आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमिर खानचा ‘३ इडियट्स’ बहुतेक सगळ्यांनीच पाहिला असेलच, त्यातला शेवट तर आजही आठवला तरी आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट उभी राहते,
ती म्हणजे लडाख च्या उंच पर्वतांच्या मध्ये असलेला तो लेक! या सिनेमामुळे लडाख मध्ये बरीच लोकं येऊ लागले!
त्यातल्या त्यात फुंसुक वांगडू च्या शाळेने तर कित्येक जणांना वेड लावलं तसेच त्या घाटातल्या वळणावळणा च्या रस्त्यांनी तर लडाखचं एक वेगळंच चित्र आपल्या पुढ्यात मांडलं!
लडाख म्हणलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो बर्फाने अच्छादलेला सुंदर प्रदेश, निळेशार पाणी, आणि थंडी!
लडाख म्हणजे बर्फ़ाचे पांघरून घेऊन पहुडलेली धरा, हिरा उजेडात चमकतो तसे चमकणारे निळेशार पाणी.. जणू स्वर्गच.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
“भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख”
आज जर आपल्या भारतीय सैन्य नसते तर लडाख हा केंव्हाच चीनी लोकांनी ताब्यात घेतला असता, आणि म्हणूनच तिथली लोकं भारतीय आर्मीला खूप मानतात!
कारण जेंव्हा जेंव्हा त्या लोकांवर संकट ओढावलं तेंव्हा आर्मीनेच मदतीचा हात पुढे करून त्यांचं संरक्षण केलं!
आता लेह लडाख हे केंद्र शासित प्रदेशात सुद्धा मोडले जात असल्याने तिथे पर्यटनाला आणखीन चालना मिळेल आणि त्या प्रदेशाचा विकास होईलच!
–
- भारतातील या ५ जागांवर चक्क भारतीयांनाच परवानगी नाही!! जाणून घ्या
- स्वित्झर्लंड-यूरोप विसरा; आपल्याच देशात स्नो-फॉल बघायला जाण्यासाठी ७ बेस्ट जागा!
–
पण हा विकास करताना तिथल्या निसर्गाला, तिथल्या सौंदर्याला धक्का लागू नये एवढीच अपेक्षा! इतकं तिकडचं निसर्गसौंदर्य अफाट आहे!
मध्यम वयीन असो की तरुण असो सर्वांना खुणावणारं लडाख, जाऊन आल्यावर आयुष्यभर लक्षात राहणारे लडाख…
जाणून घेऊ या लडाख बद्दल काही खास गोष्टी..
१. आशियातील सर्वात मोठी दुर्बीण
लडाख मधील हंले ह्या दुर्गम गावात अशियातील सर्वात मोठी दुर्बीण आहे. ही दुर्बीण अवकाश प्रेमीचं आकर्षण असून ती ४५०० मीटर उंचीवर ठेवली आहे.
२. लडाख मधील अशी जागा जिथे ग्रॅव्हिटी चा सिद्धांत काम करत नाही
चुंबकीय टेकडी किंवा ग्रॅव्हिटी टेकडी असं या टेकडीचं नाव असून इथे माणूस आपोआप वर जातो? कसं काय?
आहो इथे रस्ताच असा बनविण्यात आलाय की तो आपल्याला वाटतो टेकडीवर आहोत पण तो खाली उतरायचा रस्ता आहे.
श्रीनगर ते लेह ला जाताना ह्या टेकडीचा अनुभव घ्यायला विसरू नका.
३. जगातील सर्वात उंच ब्रिज
सुरू नदी च्या काठावरचा हा ब्रिज जगातला सगळ्यात उंच ब्रिज आहे. भारतीय सेनेने हा पूल युद्ध प्रसंगी वाहतुकी साठी बनविला होता.
ह्या पुलाच्या डाव्या बाजूला वीज निर्मिती तलाव असून उजव्या बाजूला छान सरोवर आहे.
४. दोन कुबड असलेले उंट
लडाख ला गेल्यावर तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे ही नसतील असे दोन कुबडाचे उंट पाहायला मिळतील.
हे उंट गोबी वाळवंटातले असून ते -४० डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा जिवंत राहू शकतात.
५. सर्वात मोठे बर्फाचे मैदान
लडाख मध्ये सगळ्यात मोठे बर्फ़ाचे मैदान असून ते १९७० मध्ये निर्माण केले होते. ह्याचा वापर साधारण हिवाळा सुरू झाल्यावर करतात.
ह्या मैदानावर हॉकी तसेच अनेक बर्फावर खेळण्याजोगे खेळ खेळता येतात.
–
- पृथ्वीवरील या अत्यंत सुंदर ठिकाणांवर मनुष्य फारसा गेला नाहीये हे खरं वाटणार नाही…!
- महाराष्ट्रातील ही दहा ठिकाणे तुमची हिवाळ्यातील सहल एकदम भारी करुन टाकतील!
–
६. द्रुपका चे आगळे वेगळे कुंग फु
द्रुपका मठा मध्ये तुम्हाला अनेक पिवळा कुडता पायजमा घातलेले कुंग फु शिकणारे शिष्य मिळतील.
ह्यांची खास बात म्हणजे ते ४०० कि.मी. पेक्षा मोठी पद यात्रा काढून जागोजागी कचरा वेचून लोकजागृती करतात.
७. एकापेक्षा एक सुंदर आणि ध्यान करावे असे मठ
लडाख मध्ये एका पेक्षा एक सरस असे मठ आहेत, किंबहुना म्हणून च लडाख अनेक बौद्ध भिखु बांधवांचे आवडते ठिकाण आहे.
येथील “स्पितुक गुहा” हा टेकडीवर आलेला मठ सर्वात प्रसिद्ध आहे.
८. लडाख मधील नौकायन
जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत लडाख ला जाणार असाल तर आवर्णून करावी अशी गोष्ट म्हणजे झंकार आणि इंदू नदीच्या संगमावर नौकायन.
राफ्टिंग करणारे इथे बरेच जण असून मस्त निसर्गाचा आनंद लुटता येईल.
९. गुरुद्वारा पठार साहिब
हा अत्यंत फेमस गुरुद्वारा असून दरवर्षी हजारो लोक इथे दर्शनासाठी येतात. हा गुरुद्वारा गुरू नानक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनविला असून तो लेह कारगिल रस्त्यावर २५ किमी अंतरावर आहे.
१०. नुब्रा घाटी
लेह च्या घाटीत आल्यावर नुब्रा फिरणे अनिवार्य ठरते. नुब्रा नदीच्या काठी असलेल्या ह्या घाटीला अनेक पर्यटक येतात.
११. त्सो मोरीरी आणि पंगँग त्सो सरोवर
ह्या दोन सरोवरा इतकं स्वछ पाणी कुठच्या ही सरोवरात शोधून सुद्धा मिळणार नाहि. हे दोन्ही सरोवर इंडिया चीन बॉर्डर वर असून पंगतोंग प्लाटू ह्याठिकानी आहेत.
अनेक पर्यटक ह्या सरोवराच्या काठी निवांत निसर्ग सौंदर्य पाहत तासंतास बसून असतात.
१२. हेमीस राष्ट्रीय उद्यान
साऊथ आशिया मधील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे आपल्या लडाख मध्ये आहे. इथे चित्ते, तिबेटीएन कोल्हे, विविध प्रकारचे पक्षी आहेत.
१३. रोड ट्रिप :
आणि सर्वात शेवटी म्हणाल तर जगातील सर्वात धाडशी आणि अत्यंत धोकादायक रोड ट्रिप ही फक्त लडाख मध्ये आहे.
अत्यंत शार्प टर्न असलेला टेकडीचा रस्ता पाहून जीव घाबरायला होतो. एकदा आयुष्यात इथे गाडी चालवायचा अनुभव घ्यायला हवाच…
“भारतातील सर्वात चविष्ट मोमोस हे फक्त लडाख मध्येच मिळतात.”
वाचक हो, प्रत्येक भारतीयांचं काश्मीर आणि लडाख सहल हे स्वप्न असतं. तुमचं ही असेलच!
तेव्हा हे कोरोना संकट टळलं तिकिट बुक करा, बॅग भरा आणि वर दिलेल्या सर्व गोष्टींचा मनसोक्त अनुभव घेऊन लडाख सहल एन्जॉय करा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.