आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या आजूबाजूला सध्या भयावह परिस्थिती आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातलय सगळीकडे!
लोकं जीव मुठीत घेऊन घरात बसलेत. सरकारने लॉकडाऊन जाहिर केलाय.
संसर्गजन्य रोग आहे ना! त्यामुळे कोणाकडून आपल्याला होऊ नये ह्याची पूर्ण खबरदारी घ्यायची. त्यामुळे गपचुप घरात बसायचं!
खाजगी कंपन्यांच्या कर्मचार्यांनी त्यांची कामं घरातूनच करायची. रेल्वे, विमान, बस, खाजगी सार्वजनिक सर्व काही बंद!
सुरवातीला सगळ्यांना ह्या अनपेक्षित सुट्टीची मजा वाटली. पण जसजशी परिस्थिती गंभीर झाली तसतशी सगळ्यांची मजेची जागा भीतीने घेतली,
हळूहळू लॉकडाऊन वाढले. घरात वेळ कसा घालवायचा हे लोकांना कळेनासे झाले. मग सुरु झाला सोशल मिडिया वर वेगवेगळे चॅलेंजेस् द्यायचा ट्रेंड!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मग आले विविध पदार्थ बनवायचा ट्रेंड! कोणी डॅल्गोना कॉफी बनवतंय, कोणी केक बनवतंय, कोणी जिलेबी तर कोणी कधीही न केलेले पदार्थ ट्राय करतंय!
तरीही बराचसा वेळ शिल्लक असतोच! आणि हे चॅलेंजेस् किंवा पदार्थ आपण रोज रोज नाही करत ना! त्यामुळे खूप वेळ असतोच! हा वेळ पण सत्कारणी लावूया. थोडी स्वतःची पण काळजी घेऊया.
ह्या लॉकडाऊन मुळे सलोन, ब्युटी पार्लर्स इत्यादी पण बंद आहे, कारण गर्दीची ठिकाणं आहेत ना ही!
गर्दीची सर्व ठिकाणे पण बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे हेही बंद.
मग आता काय करायचं? आपल्याकडे आत्ता वेळही आहे आणि त्वचेची, केसांची काळजी पण घ्यायचीय.
घरी काही करायला वेळ नसतो म्हणून आपण ब्युटी पार्लर किंवा पार्लर मधे जातो. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी हेअर स्पा, केसांसाठीच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटस् घेतो.
पण तुम्हाला माहितेय? केसांची निगा, किंवा स्पा हे सगळे करण्यासाठी वेळ तर खूप खर्च तर होतोच. त्याशिवाय ह्या ट्रीटमेंटस् खूप महाग पण असतात.
चला तर मग आता आज आपण ह्या लेखातून घरच्या घरी केसांची निगा राखण्यासाठी काय करायचे ते पाहू.
हे उपाय केवळ स्त्रियांच्या केसांसाठीच उपयुक्त आहेत असे नाही तर पुरुषांचे देखील केस घनदाट बनतील.
१) बनाना हेअर स्पा ट्रीटमेंट
केळं आणि ऑलिव्ह तेल ह्यांचे मिश्रण केसांच्या पोषणासाठी खूपच उपयुक्त आहे.
ह्याने निर्जिव आणि कोरड्या केसांना खूप फायदा होतो.
मिक्सरमधून १ केळं आणि २ चमचे ऑलिव्ह तेल हे मिश्रण एकत्र करून घ्यावे. थोड्या वेळ हे मिश्रण असेच ठेवावे.
गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल २० मिनिटे आपल्या केसांना गुंडाळून ठेवावा. ही एक प्रकारे केसांना वाफ देण्याची पद्धत आहे,
ज्यामुळे केसांना आपण जे मिश्रण लावणार आहोत त्या मिश्रणाची केसांच्या पोषणास जास्त मदत होणार आहे.
२० मिनिटांनंतर टॉवेल दूर करून आपण केळ्याचं जे मिश्रण केलं आहे ते केसांना सगळीकडे समान लावावे. साधारण २५ ते ३० मिनिटे हे मिश्रण असेच लावून ठेवावे केसांना.
त्यानंतर केसांना सौम्य शांपू आणि कंडिशनर लावून स्वच्छ धुवावेत.
२) अंडी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर स्पा ट्रीटमेंट
हे मिश्रण कोरड्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
ह्यासाठी १ अंडं, २ चमचे ऑलिव्ह तेल आणि १ चमचा मध घ्यायचा आहे.
गरम पाण्यामध्ये बुडवलेल्या टॉवेलने १० मिनिटे केसांना गुंडाळून वाफ द्यावी.
अंडे, ऑलिव्ह तेल आणि मध एकत्र करून घ्यावे आणि हे मिश्रण केसांना लावावे. साधारण २० ते २५ मिनिटे हे मिश्रण केसांना लावून ठेवावे.
त्यानंतर सौम्य शांपू लावून कोमट पाण्याने केस धुवावेत. अंड्याने केसांना पोषण मिळते आणि ऑलिव्ह तेल आणि मध डॅमेज्ड् केसांना नीट दुरुस्त करतात.
३) काकडी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर स्पा ट्रीटमेंट
काकडी आपल्या स्काल्पची हानी झाली असेल तर ती भरून काढते. टाळुला खाज असेल तर ती देखील काकडी मुळे नाहिशी होते.
१/२ काकडी आणि २ चमचे ऑलिव्ह तेल ह्यांचे मिक्सरमधून व्यवस्थित मिश्रण करून ठेवावे.
मग गरम पाण्यात भिजवून जास्तीचे पाणी काढून टाकून टॉवेल १५ ते २० मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा.
त्यानंतर काकडी आणि ऑलिव्ह तेलाचे मिश्रण केसांना लावून ठेवावे. साधारण १५ ते २० मिनिटे हे मिश्रण केसांना लावूने ठेवावे.
नंतर केस शांपू आणि कंडिशनर लावून कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
४) कोरफड आणि लिंबू हेअर स्पा ट्रीटमेंट
जर तुमचे केस तेलकट असतील तर त्यासाठी कोरफड उत्तम आहे. शिवाय कोरफड आणि लिंबू ह्या दोन्ही घटकांमुळे कोंडा दूर होण्यास मदत होते.
कोरफड जेल (घरी कोरफड असेल तर त्याचा ताजा गर उत्तमच!) आणि १ चमचा लिंबाचा रस चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.
गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल पिळून साधारण १५ ते २० मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा.
त्यानंतर हे कोरफड आणि लिंबाचे मिश्रण केसांना लावून ठेवावे. हे मिश्रण साधारण २० ते ३० मिनिटे केसांना लावून ठेवावे. त्यानंतर शांपू आणि कंडिशनर लावून केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत.
५) दही आणि कोरफड जेल हेअर स्पा ट्रीटमेंट
दही आणि कोरफड जेल (घरी कोरफड असल्यास ताजा गर घ्यावा) ह्यामुळे केसांना पोषण मिळते.
केस नैसर्गिकरित्या चमकतात आणि केस घनदाट होण्यास मदत होते. शिवाय केसातील कोंडाही नाहिसा होतो.
दही आणि कोरफड जेल ह्यांचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे.
गरम पाण्यात टॉवेल ओला करून तो केसांना व्यवस्थित गुंडाळावा. साधारण १५ ते २० मिनिटे टॉवेल तसाच ठेवावा.
नंतर कोरफड आणि दह्यापासून तयार केलेले हे मिश्रण केसांना सम प्रमाणात लावावे आणि हे मिश्रण साधारण २० ते २५ मिनिटे लावून ठेवावे.
त्यानंतर केस शांपू आणि कंडिशनरने स्वच्छ धुवावेत. केस धुण्यासाठी कोमट किंवा गार पाण्याचा वापर करावा.
६) ऑलिव्ह ऑइल हेअर स्पा ट्रीटमेंट
तुम्हाला जर तुमचे केस लांब, घनदाट आणि चमकदार हवे असतील तर ह्यासाठी ऑलिव्ह तेल अत्यंत उपयोगी आहे.
केसांच्या मूळांपासून टोकांपर्यंत ऑलिव्ह तेलाने चांगल्या प्रकारे मसाज करावा. साधारण १ ते २ मिनिटे मसाज केल्यानंतर १५ ते २० मिनिटे तसेच ठेवावे.
त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल पिळून जास्त पाणी काढून टाकावे आणि हा टॉवेल केसांना १५ ते २० मिनिटे गुंडाळून ठेवावा.
त्यानंतर शांपू आणि कंडिशनर लावून केस कोमट किंवा ठंड पाण्याने स्वच्छ धुवावेत.
घरच्या घरी करण्यासारखे हे उपाय स्त्रियांनी तर करावेतच पण पुरुषांनीही करण्यास हरकत नाही.
या हेअर स्पा ट्रीटमेंट उपयुक्त तर आहेतच शिवाय सलोन मधील महागड्या ट्रीटामेंटच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत.
ह्या ट्रीटमेंट मुळे केस गळणे कमी होते, केस नैसर्गिक रित्या चमकदार होतात आणि कोंड्यासारख्या समस्या समूळ नष्ट होतात.
मग काय? ह्या लॉकडाऊन मुळे मिळालेला वेळा आपल्या आरोग्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी सत्कारणी लावणार ना?
–
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.