लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराची शिदोरी असलेल्या या “९” गोष्टी नाही शिकलात तर काय केलंत??
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मार्च महिन्यात भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाला सुरूवात झाली. अर्थात संसर्गजन्य रोग असल्याने भराभर पसरू लागला.
बरेच जण कोरोना बाधित होऊ लागले, शेकडो लोक मृत्युमुखी पडू लागले. सरकारी कंपन्या, ऑफिसेस सुरुच होती. मात्र तरिही धोका वाढतच होता.
कोणाला काही समजायच्या आतच खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी व्हायला सुरुवात झाली होती. सरकारने एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला.

पण, एकंदरीतच परिस्थिती खूप गंभीर होत आहे हे लक्षात घेऊन सरकारने १४ एप्रिल पर्यंत टोटल लॉकडाऊन जाहिर केला आणि पुढे त्यात वाढ होतच राहिली.
कोणीही घराबाहेर पडायचं नाही, खाजगी, सरकारी वाहने, रेल्वेसुद्धा, विमाने सगळं सगळं बंद! खाजगी ऑफिसेस पण बंद. वर्क फ्रॉम होम करा पण घराबाहेर कोणीही पडायचे नाही असे आदेश सरकारने दिले.
ह्या विषाणूला दुसऱ्या टप्प्यात थांबवायचे प्रयत्न सुरू झाले.
टि.व्ही., रेडिओ, जाहिराती, बातम्या, सोशल मिडिया ह्या सगळ्या माध्यमातून नागरिकांना खबरदारी घ्यायचे आवाहन करण्यात येऊ लागले.
Prevantion is better than cure ह्या म्हणी नुसार ह्या विषाणूला हरवण्यासाठी त्याचा संसर्ग होऊ द्यायचा नाही हा मार्ग अवलंबणे श्रेयस्कर होते.
सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता राखणे, वारंवार साबणाने हात धुणे, गरम पाणी पिणे ह्यासारखे उपाय करण्याची सूचना वारंवार देण्यात येत आहे.

ह्या कोरोना विषाणूला हरवण्यासाठी जे जे करता येईल ते ते सर्व करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
काही दिवसांपुर्वी अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असली तरी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अनेक शहरांत पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे सगळे आता हे संकट कधी टळेल ह्याची वाट बघत आहेत.
असं जीव मुठीत घेऊन अजून किती दिवस असं घरात बसायचं हे कोणालाच माहित नाहिये.
परिस्थिती खूपच गंभीर आहे. पण ह्या मागील काही दिवसांपर्यंत असलेल्या टोटल लॉकडऊन मुळे काही काही गोष्टी खूप चांगल्या घडल्या. कोरोना व्हायरसमुळे मनुष्यहानी झाली असली तरी काही गोष्टी खूप चांगल्या घडल्या आहेत.
जसे, ध्वनी आणि वायु प्रदुषण कमी झाले, सर्व प्राणी-पक्षी निर्भय झाले, गुन्हेगारीची संख्या कमी झाली आणि मुख्य म्हणजे सगळं कुटुंब पहिल्यांदाच २४ तास एकत्र राहू लागलं.
ह्या टोटल लॉकडाऊन मुळे भारतीयांना काही काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आज आपण त्याच गोष्टी ह्या लेखातून पाहणार आहोत.
१) भाज्या आणि पाण्याचा वापर विचारपूर्वक करणे

ह्या टोटल लॉकडाऊनमध्ये अन्न आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता जास्त होती, त्यामुळे ह्या जीवनावश्यक गोष्टी जपून वापरणे खूप गरजेचे आहे हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे.
परिणामतः अहवालानुसार असे लक्षात आले आहे की, पाणी आणि अन्नाचा वापर खूप जपून, काळजीपूर्वक करण्यात येत आहे. भविष्याच्या दृष्टीने ही गोष्ट खूपच चांगली आहे.
२) कुटुंबियांसमवेत वेळ घालविणे
ही आणखीन एक महत्त्वाची आणि चांगली घटना आहे, पहिल्यांदाच असे घडाले असेल की इतके दिवस अख्खं कुटुंब एकत्र आहे. एरवी घरातले सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत शाळा, महाविद्यालय, क्लासेस्, ऑफिस किंवा व्यवसाय उद्योग ह्यामध्ये पूर्ण दिवस व्यस्त असतात.
काही काही घरांमध्ये तर दिवसें दिवस एकमेकांची भेट होत नाही, रविवारीच भेट होते. आता ह्या लॉकडाऊनमुळे सर्व कुटुंब एकत्र वेळ घालवू लागले आहेत.
३) घरकाम घरातल्याच व्यक्तींनी करणे

टोटल लॉकडाऊन मुळे, सोशल डिस्टंसिंगमुळे घरकाम करणाऱ्या बायकांना, नोकरांना सुट्टी देणे अपरिहार्य होते, त्यामुळे धुणी, भांडी, केर काढणे, लादी पुसणे, साफसाफाई ह्यांसारखी कामे घरातल्या घरात केली जाऊ लागली.
कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते हे कळले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घारातल्याच व्यक्तीने घरातलं काम करण्यात आत्मीयता असते,.
त्यामुळे मन लावून काम केलं जातं आणि ते काम सगळ्यांच्याच पसंतीला उतरतं, सगळ्यांनाच आवडतं.
४) सुप्त कला- गुणांना वाव देणे

२४ तास घरात असल्याने वेल कसा घालवायचा ही समस्या उभी राहिली. पण, प्रत्येकात काही ना काही कला गुण असतातच. अभ्यास, करीअर, नोकरी ह्यामुळे ह्या कला गुणांना कधी वाव मिळत नाही.
आता हा वेळ सत्कारणी लावावा म्हणून बरेच जण आपल्यातील कला गुण सादर करून सोशल मिडिया वर ते दाखवत आहेत.
जसे, गायन, नृत्य, चित्रकला, क्राफ्ट, पाककला इत्यादी. तसेच नवीन कला शिकण्याकडे देखील बऱ्याच जणांचा कल आहे. आता ऑनलाइन बरंच काही शिकता येतंय.
५) मानसिक आरोग्याची काळजी घेणे

खरं तर एकंदरीतच ही परिस्थिती खूपच गंभीर आहे. कोरोना व्हायरसचं संकट, नोकरी नाही, २४ तास घरात, सगळ्या वस्तू जपून वापरणं, भविष्याची खूपच चिंता सतावतेय.
पण घरातले सगळे एकत्र असल्याने धीर देतात एकमेकांना, कला-गुणां मध्ये वेळ घालवतात, त्यामुळे मानसिक आरोग्य बिघणार नाही. अशा परिस्थितीत मानसिक बळ कसं वाढवायचं हे समजलं.
६) शारीरिक आरोग्य जपणे

शारीरिक आरोग्याची देखील योग्य ती काळजी घेतली जातेय. रोजच्या धावपळीत शरीराकडे लक्ष दिलं जात नाही. शिळं, थंड अन्न खाल्लं जातं, बऱ्याचदा हॉटेलिंग, जंक फूड ह्यांना पसंती दिली जाते.
घाई घाईत खाल्लं जातं. मग शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं, पण आता घरचं ताजं, गरम गरम अन्न खाल्लं जातंय त्यामुळे शारीरिक आरोग्य सुधारत आहे.
लोक घरी व्यायाम करत आहेत. योग करत आहेत.
७) निसर्गाचा समतोल राखणे
मनुष्य ह्या एकाच प्राण्यामुळे निसर्गाची हानी झाली आहे. कटु सत्य आहे हे. एकंदरीतच सगळीकडे स्वच्छता आहे.
निसर्ग इतका छान कधीच दिसला नव्हता. निसर्गाची भरभराट झाली आहे, प्रदुषणाची पातळी कमी झाली आहे.
८) प्राण्यांचे हक्क हिरावून न घेणे

आपण आज जवळ जवळ १ महिना ह्या लॉकडाऊन मुळे घरात आहोत. बरेच जण बेचैन आहेत, जणू कैदेत असल्यासारखं वाटत आहे.
मग आता सोशल मिडिया वर हा विचार वाऱ्यासारखा फैलावत आहे की आपण तरी आपल्याच घरात आहोत, आपलं आवडतं अन्न आपण खात आहोत, पण आपल्या मनोरंजनासाठी प्राण्यांना छोट्या पिंजऱ्यात ठेवलं तर त्यांना कसं वाटत असेल?
तर ह्यापुढे प्राण्यांचा विचार करावा, त्यांना पिंजऱ्यात कोंडू नये असे विचार मांडले जात आहेत.
तसंच जे प्राणी पिंजऱ्यात नाहीयेत ते निर्धास्त पणे रस्त्यावर फिरत असतानाचे व्हिडिओ देखील शेअर होत आहेत. खरा आनंद स्वातंत्र्यातच आहे, पिंजऱ्यात नाही.
९) योग्य प्रतिनिधी निवडणे

आपण ज्यांच्या हातात देशाचे भवितव्य सोपवणार आहोत ते प्रतिनिधी योग्य आहेत की नाही ते ठरवण्याचा हक्क आपल्याला असतो. कठिण प्रसंगात कोण योग्य निर्णय घेऊ शकेल, कोण सक्षम आहे हे आपल्याला समजते.
त्यामुळे सूज्ञपणे निर्णय घेणारा, लोकहितदक्ष नेता असावा ज्यामुळे जनतेचे भलं होईल, नेत्याचं एकट्याचं नाही.
या घटनेमुळे योग्य नेता निवडून देणं किती महत्त्वाचं आहे हे लोकांना समजेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.