ॲप वर फ्री वर्कआउट वर प्रोग्राम देत आहे. प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी लागणारा कोड म्हणजे DAJEITALIA. हा कोड वापरून सध्या एक महिन्याचं फ्री मेंबर्शिप मिळत आहे.
हॉट पायलेट्स:
ही हैली बीबर आणि सेलेना गोमेज सारख्या सेलिब्रिटींची ट्रेनर आहे. सध्या तिने तिच्या यूट्यूब चैनल वर संपूर्ण वर्कआउट चे रुटीन दिलेले आहे.
पेले टोन:
घरामध्ये व्यायामाच्या सायकलसाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने ह्या ९० दिवसांचे फ्री ट्रायल आपल्या ॲप वर दिले आहे. ज्यामध्ये वर्कआउट, योगा, स्ट्रेंथनिंग, सायकलिंग, रनिंग, मेडिटेशन याबद्दल मार्गदर्शन केले जाते.
रेडीम फिटनेस :
यांनी खास महिलांसाठी सध्या स्ट्रेंथनिंग, डान्स, गरोदरपणातील व्यायाम, कोअर फिटनेस आणलेल्या आहेत. सध्या त्यांचेही ३० दिवसांचे फ्री ट्रायल उपलब्ध आहेत.
प्लॅनेट फिटनेस:
सध्या त्यांच्या फेसबुक पेजवर दररोज वर्कआउट व्हिडिओज पोस्ट करत आहेत. त्यांचे फिटनेस ट्रेनर त्याचे ट्रेनिंग देत आहेत.
YMCA:
ही नवीनच फ्री ऑनलाइन सर्विस सुरू झाली आहे. त्यामध्ये ग्रुप एक्सरसाइज घेतला जातो. ज्यामध्ये योगा बरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील काही काही एक्सरसाइज आहेत.
असे अनेक ऑनलाईन पर्याय सध्या उपलब्ध आहेत त्यातला कोणता आपल्याला सूट होतो हे पाहून त्याप्रमाणे वर्कआउट करता येईल, आणि आपली तंदुरुस्ती ठेवता येईल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.