Site icon InMarathi

खेळण्यातली गाडी वापरून २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशूट करणारा अवलिया

photoshoot inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फोटोग्राफरची खरी ताकद त्याच्या कॅमेऱ्यात नसून त्याच्या क्रियेटीव्हीटीमध्ये असते. त्याच्या क्रियेटीव्हीटीमधून जे काही निर्माण करतो ते खऱ्या अर्थाने रसिकांना मोहून टाकते.

असे क्रिएटीव्ह फोटोग्राफर्स फारच कमी पाहायला मिळतात, जे अगदी शून्यातून अगदी किंमती छायाचित्रे निर्माण करतात.

सध्या फोटोग्राफर्सच्या भन्नाट कल्पनांना तंत्रज्ञानाची साथ मिळतेच, आणि त्यातून जो अविष्कार साधला जातो त्याची मजा काही औरच!

तुमच्यापैकी अनेकांना फोटोग्राफीची आवड असेल. काहींसाठी पॅशन तर काहींसाठी रोजगाराचं साधनही असेल, पण फोटो काढताना परिसर, वातावरण, प्रकाश, रंगसंगती हे सर्व काही व्यवस्थित असावं असंच आपल्याला वाटतं.

पण समजा, कोणतीही साधनं नसताना तुम्हाला सर्वोत्तम फोटो काढायचा असेल तर? वरकरणी अशक्य वाटणारी ही किमया यापूर्वीच काहींनी साधलीय.

जाणून घेऊयात अशाच एका अवलियाबद्दल…

Felix Hernandez Rodriguez या फोटोग्राफर जगातील अशाच काही क्रिएटीव्ह फोटोग्राफर्स पैकी एक!

त्याचे फोटोज अगदी रुक्ष माणसाच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्याचे आणि कुतूहलाचे भाव आणल्याशिवाय राहत नाहीत.

 

 

Felix Hernandez Rodriguez ने एक अशक्य कमाल करून दाखवली. त्याला २ करोडच्या ऑडीचं फोटोशूट करण्याची ऑफर आली होती.

आता इतक्या महागड्या गाडीचं फोटोशूट करायचं म्हणजे सहाजिकच ते एकदम हटके हवं.

त्यामुळे अतिशय सुंदर लोकेशन शोधून तेथे जाऊन गाडीसोबत हे फोटोशूट करावं लागणार असा विचार एखाद्या सामान्य फोटोग्राफारने केला असता.

पण या क्रिएटीव्ह माणसाने आपल्या नेहमीच्याच स्टाईलने जे काही कैद केलं ते कल्पनेपलीकडचं आहे.

 

 

त्याने खऱ्या कारच्या मॉडेलचा वापर न करता कंपनीकडे कारच्या एका छोट्याश्या प्रतिकृतीची मागणी केली. अगदी लहान खेळण्यातली कार वाटावी अशी प्रतिकृती!

कंपनीने अवघे २००० रुपये खर्च करून त्याला ती प्रतिकृती पाठवली.

ही कार जरी छोटीशी खेळण्यातली वाटत असली तरी ती अगदी हुबेहूब मूळ कार सारखीच होती. खऱ्या कार मध्ये आणि या छोट्याश्या खेळण्यातल्या कारमध्ये किंचितही फरक नव्हता.

या छोट्याश्या प्रतिकृतीचा वापर करून Felix Hernandez Rodriguez ने असे काही भन्नाट फोटोशुट केलेय की पाहणाऱ्याला वाटावे जाणून खऱ्या गाडीचा वापर यात केला असेल.

 

 

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोटोशूटमध्ये केवळ लाईट आणि इतर ईफेक्टस वापरण्यात आले होते. परंतु फोटोशूट आकर्षक दिसावे म्हणून कोणत्याही प्रकारच्या एडीटिंग सॉफ्टवेअरचा किंवा फोटोशॉपचा वापर करण्यात आलेला नाही.

 

ही शूटिंगची तयारी पाहून एवढ्याशा खोलीत एका नामांकित कंपनीच्या कारचे फोटोशुट सुरु आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटलं नसतं, पण अर्थातच या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीबद्दल सर्वांनाच खात्री असल्याने कंपनीकडूनही फोटोंची वाट पाहिली गेली.

 

 

क्रिएटीव्हीटी असावी तर अशी…!

या अवलिया फोटोग्राफर कडून “कला” कशी जोपासावी अन कशी अधिकाधिक उन्नत करत न्यावी हे शिकण्यासारखं आहे!

 

===

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version