आंब्याची कोय आणि साल आपण फेकून देतो, पण त्यांचे “हे” औषधी गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याच्या दिवसात आपल्या मराठी माणसांचा एक दिवस जात नाही आंबा खाण्याशिवाय. रत्नागिरीच्या हापूस ला तर जगभर मागणी आहे.
त्याच्या खालोखाल मागणी आणि लोकांमध्ये आवड असेल तर केशर आंब्याची. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांसाठीच दुपारचं ‘आमरस जेवण’ ही एक मेजवानी असते.
उन्हाळा येतो तसा सगळ्यांना वेध लागतात आंबे खाण्याचे. त्यातही हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा. हापूस आंबा न आवडणारा माणूस कोणी नसेलच.
यावर्षी कोरोना मुळे उत्पादन कमी असेल तर सांगता येत नाही. पण, इतक्या वर्षात एकही वर्ष असं नसेल गेलं जेव्हा आपण आपल्या या आवडत्या फळावर मनसोक्त ताव मारला नव्हता.
काही जण हे आंब्याच्या रसाचे चाहते असतात तर काही जणांना नुसता आंबा खाण्याची सुद्धा तितकीच आवड असते. खरी मजा ही तसं खाण्यातच आहे हे सुद्धा खूप लोक मानतात.
उन्हामुळे काहिली होत असताना आमरस जेवणात असेल तर त्यासारखं सुख नसतं. महाराष्ट्रातला आपल्या कोकणातला असल्यामुळे तो आपल्याला अधिकच जवळचा वाटतो.
काही ठिकाणी जेवणानंतर फळं खायला पाहिजे असा एक समज आहे. पण, आंबा हे असं एक फळ आहे ज्याचा रस हा जेवताना खाल्ला जातो आणि त्याच्या फोडी या जेवणानंतर.
आंब्याचं लोणचं हे सुद्धा एक प्रचंड मागणी असणारी गोष्ट आहे. आजकाल आंब्याचा ज्यूस हा कॅन स्वरूपात वर्षभर उपलब्ध असतो हे एक त्याच्या चाहत्यांचं नशीब.
फायदे:
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे की त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
आंब्यांचा अजून एक फायदा म्हणजे त्यामुळे आपण हृदयाच्या आजारांना दूर ठेवू शकतो.
आंब्यामध्ये जवळपास ८०% पाणी असल्याने त्यामधून आपल्याला कायम एनर्जी मिळत असते.
हे तर झाले आंब्याचे फायदे, आंब्याच्या सालीचे किती फायदे आहेत ते जाणून घेऊया :
१. आंब्याच्या सालीमध्ये मॅग्नीफेरीन, कॅम्पफेरोल आणि anthocyanins आणि quercetin हे केमिकल्स असतात जे की आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
२. यासोबतच आंब्याच्या सालीमध्ये ethyl gallete हे केमिकल असतं जे की ट्युमर ची वाढ होण्यापासून रोखण्यास शरीराला मदत करतं आणि हृदय विकारांपासून सुद्धा आपल्याला लांब ठेवतं.
यकृत उत्तम राहण्यासाठी मदत करण्यास मदत होते.
३. काही केमिकल्स या आपल्याला कॅन्सर, अल्झायमर आणि मोतीबिंदू च्या धोक्यापासून लांब ठेवतात.
काही डॉक्टर लोकांनी त्यांच्या अभ्यासातून हे सुद्धा सिद्ध केलं आहे की, आंब्याची साल ही आंब्यापेक्षा जास्त गुणकारी पदार्थ आहे.
४. आंब्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन A आणि C हे भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते.
५. आंब्याच्या साल ही वजन कमी करण्यास उपयुक्त असते. त्याचबरोबर शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत करत असते.
६. फायटोन्यूट्रिइंट्स हे आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून आपण लांब राहू शकतो.
७. ट्रायटरपेन्स आणि ट्रायटरपेनॉइड्स हे आंब्याच्या सालीमध्ये असतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते.
आंब्याच्या कोयीचे फायदे :
१. कायम दुर्लक्षित केलेली आंब्याची कोय ही सुद्धा खूप उपयुक्त आहे. आंब्याच्या कोयीमध्ये असणाऱ्या फॅट्समुळे त्यांचा उपयोग चॉकलेट बनवण्यात केला जातो.
एखाद्या चॉकलेट मध्ये तुम्हाला seed kernel extract हे लिहिलेलं दिसू शकतं.
२. आंब्याच्या कोयीमुळे केसांचं गळणं कमी केलं जाऊ शकतं. केसातील कोंडा कमी करण्यास मदत होते.
३. आंब्याच्या कोयीमुळे त्वचा रोग आणि चेहऱ्यावर येणारी पुरळांना लांब ठेवण्यास मदत होत असते.
४. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आंब्याची कोय ही हृदयाचे आजार, मधुमेह आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होत असते.
हे फायदे कसे मिळवावे यासाठी तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.
आंब्याच्या पानाचे फायदे :
आंब्याच्या झाडाची पाने वाळवून पावडर केली आणि ती विशिष्ट मात्रेत घेतली तर सर्वांसाठी फार उपयुक्त ठरू शकते.
केस वाढणयासाठी देखील त्यांचा उपयोग होईल. डायबिटीस, तणाव या सगळ्यांवर त्याचा चांगला उपयोग होतो.
जुलाब, ताप अस्थमा, कफ, सर्दी या सगळ्यांवर आंब्याच्या पानांचा वापर करून काढा घेतल्यास उपयोगी पडतो.
आंब्याचे इतर उपयोग :
काही समाजात विवाहापूर्वी आंब्याच्या झाडाला फेरी मारली जाते. त्यानंतरच पतिपत्नी विवाहबद्ध होतात.
आंब्याच्या झाडाची लाकडे पवित्र मानली जातात. होमहावनामध्ये ती वापरली जातात.
चंद्राची पूजा देखील आंब्याच्या फुलांनी करतात. याशिवाय सरस्वतीच्या पूजेत देखील आंब्याची फुले वापरली जातात.
अगदी माणसाच्या अंतिम संस्काराच्या विधीमध्ये देखील याच्या लाकडांचा यांचा वापर होतो.
आपण केवळ हौस म्हणून आंबा खातो, पण आंब्याच्या झाडापासून ते अगदी फळापर्यंत त्याच्या प्रत्येक अंगाचा औषधी गुणधर्म आहे. आपण आंबा खाल्ल्यानंतर कोय, साल फेकून देतो.
हे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर आंब्याविषयीच तुमचं प्रेम द्विगुणित झालं असेल यात शंका नाही. त्यामुळे या महिन्यात कमी आंबे मिळाले तरी निराश होऊ नका. जे मिळतंय त्यात आनंदी रहा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.