साथीच्या रोगांची भीती टाळण्यासाठी या सोप्या टिप्स वापरुन घर स्वच्छ ठेवणं आहे नितांत गरजेचं!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची भीती आहे. डिसेंबरच्या सुमारास चीनच्या वूहान मध्ये सुरू झालेल्या ह्या व्हायरसचा संसर्ग झपाट्याने सगळीकडे व्हायला लागला.
थोड्याच अवधीत अमेरिका, इटली ह्यासारख्या देशांत पसरून जवळ जवळ १८० देशांत ह्याने लाखोंच्या वर बळी घेतले. अजूनही ह्या व्हायरसची भीती गेलेली नाही.
अजूनही लोकं ह्या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यु पडत आहेत. ह्या विषाणूने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. लोकं जीव मुठीत घेऊन घरात बसली आहेत.
हे कधी संपणार कोणालाच माहित नाही. सगळीकडे गोंधळलेलं वातावरण आहे.
हळूहळू हा व्हायरस भारतात देखील पसरण्यास सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहिर करण्यात आली. २२ मार्चला भारतात जनता कर्फ्यू जाहिर झाला.
पुढे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे हे लक्षात घेऊन १४ एप्रिलपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आले. कोणीही घराबाहेर पडायचे नाही.
ह्या व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडायची होती पण, दुर्दैवाने तसे झाले नाही, हा विषाणू बळी घेतच राहिला.
कोणीही घराबाहेर पडायचे नाही. सर्व वाहने, दळण वळण, कंपन्या, ऑफिसेस्, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, विमाने बंद!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
घरातून अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडायचे नाही. पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार ह्यांची २४ तास ड्युटी सुरू झाली. रेडिओ, सोशल मिडिया, न्युज चॅनेल ह्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
घरी रहा, हात वारंवार २० सेकंद पर्यंत धुवा, दरवाज्याच्या कड्या, हॅंडल्स् ज्याला आपण वारंवार हात लावतो त्या गोष्टी स्वच्छ कराव्यात, टिश्यु पेपरने पुसाव्यात, तसेच घरातही सर्वत्र स्वच्छता राखावी इत्यादी!
–
- बऱ्याचशा रोगांचा, साथीच्या आजारांचा उगम आफ्रिका खंडामध्येच का होतो?
- साथीच्या रोगांमध्ये डॉक्टरांना १००% निरोगी ठेवणारा जबरदस्त आरोग्यपूर्ण आहार जाणून घ्या…!
–
परदेशात आता सांगतात शेक हॅंड करायचं नाही पण आपल्याकडे आधीपासूनच हात मिळवत नाहीत, नमस्कार करतात. बाहेरून आल्यावर हात-पाय धुवायची पद्धत आहे.
अशा अजूनही काही पद्धती आहेत ज्यांची आता परदेशात देखील दखल घेतली जात आहे. आज अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्या आपल्याला केवळ साथीच्या दिवसातच नाही तर वर्षभर घर स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोगी पडतील.
ज्यामुळे साथीच्या रोगांची भीती तर टळेलच पण वर्षभर स्वच्छता पण घरात राहील! संसर्गाची भीती टळते ह्या स्वच्छतेमुळे!
१) स्वच्छतेचं सगळं साहित्य घरात तयार ठेवावे
स्वच्छतेचं जे काही सामान आपल्याला लागतं त्याचा योग्य तो पुरवठा घरात असावा. पुरवठा कमी पडल्यास नीट स्वच्छता होऊ शकत नाही, म्हणून जे काही साहित्य लागेल ते योग्य प्रमाणात घरात हवं.
किंबहूना संपायच्या आधीच फ्लोअर क्लीनर, टॉयलेट किंवा बाथरूम क्लीनर आणि जे काही साहित्य असेल ते घरात जास्तीचं असू द्यावं.
पसारा, स्वयंपाकघरातील अतिरिक्त कचरा, स्वयंपाकाचे डाग हे स्वच्छ करणे गरजेचे असते, त्यासाठी घरात कायम स्वच्छतेचे सर्व साहित्य तयार असावे.
२) टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये फोन न नेणे
आज काल बऱ्याच जणांना आपला मोबाइल फोन टॉयलेट मध्ये नेण्याची सवय असते. टॉयलेटमध्ये हानीकारक जीवाणू, विषाणू असतात ज्याने तब्येतीवर परिणाम होतो.
टॉयलेट मध्ये आपण फ्लशला, नळाला, इकडे तिकडे हात लावतो आणि तेच हात आपण मोबाइलला लावतो.
ते जीवाणू किंवा विषाणू मोबाइलला लागतात, तोच मोबाइल आपण जेवताना देखील वापरतो, रात्री देखील झोपताना उशाशी ठेवतो.
ते विषाणू जेवणात, अंथरूणात सर्वत्र पसरतात. ज्यामुळे घरात विषाणूंचा संसर्ग होऊन आजारपण पसरते. त्यामुळे टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये मोबाइल फोन नेणे शक्यतो टाळावे.
३) वेळोवेळी जंतुनाशकांचा वापर करावा
आपल्या घरात काही काही ठिकाणी जंतुनाशकांची वारंवार गरज असते. जसे बेसिन, सिंक, टॉयलेट, बाथरूम इत्यादी. एक दिवसाआड किंवा दररोज येथे जंतुनाशकं वापरून साफसफाई करावी.
घरातली लादी, टेबल, पंखे वगैरे नीट पुसावे. सर्व खोल्यांचे केर काढावेत. जिथे जिथे धूळ साठते तिथे तिथे वारंवार साफ करणे अतिशय गरजेचं असतं.
कारण, धूळीतूनही विषाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळे, घरात वेळोवेळी जंतुनाशकांनी सफाई करावी. धूळ साचू देऊ नये.
घरातील इतर लोकांचा जिथे जिथे वारंवार स्पर्श होतो जसे हॅंडल, स्विच बोर्ड इत्यादी सर्व जागा साफ स्वच्छ ठेवाव्यात. पाण्याने स्वच्छ करता येणार नाहीत त्या जागा टिशु पेपरने पुसाव्यात.
–
- सगळ्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या WHO ची “ही” आर्थिक गणितं माहितीयेत का?
- सरत्या वर्षाने कोरोना, मास्क, सॅनिटायझरसोबतच ‘या’ गोष्टीही दिल्या!
–
४) आपण ज्या पिशव्यांमधून किराणा, भाज्या इत्यादी आणतो, त्या पिशव्या वेळोवेळी साफ कराव्यात
ह्या कोरोना व्हायरसच्या संसर्गातून वाचण्यासाठी ज्या काही चांगल्या सवयी लागल्या आहेत त्यापैकी एक सवय म्हणजे बाजारातून ज्यातून वस्तू आणतो त्या पिशव्या स्वच्छ करण्याची सवय लागली.
आपण बऱ्याचदा पिशवीमधून कच्चे मांस, मासे आणतो किंवा अशा काही भाज्या किंवा फळे आणतो त्यातून विषाणूंचे वहन होऊ शकते. त्यामुळे त्या पिशव्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात.
आपल्याला बाजारातून सामान आणलेल्या वस्तू ज्यातून आणतो त्या पिशव्या स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. आपण ही स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे.
५) टॉवेल वाळत घालणे किंवा व्यवस्थित पसरून ठेवणे
बऱ्याच जणांना आंघोळ झाल्यावर ओला टॉवेल पलंगावर किंवा इकडे तिकडे तसाच टाकून देण्याची सवय असते. पण तुम्हाला माहितेय? ह्या ओल्या टॉवेलवर बॅक्टेरिया जमा होतात.
ओला टॉवेल बॅक्टेरियांचं जन्मस्थानच असतं जणू, एव्हढेच नव्हे तर त्या ओल्या टॉवेलला काही काळानंतर दुर्गंध येतो.
त्यामुळे बॅक्टेरियाला रोखायचं असेल तर आणि दुर्गंधी टाळायची असेल तर ओला टॉवेल व्यवस्थित वाळत घालावा, इकडे तिकडे टाकू नये.
ह्याशिवाय आपला फ्रिज स्वच्छ ठेवावा, जास्त दिवस शिळे अन्न ठेवू नये.
स्वच्छतेच्या ह्या सवयी आपण वर्षभर पाळल्या तर साथीच्या रोगांची भीती कमी होते आणि वर्षभर आपले घरदेखील स्वच्छ राहते. त्यामुळे ह्या सवयी घरातील प्रत्येकाला असायलाच हव्यात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.