Site icon InMarathi

नोकरदार असो वा व्यावसायिक, नेहमी उभ्या रहाणाऱ्या “या” समस्येवर तातडीने तोडगा काढा…अन्यथा…

swades shahrukh window scene inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण सर्वजण खूप व्यस्त आहोत.

आपल्याला या जगात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक संकटांना सामोरं जाव लागतं, अनेक जबाबदाऱ्या सांभाळून कामावर देखील लक्ष केंद्रित करावं लागतं.

 

office space software

 

मग अशावेळी आपण लहान लहान गोष्टींची देखील चिंता प्रमाणाच्या बाहेर करतो आणि आपले मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो.

या युगात टिकण्यासाठी, आपले स्थान निर्माण करण्यासाठी, आपले मानसिक स्वास्थ्य सर्वात जास्त गरजेचे आहे या गोष्टीची जाणीव आपल्या सर्वांना असायला हवी.

छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करणं सहाजिक आहे पण या गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडत असतो.

 

robert half

 

चला तर मग जाणून घेऊयात या छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करणे कसे थांबवायचे.

आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या चिंता त्रस्त करत असतात.

कोणाचं विजेचे बिल भरायचं राहिलं असेल किंवा कोणाची नोकरीसाठी मुलाखत असेल या सगळ्या चिंतांना आयुष्यामध्ये आपल्याला रोजच तोंड द्यावे लागणार आहे.

परंतु काहीजण या गोष्टींची जास्त प्रमाणात चिंता करत असतात आणि त्यामुळे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या या अडचणी आपल्याला संकट वाटू लागतात.

नेहमीच काळजी केल्यामुळे, नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असतो.

 

 

अशा गोष्टींमुळे तुमचे मानसिक संतुलन ढळू शकते, तुमच्यातील अस्वस्थता देखील वाढू शकते, डोकेदुखीचे प्रमाण वाढू शकते आणि या गोष्टींमुळे तुम्ही कामावर देखील लक्ष केंद्रित करू शकणार नाही.

जर तुम्ही तुमचं कामच योग्य पद्धतीने करू शकत नसाल तर अशा चिंतेचा काय फायदा? बऱ्याच व्यक्तींना असे जाणवते की व्यर्थ चिंता करणे या गोष्टीची त्यांना मानसिक सवय जडलेली आहे परंतु प्रत्यक्षात असे काही नसल्याचे विज्ञान सांगते.

काही गोष्टींची काळजी घेतल्यामुळे. तुम्ही तुमच्या या सवयी नक्कीच मोडून काढू शकाल.

लहान गोष्टींची चिंता करणं कोणीही अचानक थांबवु शकत नाही त्यासाठी प्रत्येकालाच वेळ लागेल. या सवयीतून बाहेर पडण्यासाठी खाली काही उपाय दिलेले आहेत.

1. तुमचे वेळापत्रक तयार करा

जेव्हा तुम्ही अनेक लहान गोष्टींची चिंता करत असाल त्यावेळी तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामामध्ये देऊ शकणार नाही आणि पर्यायाने चांगल्या पद्धतीने काम देखील पूर्ण होणार नाही.

 

cottons coprate fianace

 

तुमचा मेंदू नेहमीच कामाकडे दुर्लक्ष करत राहील अशा परिस्थितीत जर तुम्ही चिंता करणे थांबवू शकत नसाल तर तुम्हीच त्या गोष्टीसाठी एक विशिष्ट वेळ स्वतःला द्या आणि त्या वेळेमध्ये तुमच्या समस्यांचा विचार करा.

यामुळे तुम्ही इतर वेळी तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कामाला देऊ शकेल आणि तुमचा मेंदू कामाकडे दुर्लक्ष देखील करणार नाही.

2. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा

जर तुम्हाला तुमच्या चिंतांचा त्रास होत असेल तर त्या गोष्टींची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल.

 

alternate.org

 

म्हणजे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची गरजेपेक्षा जास्त चिंता करत असाल तर त्या चिंतेचे परिणाम आणि ती चिंता किती लहान गोष्टीची आहे याचा विचार करा यामधून तुम्हाला एक सकारात्मक उत्तर मिळेल.

आणि तुम्ही त्या अनावश्यक चिंतेतून नक्कीच बाहेर पडाल.

3. चिंतेचे वर्गीकरण करा

आपल्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींची काळजी आपण विनाकारण करत असतो.

अनेक घटना या आपल्या क्षमतेच्या बाहेर असतात म्हणजेच आपण अनेक अशा गोष्टींची काळजी करत असतो ज्या गोष्टींच आपल्याशी काहीही घेणंदेणं नाही किंवा आपण त्या गोष्टींमध्ये तुम्ही कसलाही हस्तक्षेप देखील करू शकत नाही.

अशा परिस्थितीत आपण या चिंतांचे वर्गीकरण करणे योग्य राहील ज्या गोष्टींची चिंता केल्यामुळे आपल्याला काही काळजीतून मुक्त होण्याचा पर्याय सापडेल.

 

indian women blog

 

यामुळे तुम्ही ज्या लहान गोष्टींची काळजी करता त्या लहान गोष्टींची संख्या तरी किमान कमी होईल आणि तुम्हाला इतर गोष्टींवर सकारात्मक पद्धतीने विचार देखील करता येईल.

4. साखळी तोडा

म्हणजे जर अतिरिक्त काळजी केल्यामुळे तुमच्यावरती किंवा तुमच्या कामावरती नकारात्मक परिणाम होत असेल तर लक्षात घ्या तुम्ही तुमची साखळी पूर्ण करत आहात.

अशा परिस्थितीत काही गोष्टी जाणवल्यानंतर लगेच तुम्ही तुमची काळजी करण्याची प्रक्रिया थांबवायला हवी आणि ही विचार करण्याची साखळी थांबवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग करून पाहू शकता.

म्हणजे जेव्हा अशा प्रकारचे विचार मनात येऊ लागतील तेव्हा उठा आणि कुठेतरी लांब चक्कर मारून या, तुमच्या मित्राला फोन करा आणि त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारा, तुमच्या आवडीचा चित्रपट बघा, योगा करा.

 

best VPN deals

 

यामुळे तुमचे विचार करण्याची साखळी नक्कीच खंडित होईल. आणि परत इच्छा असूनही तुम्ही त्या गोष्टीची काळजी करणार नाही.

5. तुमच्या काळजी बद्दल चर्चा करा

आपल्याला अनेक चिंता सतावत असतात आणि लक्षात घ्या काळजी, चिंतांमुळे फक्त तुम्हीच नव्हे तर तुमच्या सोबतच्या इतर लोकांनाही अनेक प्रकारच्या चिंतेने ग्रासलेले असतं.

अनेक वेळा आपण आपल्या लहान चिंतेला देखील उगीच विचार करून मोठे संकट बनवत असतो.

त्यामुळे इतरांशी चर्चा करा कदाचित त्यांच्या आयुष्यात तुमच्या पेक्षा कितीतरी पट अधिक काळजी आणि चिंता असतील आणि ते या सर्व गोष्टींना सकारात्मक पद्धतीने तोंड देत असतील.

 

whale reports

 

त्यामुळे इतरांशी चर्चा नक्कीच करा यातून तुम्हाला मार्ग सापडेल किंवा काळजी, चिंता करणारे तुम्ही एकटेच नाहीत एवढे तरी नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही अतिरिक्त चिंता करणार नाही.

हे आहेत काही उपाय जे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये केल्यामुळे आपण लहान लहान चिंतन पासून मुक्त होऊ शकु, आणि यामुळेच आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण होवु शकेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version