आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आज काल केस रंगवण्याचा, हेयर डाय करण्याचा ट्रेंड आला आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवक युवतींमध्ये ही फॅशनच आली आहे.
म्हणजेच काय तर काही जणांना फॅशन म्हणून केस रंगवायचे असतात तर काही जणांना ‘प्रेझेंटेबल’ राहायचं असतं, गरज असते म्हणून हेयर डाय करावे लागतात.
बऱ्याच जणांना सलोनमधे, ब्युटी पार्लर मधे जाऊन हेयर डाय करून घेणे खूप कटकटीचे, वेळखाऊ शिवाय महागही वाटते. त्यामुळे बरेचजणं घरीच हेयर डाय करण्यास पसंती देतात.
पण, हेयर डाय करताना खूप काळजी घ्यावी लागते नाही तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
पण घरच्या घरी सोप्या पद्धतींनी आणि व्यवस्थित, आपल्या आरोग्याला कुठलीही हानी न पोहोचवता केस हेयर डाय किंवा हेयर कलर करता येईल का?
तर ह्याचे उत्तर “हो” असे आहे. आज आपण आरोग्याला नुकसान न पोहोचवता, व्यवस्थितपणे, पार्लर सारखं घरच्या घरी हेयर डाय किंवा हेयर कलर कसं करता येईल ते बघूया.
ह्या काही टिप्स् खास तुमच्यासाठी आहेत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी पार्लर किंवा सलोन सारखं हेयर डाय किंवा कलर करू शकाल.
१) रंग मिक्स करायला प्लॅस्टिक किंवा काचेचा बाऊल वापरावा
केसांना लावायचा रंग व्यवस्थित मिक्स करावा लागतो. हा रंग मिक्स करण्यासाठी चुकुनही धातूच्या, मेटलच्या बाऊलचा वापर करू नये.
हेयर डाय करण्यासाठी जो रंग वापरण्यात येतो त्यामधे काही प्रमाणात केमिकल्स असतात, धातूच्या संपर्कात हे केमिकल्स आले तर त्याची रिऍक्शन होऊ शकते.
रंगाची शेड बदलू शकते त्यामुळे हे रंग मिसळण्यासाठी प्लस्टिकच्या किंवा काचेच्या बाऊल्सचाच वापर करावा.
२) बॉक्सवर चित्र असणाऱ्या मॉडेल प्रमाणे अपेक्षा करू नका
बॉक्सवरील मॉडेलचे केस आणि आपले केस ह्यामध्ये खूपच फरक असतो. तसेच तो फोटो एडिट देखील केलेला असू शकतो. तसेच मॉडेलच्या केसांसाठी वापरलेला रंग हा केस अधिक गडद, आकर्षक दिसण्यासाठी स्ट्रॉंग असू शकतो.
आपल्या केसांना तेव्हढा स्ट्रॉंग रंग झेपणार नाही, त्यामुळे आपण आपल्या केसांच्या योग्यतेप्रमाणेच हेयर डायचा विचार करावा, बॉक्सवरील मॉडेलला पाहून त्याप्रमाणे नाही.
===
- केस धुताना हमखास होणाऱ्या या चुका टाळा, अन्यथा होईल नुकसान!!! वाचा
- शरीराच्या त्या भागातील केस काढयचा विचार करताय? तर मग आधी या गोष्टी जाणून घ्या
===
३) योग्य रंग कसा निवडावा?
आपल्या केसांच्या रंगाप्रमाणे, स्कीनटोनप्रमाणे रंग निवडावा.
बॉक्सच्या बाजूला एक चार्ट दिला असतो. त्या चार्टवर आपल्या केसांना अनुसरून कोणता रंग योग्य दिसेल हे ठरवूनच आपण आपला रंग निवडावा.
४) केसांच्या लांबी प्रमाणे बॉक्सची संख्या ठरवावी
तुमचे केस जर खांद्याच्या खाली, मध्यम किंवा जास्त लांब असतील तर तुम्हाला हेयर डायचे सारख्या शेडचे दोन बॉक्स घ्यावे लागतील.
मोठ्या केसांना एक बॉक्स पुरत नाही. त्यासाठी एकाच शेडचे दोन बॉक्स घ्यावे लागतील. त्यामुळे आपल्या केसांची लांबी लक्षात घेऊनच बॉक्सची संख्या निवडावी.
५) कलर टेस्ट
काही जणांना हेयर डायची, हेयर कलरची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे आधी थोड्याशाच केसांना ह्या हेयर डायची चाचणी किंवा टेस्ट करून घ्यावी.
आपल्याला ह्या हेयर डायची, कलरची ऍलर्जी नाही ही खात्री करून घेऊनच मग हेयर डाय किंवा हेयर कलर करावेत.
६) आपल्या केसांच्या अनुरूप रंग निवडावा
आपण आपल्या केसांना जो रंग देणार आहोत तो आपल्याला सूट होईल की नाही हे लक्षात घ्यावे.
त्यासाठी अगदी थोड्या केसांना आधी रंग देऊन बघावा. आपल्या केसांना तो रंग कसा दिसतो, चांगला दिसतो की नाही हे पडताळून बघावे. मगच आपल्या केसांना अनुरूप रंग द्यावा.
===
- या १३ गोष्टी खा आणि दाट केस मिळवा – टक्कल टाळा! कसं ते जाणून घ्या
- हेअरकलर्सला करा बाय बाय … हे घरगुती उपाय वापरून ‘केसांना द्या आकर्षक रंग’!!
===
७) हेयर डाय करताना चुकून त्वचेला लागू नये म्हणून काय काळजी घ्याल
हेयर डाय किंवा हेयर कलर करताना काळजी पूर्वक करावा, तरीही काही काही वेळा हेयर डाय किंवा हेयर कलर करताना चुकून तो रंग त्वचेला लागू शकतो.
शक्यतो हातात ग्लोव्हज घाला.
अशा वेळी बेकिंग सोडा किंवा टूथपेस्ट लावून तो रंग काढता येतो. खोबरेल तेल लावूनही हा रंग काढता येतो.
८) विभाग करणे
एकाच जागी रंगाचा पॅच तयार होऊ नये म्हणून केसांचे विभाजन करणे गरजेचे आहे. आपले केस मध्यभागी भांग पाडून डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या बटा घेऊन क्लिपने बांधा.
त्यामुळे साधारण ४ किंवा ६ विभागात त्यांचे विभाजन होईल. मगच हेयर डाय किंवा कलर करा. त्यामुळे सगळीकडे सारख्या प्रमाणात रंग लागतो.
तसेच हेयर डाय किंवा कलर करण्याआधी थोडेसे पाणी केसांना लावा आणि केसांना हल्क्या हाताने मसाज करा. त्यामुळे केसांना हेयर कलर समान लागण्यास मदत होते, रेषा किंवा पॅचेस राहत नाहित.
९) कलर किंवा डाय करण्यासाठी योग्य प्रोडक्ट
आपले केस आणि स्काल्प खूप नाजूक असतात. त्यामुळे कोणतेही स्वस्त किंवा हानीकारक प्रोडक्ट वापरू नये. आपल्या योग्य सूट होईल असेच प्रोडक्ट वापरावे.
तसेच हेयर डाय केल्यानंतर किंवा कलर केल्यानंतर लगेचच धुवू नयेत. लगेच धुतले तर हवा तसा रंग येणार नाही. तुम्ही जे प्रॉडक्ट वापरत आहात त्यावरील सूचना नीट वाचा.
कलर केलेल्या केसांसाठी वेगळा शांपु वापरा. ज्याने तुमचे केस छान राहतील.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.