आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आयुर्वेदा मध्ये असं नमूद केलं आहे की, मानवी शरीर त्रिदोषांनी बनलेलं असतं. ते त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ! ह्या तिन्ही दोषांचं संतुलन असेल तेव्हाच आपलं शरीर निरोगी राहतं.
ह्यातील एक जरी असंतुलित झाला, कमी किंवा जास्त झाला तरी त्याचा आपल्या तब्येतीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ह्या त्रिदोषांचं संतुलन असणं खूप गरजेचं असतं!
या त्रिदोषांपैकी एक कफ आहे याची माहिती आज आपण या लेखातून घेऊया!
आज काल धुमाकुळ घातलेल्या कोरोना ह्या व्हायरसचा संसर्ग झाला तर कफ होतो, मग घसा खवखवतो. म्हणजेच कोरोनाचा संसर्ग झाल्यास मुख्य लक्षण कफ होणे हेच असतं.
==
हे ही वाचा : कोरोना काळात कोरडा खोकला सतावतोय? मग हे घरगुती उपाय आजच करा
==
त्यामुळे कफ ह्या लक्षणाला दुर्लक्षित करून चालणार नाही. कोरोना संसर्गाशिवाय काय असतात बरं ह्या कफ होण्यामागची कारणं? त्याला थांबवणं का गरजेचं असतं, काय उपाय असतात कफ दूर करण्याचे किंवा संतुलित करण्याचे?
ही संपूर्ण माहिती आज आपण ह्या लेखातून घेणार आहोत!
हा कफ साधा वाटतो पण, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. कफ होण्याची कारणं अनेक आहेत. ती कारणं आणि कफामुळे होणारे आजार पुढीलप्रमाणे आहेत –
* वातावरणात अचानक बदल होणे
आपल्या भारतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन मुख्य ऋतु आहेत. जेव्ह हे ऋतु बदलतात तेव्हा बऱ्याच जणांना कफ होण्याचा त्रास होतो.
उन्हाळा संपत आला की पावसाळ्याची चाहूल लागते त्यामुळे गरम वातावरण बदलून ते अचानक दमट, थंड होते. त्यामुळे बदलत्या तापमानाशी जुळवून घ्यायच्या आधी कफ होतो.
तसेच हिवाळा आणि उन्हाळ्यात देखील होते. पावसाळ्यात तर सारखा सारखा कफ होतो. दमट आणि थंड वातावरण त्यात सारखा पाऊस. पावसात भिजणे हे कफाचे मोठे कारण आहे.
* व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग
कफाचे सर्वात मोठे कारण संसर्ग हेही आहे. श्वसनमार्गाद्वारे व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. हा संसर्ग अत्यंत जलद गतीने होतो.
जर कफ झालेल्या माणसाच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली तर तिला देखील संसर्ग होतो. व्हायरस किंवा बॅक्टेरिया मुळे होणाऱ्या कफामुळे ताप सुद्धा येऊ शकतो.
हा संसर्ग खूपच जलद गतीने होतो. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी ह्यांसारख्या आजारांना तोंड द्यावे लागते.
* ऍलर्जी
==
हे ही वाचा : खोकला, सर्दी आणि व्हायरल फिव्हर टाळण्यासाठी कडु गोळ्यांपेक्षा हा चविष्ट उपाय नक्की ट्राय करा
==
बऱ्याचदा कफ होण्याच्या मागचं कारण ऍलर्जी हेही असू शकतं. ही ऍलर्जी कशाचीही असू शकते. काही जणांना उग्र वासाची ऍलर्जी असते, काहींना फुलांच्या वासाची ऍलर्जी असते.
काहींना संत्रं वगैरे सारख्या फळांची ऍलर्जी असते तर काहींना अत्तर किंवा परफ्युमची ऍलर्जी असते. ह्या पदार्थांच्या सेवना किंवा फुलाच्या वासामुळे मुळे कफ, सर्दी होऊ शकते.
बऱ्याच जणांना धुळीची देखील ऍलर्जी असते. जे कफाचे मुख्य कारण आहे.
* आहार
एखादा अती थंड पदार्थ, अती शीत पेयं, जास्त आंबट पदार्थ, अती खारट, तेलकट, तळकट, अती मसालेदार पदार्थ, जे माणसाच्या प्रकृतीला निषिद्ध मानलं गेलं आहे. अशा पदार्थांचं वारंवार सेवन केल्यामुळे देखील कफ होतो.
प्रकृतीच्या विरूद्ध आहार केला तरी कफ होतो. म्हणजेच ह्या त्रिदोषांपैकी एकाचं किंवा दोघांचं आपल्या शरीरात प्रमाण जास्त असतं.
वात ह्या दोषाचं प्रमाण जास्त असेल तर त्याला वात प्रकृती म्हणतात, कफ जास्त असेल तर कफ प्रकृती म्हणतात आणि पित्त जास्त असेल तर त्याला पित्त प्रकृती म्हणतात.
ह्याला अनुसरूनच आपला आहार असायला हवा. नाही तर गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.
* अती धूम्रपान
कफ होण्याचे आणखी एक कारण अती धूम्रपान करणे हे देखील आहे. धूम्रपानामुळे तीव्र कफ होऊन खोकला होतो. हा विशिष्ट प्रकारचा कफ असतो, त्यामुळे होणाऱ्या खोकल्याचा आवाजही तीव्र, विशिष्ट प्रकारचा असतो.
त्यामुळे हा खोकला धूम्रपानाचा खोकला म्हणूनच ओळखला जातो. धूम्रपानामुळे होणारा हा कफ अतिशय चिवट असतो, लवकर बरा होत नाही हा कफ.
त्याचप्रमाणे कारखान्यातील धूर किंवा वाहनांच्या धूरामुळे देखील कफाची समस्या उत्पन्न होते. ह्या धूरामुळे होणारा कफ देखील पटकन बरा होत नाही.
ह्या कफामुळे सर्दी, खोकला, भयानक डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप ह्यांसारख्या रोगांना सामोरे जावे लागते.
अती कफ झाल्यास खूप सर्दी, ताप, थकवा, भयंकर खोकला असे रोग होतात. त्यामुळे शरीरातील ताकद कमी होते आणि कमजोरी येते. घसा दुखायला लागतो, घसा खवखवतो आणि अन्न सेवन करणे कठिण जाते.
काही वेळा पाणी पिणेही मुश्किल होते. त्यामुळे नुसताच थकवा नाही तर चक्कर देखील येऊ शकते. अशक्तपणा, कमजोरी, चक्कर येणे असे गंभीर आजार होतात. जागचे उठणे देखील कठिण होते.
ह्या कफाच्या समस्येवरील उपाय –
* बदलत्या तापमानातील कफ बरा करण्यासाठी कोमट पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. त्याशिवाय थंडीत आणि पावसाळ्यात होणाऱ्या कफावर उपाय म्हणजे कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या करणे.
* व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाने होणार्या कफासाठी शक्यतो ज्याला संसर्ग झालाय त्याच्या संपर्कात येण्याचे टाळावे. (आत्ता कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळतो आहोत सगळे तसेच!)
त्यातूनही जर संपर्कात आलोच तर निलगिरी तेलाचा वापर करावा. कपड्यांना लावावे, त्याचा वास घेत राहावा.
* ऍलर्जी मुळे होणार्या कफासाठी ज्याची ऍलर्जी आहे त्या कारणापासून दूर राहणे हाच एकमेव उत्तम पर्याय आहे. फुलांची ऍलर्जी असेल तर फुलांपासून दूर रहावे.
धुळ साचू देऊ नये घरात किंवा कामाच्या ठिकाणी. अत्तर, परफ्युम वापरू नये. ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते पदार्थ टाळावेत.
* अती तेलकट, तळकट, आंबट, खारट पदार्थांचे सेवन करू नये. अती थंड पदार्थ, शीत पेयं ह्यांचे सेवन करू नये. मसालेदार पदार्थ टाळावेत.
==
हे ही वाचा : केवळ “व्हायरस”च नाही तर तुमच्या आजूबाजूच्या “या” गोष्टीही ठरतील घशासाठी घातक
==
आपल्या प्रकृती प्रमाणे आपला आहार ठेवावा. आहारावरती आपली तब्येत अवलंबून असते त्यामुळे, योग्य तोच आणि नियंत्रित आहार घ्यावा.
* धूम्रपान करणे टाळावे. धूम्रपाना करणाऱ्या माणसालाच नाही तर त्याच्या आजू बाजूच्या माणसांना देखील त्रास होतो. त्यामुळे धूम्रपान करू नये.
* प्रदुषण असणाऱ्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
* कफाचा जर अधिकच त्रास वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.