आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारत हा देश प्राचीन काळापासून जगासाठी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. अनेक आकर्षण निर्माण करणारे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत.
भारतीय संस्कृती आणि सभ्यता नेहमीच जगाला मार्गदर्शक ठरलेली आहे.
अनेक नवीन कला आणि संस्कृती या देशात जन्माला आल्या आजही त्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा भारतामध्ये बघायला मिळतात.
भारतामध्ये फक्त एकाच संस्कृतीच्या नव्हे तर अनेक मिश्रित संस्कृतीच्या आठवणी देखील तुम्हाला जुन्या वास्तु कलेतून बघायला मिळतील.
आपल्याकडे आजही अनेक अशा पुरातन वास्तू उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्हाला अनेक संस्कृती आणि सभ्यता यांचा संगम बघायला मिळेल.
आपल्या देशातील हा सौंदर्याचा खजिना तुम्ही पाहिला आहे का?
आज आम्ही या लेखामध्ये तुमच्यासाठी अशाच काही हेरिटेज वास्तूबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत!
आपल्या देशामध्ये अनेक प्राचीन आणि पुरातन अशा वास्तू आज देखील आपण जतन करून ठेवलेल्या आहेत.
या पाहिल्यानंतर आपल्याला आजही आपल्या भव्य अशा वारस्याबद्दल जाणीव होते. भारतामध्ये युनेस्को ने घोषित केलेल्या अशा ३२ हेरिटेज साईट उपलब्ध आहेत!
या ३२ हेरिटेज साईट पैकी पंचवीस या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेत. या वास्तु कलांमध्ये अनेक संस्कृतींचा आणि पद्धतींचा वैविध्यपूर्ण संगम जाणवतो.
आपण या सर्वांचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करतच आहोत. या वास्तूंची माहिती आपण आता घेऊयात.
१. लाल किल्ला (दिल्ली) :
आपण सर्वांनी लाल किल्ला टीव्ही वरती किंवा फोटो मध्ये नक्कीच बघितला असेल. लाल किल्ला म्हणजे लाल दगडांपासून तयार केलेलं एक भव्यदिव्य बांधकाम होय.
हा अजस्त्र किल्ला म्हणजे मुघल बांधकाम पद्धतीचा हा एक जबरदस्त नमुना आहे. या किल्ल्यामध्ये अनेक कलादालन आहेत तसेच अनेक उद्यान देखील आहेत.
मोठे मोठे दरवाजे तर या किल्ल्याची एक खासियत आहेत.
२. ताजमहल (आग्रा) :
ताजमहल बेगम मुमताज यांचा मकबरा असल्याचे सांगण्यात येते. या भव्य वास्तूमध्ये मस्जीद, अतीथी कक्ष , उद्यान देखील आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला हा ताज महल म्हणजे त्याकाळातील स्थापत्यकलेचा एक मुर्तीमंत नमुना आहे.
आज देखील जगातील अनेक पर्यटक ताजमहल कडे आकर्षित होत असल्याचे आपल्याला बघायला मिळेल.
४. कुतुब मिनार (दिल्ली) :
कुतुब मिनार आणि त्याच्या बाजूला असणारी काही स्मारके म्हणजे मध्ययुगीन इतिहासाची मूर्तिमंत साक्ष आहे.
कुतुब मिनार भारतातील दुस-या क्रमांकाला येणारे सर्वात उंच असे स्मारक आहे, हे स्मारक दिल्ली येथील मेहरोली भागात आहे.
यासोबतच या भागात तत्कालीन इतिहासातील अनेक स्मारके बघायला मिळतात जर तुम्ही दिल्लीला जाणार असाल तर कुतुब निघणार नक्की पहा.
४. आग्ऱ्याचा किल्ला (उत्तर प्रदेश) :
यमुना नदीच्या तीरावरती उभा असलेला हा किल्ला इतिहास आपल्या सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून उभा आहे.
आग्ऱ्याचा किल्ला हा जवळपास लाल किल्ल्या सारखाच दिसतो या किल्ल्याच्या बांधकामात देखील लाल रंगाच्या दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.
मुघलांनी त्यांच्या काळात बांधलेला हा सर्वात भव्यदिव्य किल्ल्या आहे असे सांगण्यात येते.
५. सूर्य मंदिर कोणार्क (ओरिसा) :
भारतात अनेक भव्य दिव्य आणि प्राचीन मंदिर आजही अस्तित्वात आहेत त्यापैकीच एक कोणार्क येथील सूर्य मंदिर आहे. अतिशय उत्कृष्ट वास्तुकलेचे हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.
हिंदू धर्मामध्ये पूज्य असलेल्या अनेक मंदिरांपैकी एक असलेलं हे मंदिर सूर्य देवाचं आहे. भारतातील सात आश्चर्यकारक वास्तूंमध्ये देखील या मंदिराचा समावेश करण्यात आलेला आहे.
या मंदिराची बांधणी आणि रचना वैविध्यपूर्ण आहे जर तुम्हाला प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहासाबद्दल अभ्यास करायचा असेल तर कोणार्क येथील सूर्य मंदिराला अवश्य भेट द्या.
६. अजंता गुफा (औरंगाबाद) :
औरंगाबाद येथे असलेल्या या गुहेमध्ये बौद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक लेण्या आढळतात भारतीय इतिहासात अस्तित्वात असणाऱ्या अनेक कलेचं दर्शन तुम्हाला तिथे नक्कीच होईल.
७. एलोरा गुफा आणि कैलास मंदिर (औरंगाबाद) :
या ठिकाणीदेखील तुम्हाला बुद्धकालीन इतिहास लेण्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या दोन्ही ठिकाणी गौतम बुद्धांच्या अप्रतिम अशा मुर्त्या आणि लेण्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
या खूप प्राचीन असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळेच याठिकाणी जगभरातून पर्यटक नेहमीच येत असतात त्यासोबतच येथे जवळच कैलास मंदिर देखील आहे हे मंदिर देखील प्रचंड प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी आल्यानंतर हिंदू संस्कृतीचं नक्कीच दर्शन होतं.
८. एलिफंटा केव्ह (महाराष्ट्र) :
मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या या एलिफंटा केव्हज बघायला देखील जगभरातून पर्यटक नेहमीच रांग लावत असतात याठिकाणी तीन विविध संस्कृतींचा संगम बघायला मिळतो!
याठिकाणी अत्यंत सुंदर अशा शिल्पकला पासून तयार करण्यात आलेलं मंदिर देखील आहे.
९. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (महाराष्ट्र) :
ब्रिटिशांनी बांधलेलं हे भव्य रेल्वे स्टेशन आज देखील मुंबईची शान वाढवत आहे.
मुंबईमधील ब्रिटिश कालीन इतिहासाची साक्ष देणारं रेल्वे स्टेशन आज देखील मुंबईतील सर्वात मोठ गजबजलेलं रेल्वे स्टेशन आहे.
बहुतेक मुंबईतील सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही.
१०. खजुराहो (मध्य प्रदेश) :
खजुराहो येथे अनेक प्राचीन समकालीन ऐतिहासिक स्मारके आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून देखील खजुराहो कडे बघितले जात.
याठिकाणी स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल ईथे महादेवाचं मंदिर देखील खूपच सुंदर आणि रेखीव तयार करण्यात आलेलं आहे!
जर तुम्हाला स्थापत्यकलेची आवड असेल तर खजुराहो हे मंदिर आणि तेथील स्मारक नक्की बघा.
११. गोव्यातील अनेक चर्च आणि जुन्या वसाहती :
खरं बघायला गेलं तर आज प्रत्येक युवकाला गोव्याला आपल्या मित्रांसोबत जायची नक्कीच इच्छा असते.
जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी गोव्याला नक्कीच भेट देतात.
गोव्यामध्ये पोर्तुगीज पद्धतीच्या अनेक वसाहती आज देखील अस्तित्वात आहेत. जुन्या गोव्यातील अनेक बांधकाम आपल्याला अप्रतिम स्थापत्यकलेचं अस्तित्व दर्शवतात.
येथील चर्च देखील खूप जुन्या स्थापत्यकलेची आठवण आपल्याला करून दिल्याशिवाय राहत नाहीत.
जर तुम्हाला पोर्तुगीज पद्धतीचे स्थापत्यशैली अभ्यासाचे असेल तर एकदा जुन्या गोव्यामध्ये नक्कीच चक्कर मारा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.