Site icon InMarathi

नावाजलेल्या तज्ज्ञांकडून घरबसल्या “लेखन”शैली आत्मसात करा! तुमचं लेखन बहारदार करण्याची संधी सोडू नका…!

sanvedan author workshop featured image inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“संवेदन”ची ऑनलाइन लेखन कार्यशाळा!

बारा दिवस – बारा मान्यवर लेखकांकडून शिकायची संधी!

फी केवळ एक हजार रुपये!

 

 

मित्रांनो, आपण जाणतो की ह्या लॉकडाऊन पश्चात जग प्रचंड बदलणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सने अनेक बदल आणले आहेत त्यांचा वेग ह्या करोनाने आणखी वाढवला आहे. ह्या परिस्थितीत लेखन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की, ना कोणती साथ त्याला अडवू शकते ना आर्टिफिशल इंटेलिजन्स!

मित्रांनो ओरिजनल कंटेटला जागतिक बाजारपेठेत आज कल्पनाही करता येणार नाही इतकी किंमत आहे.

जेफ बजोज हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस अमेझॉन ही त्याची कंपनी, त्यांनाही मनोरंजन क्षेत्रात यायची गरज का वाटत असावी?

अगदी लॉक डाऊनच्या काळात जिथे सर्व काही ठप्प आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग कंपन्या नेटफ्लिक्स, अमेझॉनप्ले नवं-नवे व्यावसायिक विक्रम प्रस्थापित करत आहेत.
एकवेळ अशीही येईल जिथे ऍनिमेशन ने पूर्ण चित्रपट बनेलही. ना शुटिंगची गरज लागेल ना कलाकारांची.

मात्र ह्या मनोरंजन उद्योगाचा एक असा पाया आहे. त्याला तुम्ही कधीही हलवू शकणार नाही. तो म्हणजे लेखक!

कारण त्यासाठी आयुष्य जगावं लागतं. जगलेलं मांडता यावं लागतं आणि त्या मांडण्याच्या कलेतून मनोरंजक पद्धतीने सादरीकरण करावं लागतं. उपजत लिखाणाची आवड-कल असू शकतो.

पण हिऱ्यालाही पैलु पाडल्या याशिवाय किंमत येईल का? तसंच लेखनाचं ही आहे. लेखन कला हा विषय चिकाटीचा, कल्पकतेचा आणि तितकाच मेहनतीचा ही आहे.

ह्या लेखनासाठी आपला दृष्टिकोन काय असावा?

पटकथा लेखन आणि त्याचे टप्पे, गीत लेखन, कथा लेखन, टीव्ही सिरियल साठी लेखन, चित्रपट , नाटक किंवा अगदी वेब सिरिजसाठीच लेखन. अगदी ऑनलाइन पोर्टलससाठी लेख लिहिणे हा ही एक मोठा उद्योग होऊ पाहतो आहे.

हे कसं केलं जातं, हे आपण शिकणार आहोतच, पण त्याच बरोबर ह्या क्षेत्रात येउ पाहणाऱ्यांनी आपल्या बुद्धीची मशागत कशी करावी? त्यासाठी सराव काय आणि कसा करावा? ह्या सगळ्या बाबतही मार्गदर्शन मिळेल. त्याच बरोबर तुमच्या मनातले प्रश्न ही तुम्ही थेट विचारू शकाल, तेही तुमच्या आवडत्या ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांना!

ते ही एक दोन नव्हे, तर तब्बल बारा तज्ज्ञ आपल्या भेटीला येत आहेत!

लेखक होण्यासाठी त्यांनी जे केलं ते आपल्या सगळयांना सांगतीलच आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं ही देतील!

 

आपले मार्गदर्शक असणार आहेत :

१) रोहिणी निनावे

 

दामिनी ते अवंतिका, नवऱ्याची बायको ते मोलकरीण बाई आणि आई कुठे काय करते अशा मराठीत, तर हिंदीत यहाँ में घर घर खेली, बाजीगर अश्या अनेक मालिकांसाठी दहा हजाराहून अधिक एपीसोड लिहिलेल्या लेखिका.

२) श्रीकांत बोजेवार

 

एक हजाराची नोट, तहान, लोणावळा बायपास अशा अनेक चित्रपटासाठी लेखन, लोकसत्तासाठी चित्रपट समीक्षक म्हणून तसेच दोन फुल एक हाफ, तंबी दूराई या गाजलेल्या सदरासाठी लेखन, सध्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये कार्यरत.

३) अभिजित गुरू

 

अवघाची संसार,देवयानी, लक्ष,नकुशी, नकळत सारे घडले, माझ्या नवऱ्याची बायको, रंग माझा वेगळा अश्या अनेक मालिका तर तळ्यात मळ्यात, तीन पायांची शर्यत, आणि अलीकडेच गाजलेल्या ‘थोडं तुझं थोडं माझं’ ह्या नाटकाचे लेखक.

४) शिरीष लाटकर

 

गोजिरी, मितवा, सविता दामोदर परांजपे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटासाठी लिखाण. कृपासिंधु, साईबाबा,स्वामी समर्थ अश्या छत्तीस मराठी तर पवित्र रिश्ता,क्राईम पेट्रोल,सरोजिनी अशा अठरा हिंदी सिरियलसाठी बारा हजाराहून अधिक एपीसोड, बुढा होगा तेरा बाप, कोण कोणासाठी अश्या अनेक गाजलेल्या नाटकांचे लेखक.

५) वैभव जोशी

 

आनंदी गोपाळ,पांघरूण, AB आणि CD, मन फकिरा, मी पण सचिन, धप्पा, अधम, 66 सदाशिव अश्या कैक चित्रपटांसाठी गीतकार. मी… वगैरे या हा कविता संग्रह तर सोबतीचा करार हा त्यांचा कवितांचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे.

६) सौमित्र पोटे

 

चित्रपट समीक्षक, कलाकार-दिग्दर्शका समवेत लाईव्ह समीक्षेचे प्रयोग करणारा पहिला समीक्षक. ABP माझासाठी समीक्षक व पत्रकार म्हणून कार्यरत. ‘पुस्तकातून’ ह्या गाजणाऱ्या ब्लॉग साठी लेखन.

६) समीर गायकवाड

 

सत्तेचाळीस लाखाहून अधिक वाचक असलेल्या ब्लॉगसाठी लेखन. ऑनलाइन कंटेंटसाठी गाजणारा लेखक.

‘गावाक्ष’ हे लोकसत्तासाठीतर दिव्यमराठीसाठी ‘प्रिझम’, ‘पोएसी’, देशभरातील वेश्यांच्या आयुष्यवर ‘रेड लाईट डायरीज’ लोकमतसाठी. याशिवाय दैनिक सामना, एबीपीमाझा वाहिनीकडून सर्वोत्कृष्ट ब्लॉगरचा पुरस्कार व वाहिनीच्या पोर्टलवर दोन वर्षे ब्लॉगलेखन.

८) आशिष पाथरे

 

दिल दोस्ती दुनियादारी,असा मी तसा मी, हास्य सम्राट, मालवणी डेज, महाराष्ट्राचा सुपरस्टार, अस्सल पाहुणे इरसाल नमुने, दोन स्पेशल, सह्याद्री अंताक्षरी,कॉमेडी सर्कस, फ्रेशर्स, मोगरा फुलला, अश्या अनेकावीध मालिकांसाठी. गुरू, उर्फी, हुतुतू या चित्रपटांसाठी आणि अनेक अवॉर्ड फंकशन्ससाठी लेखन. मेरी सपनो की रानी हे नाटक.

९) गणेश पंडित

 

स्पंदन, तुझे नी माझे घर श्रीमंतांचे, खेळ मांडला, जागो मोहन प्यारे अश्या अनेक मालिकांसाठी लेखन. हंगामा, फिर हेरा फेरी, सदरक्षणाय,लव्ह यु जिंदगी, हिचकी, नुकत्याच गाजलेल्या मेकअप या चित्रपटांसाठी लेखन.

योलो या वेब सिरीजचे लेखन. प्रोमो रायटिंग आणि अनेक कार्टून सिरीजसाठी लेखन.

१०) मनीषा कोरडे

 

तुम, व्होडका डायरीज,कुस्ती, भुलभुल्लया, बिल्लू, ढोल अश्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी लेखन. परछाई वेबसिरीजसाठी लेखन.

११) अंबर हडप

 

असंभव ते सध्या गाजत असलेल्या ‘समांतर’ अशी प्रदीर्घ लेखन कारकीर्द! बालक-पालक, रंपाट, हिचकी,बंध नायलॉनचे, बाळकडू, येल्लो,अंड्याचा फ़ंडा, चिवित्रच सारे, एक दुसरे के लिये अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी लेखन.

१२) क्षितिज पटवर्धन

 

YZ, डबल सीट, क्लासमेट,टाईम प्लिज, लग्न पहावे करून, टाईम पास, संतरंगी रे या गाजलेल्या चित्रपटांचे लेखक.

दिनांक ११ मे ते २३ मे रोज सायंकाळी सहा ते आठ ह्या वेळेत फेसबुक प्रायवेट ग्रुपच्या माध्यमातून ही कार्यशाळा लाइव्ह होईल, कोणी अगदी त्यावेळेत नाही पाहू शकलं, तर तुमच्या सोई प्रमाणे ३० मे पर्यंत तुम्ही राहिलेली सत्र ही पाहू शकाल.

अगदी तुम्हाला आवडलेलं सत्र परत-परत ऐकून त्याच्या नोट्सदेखील काढू शकाल!

मुंबई-पुण्या बाहेरील लेखकांसाठी तर तज्ज्ञांकडून शिकण्याची ही सुवर्णसंधीच आहे…!

शिवाय काही नमुना पटकथाही अभ्यासासाठी प्रत्येकाला दिल्या जातील.

ह्या बारा दिवसाच्या उपक्रमाची फी केवळ १ हजार रुपये ठेवलेली असून, ६ मेच्या आत नोंदणी करणाऱ्यांना अर्ली बर्ड 10% सवलत ही देण्यात येईल व फी केवळ 900 ₹ असेल.

६ मे नंतर प्रवेश घेणाऱ्यांना मात्र १ हजार ही फी लागू राहील.

हजारो-लाखो रुपये घेऊन जे ज्ञान दिलं जातं ते ऑनलाइन अगदी सामन्यातील सामान्य माणसालाही परवडेल अश्या किमतीत देण्यासाठी संवेदन रायटिंग अकॅडमी झटते आहे.

आपल्या ओळखीच्या, चांगलं लिहिणाऱ्या, लिहू शकणाऱ्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवायला विसरू नका.

ह्या कार्यशाळे बाबत अधिक माहिती आणि नोंदणी बाबत आपण आजच 7715830574, 7715901298, 8668336768 ह्या क्रमांकांवर संपर्क साधू शकता!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version