' मियाँ मकबूल, ये कुबुल नहीं : “स्वप्न जगायला” शिकवणारा इरफान…! – InMarathi

मियाँ मकबूल, ये कुबुल नहीं : “स्वप्न जगायला” शिकवणारा इरफान…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या वर्षी  अचानक अभिनेता इरफान खानचे निधन झालं आणि ही बातमी टीव्हीवर झळकली आणि एकदम धक्का बसला.

खरंतर इरफानला असलेल्या दुर्धर कॅन्सरमुळे सगळेजण त्याच्या काळजीत होते. त्यानंतर इरफान इंग्लंडला उपचारासाठी गेला आणि बरा होऊन परत आला.

त्याच्या चहात्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्याच दिवसात इरफान त्याचा अर्धवट राहिलेला सिनेमा पूर्ण करतोय हे वाचून परत आनंद झाला होता.

सिनेमाही पूर्ण झाला. सध्या कोरोनामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित झाला.

ही सगळी पार्श्वभूमी माहीत असताना अचानक ही दुःखद आणि धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली होती.

संपूर्ण बॉलिवूड देखील यामुळे हादरून गेलं आहे. त्याच्या जाण्याचे दुःख सगळेजण व्यक्त करत होते.

 

irrfan inmarathi

 

शांत, संयत अभिनय तर तो करायचाच पण एक माणूस म्हणून देखील तो सगळ्यांना हवाहवासा वाटायचा.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये त्यानं आपलं अभिनय कलेचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर इरफानने त्याच्या अभिनयाचे करिअर हे टीव्हीपासून सुरू केलं.

परंतु तेव्हापासूनच त्याच्या वेगळ्या अभिनयाची चुणूक दिसून येत होती.

लोक सहज म्हणतात की,त्याचा अभिनय हा खूप नैसर्गिक होता, पण ते पडद्यावर दाखवणं खरंच किती अवघड असतं!! पण हे इरफानने सहज शक्य केलं होतं.

केवळ स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत त्याने स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.

 

irrfan 2 inmarathi

 

बघा ना, तसं पाहायला गेलं तर त्याच्याकडे अगदी हिरो असावा असा लुक नव्हता, ना ही सिक्स पॅक होते. ना ही फिल्म इंडस्ट्रीत कोणी ओळखीचं होतं.

होता तो केवळ त्याचा सच्चा अभिनय. अत्यंत सामान्य वाटणारा अगदी लोकांना आपल्यातला वाटणारा हा हिरो.

त्याने अनेक चित्रपट केले आणि प्रत्येक चित्रपटात स्वतःची छाप सोडली. आज कुठलाही त्याचा सिनेमा आठवलं तरी त्याचं कॅरेक्टर लगेच डोळ्यासमोर येतं.

मकबूल, लंचबॉक्स, हिंदी मिडीयम, तलवार,पानसिंग तोमर, ब्लॅक मेल, स्लमडॉग मिलेनियर,डी डे, हैदर अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात तर तो दिसलाच,

पण अलीकडे हॉलीवूड मध्ये देखील इरफान दिसत होता. लाईफ ऑफ पाय, जुरासिक वर्ल्ड आणि द नेमसेक या सिनेमातही तो आपल्याला दिसला होता.

त्याच्या पानसिंग तोमर या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

त्याच्या सिनेमातील कारकिर्दीसाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री देखील दिली होती.

 

irrfan padmshree inmarathi

हे ही वाचा – अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता!

मध्ये त्याचा एक’ हिंदी मिडीयम ‘ नावाचा अत्यंत ह्यूमरस सिनेमा आला होता. एका महत्त्वाच्या विषयावर त्यात अत्यंत मार्मिकपणे भाष्य केलं होतं.

आणि त्याचाच पुढचा सिनेमा म्हणजे ‘ इंग्लिश मीडियम’. या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आणि त्याच वेळेस इरफान खानला दुर्धर कॅन्सरने गाठलं.

त्याला झालेला कॅन्सर हा कॅन्सरमधील देखील दुर्धर कॅन्सर. मार्च २०१८ मध्ये त्याच्या या आजाराचे निदान झालं. त्याला ‘ न्युरो इंडोक्राईन ट्यूमर’ झाला आहे, हे त्यानेच ट्विट करून त्यावेळेस सांगितलं होतं!

आणि त्याच्या उपचारासाठी तो लंडनला रवाना झाला. त्याच वेळेस खरंतर सगळ्यांच्याचं काळजात धस्स झालं पण इरफान सारखा अभिनेता त्यावरही मात करेल असा विश्वास वाटत होता.

आणि झालं देखील तसंच, तो बरा होऊन परत आला.

आणि नुसताच आला नाही तर त्याने हळूहळू काम देखील करायला सुरुवात केली. आपला अर्धवट राहिलेला ‘ इंग्लिश मीडियम ‘ हा सिनेमा पूर्ण केला.

कोरोनामुळे तो चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित करण्यात आला.

त्यात देखील त्याचा अत्यंत सहज सुंदर अभिनय पाहायला मिळतो.

इंग्लिश मीडियम या सिनेमात ,आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाप काय काय करतो याची गोष्ट आहे.

 

angrezi mediun inmarathi

 

आपल्या मुलीला लंडनमध्ये शिकायचं आहे तर तिकडे तिच्यासाठी जाणारा आणि तिचं स्वप्न पूर्ण करणारा बाप त्याने मस्त साकारला आहे.

राधिका मदनने या सिनेमात त्याच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे तर करिश्मा कपूर लंडनमधील पोलिसाच्या भूमिकेत आहे.

या सिनेमाची स्टोरी लाईन हीच आहे की, “स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी ते स्वप्न पूर्ण करा.” त्याने स्वतःच्या आयुष्यात देखील तेच केलेलं आहे.

त्याला अभिनेता व्हायचं होतं. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची त्याची तयारी होती. त्यानं ते केलं आणि कोणताही विशेष पाठिंबा नसताना केवळ स्वतःच्या हिकमतीवर मिळवले देखील.

कदाचित इंग्लिश मीडियम सिनेमाची हीच स्टोरी त्याला लोकांपर्यंत पोहोचवायची होती.

‘आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करा आणि ते पूर्ण करा’. हे सांगणारा हा सिनेमा प्रदर्शित झाला पाहिजे हे त्याचं पण स्वप्न असणार.

त्यासाठीच तो कदाचित त्या दुर्धर आजारातून बरा झाला. तो परत आला आणि त्याने शूटिंग पूर्ण केलं.

 

irrfan cancer inmarathi

 

सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर तरी रिलीज झाला आहे हे पाहिलं आणि आज तो या जगात नाही.

त्यामुळेच इरफान कायमचा स्मरणात राहील. त्याचा जीवनप्रवास जरी संपलेला असला तरी त्याने लोकांना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

तो त्याच्या अभिनयातून कायमच लक्षात राहील यात काही वाद नाही पण त्याचा अभिनय अजूनही लोकांना पाहायचा होता. म्हणूनच त्याचं असं जाणं चटका लावून जातयं…

मियाँ मकबूल, ये कुबुल नहीं …

===

हे ही वाचा – स्वतःहून बॉलिवूडच्या ‘लाईमलाईट’ पासून दूर राहिलेला ‘सच्चा’ अभिनेता – के के मेनन

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?