Site icon InMarathi

सोशल डिस्टंसिंगसाठी या रिक्षाचालकाने केलीये अनोखी युक्ती; चक्क आनंद महिंद्रांनी दिलीये जॉब ऑफर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण सध्या घरात बंदिस्त आहोत.

परंतु २४ तास घरात बसणंच अवघड आहे, तरीदेखील सध्या हे आवश्यक आहे. त्यातूनही आपल्याला काहीही महत्वाची कामं येऊ शकतात.

उदाहरणार्थ बँक, अत्यावश्यक सेवा किंवा घरात राहणाऱ्या गृहिणींना देखील भाजी आणणे, सामान आणणे या गोष्टी कराव्याच लागतात.

त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी घराच्या बाहेर जाण्याची आवश्यकता पडतेच.

परंतु बाहेर गेलो आणि कोरोना होण्याची भीती जास्तच असते, त्यामुळे बाहेर जाणं देखील नको वाटतं.

अशावेळेस आपण जर विशेष काळजी घेतली तर कुठलाही त्रास न होता आपण बाहेर जाऊ शकतो आणि कोरोनाचं संक्रमण होण्यापासून रोखू शकतो.

घरात बनवलेले मास्क आणि सोशल डिस्टनसिंग जर सांभाळलं आणि चेहर्‍यावर हात नाही नेला तर अवघड काही अवघड नाही.

 

business today

 

कोरोनाचा प्रसार पाहता अजून आपल्याला अनेक दिवस सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणारसं दिसतंय. ते पाळता यावं यासाठी लोक नवनवीन फंडे आजमावताना दिसतात.

सोशल डिस्टन्सिंगचा असाच एक फंडा आजमावलाय कोलकात्यातील एक रीक्षा ड्रायव्हरने. त्याच्या या करामतीला उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पण दिलीय दाद आणि केलीय त्याला जॉब ऑफर.

कोलकात्यातील एका रीक्षा ड्रायव्हरने आपल्या रिक्षाचे पाच भाग अशा तऱ्हेने केलेत की ज्यात रिक्षावाल्यासह पाच माणसे बसू शकतील, तरीही त्यांचा एकमेकांशी काहीही संपर्क येणार नाही.

त्यासाठी त्याने रिक्षाच्या मध्ये पार्टीशन केले आहे. मागे बसणारी चारी माणसे चार स्वतंत्र रकान्यात बसतील. ती एकमेकांना दिसणारही नाहीत, स्पर्श तर दूर अशी त्याने रचना केलेली आहे.

 

india today

 

त्याची ही डोकेबाज आयडीया सर्वांना खूप आवडलेय. सध्या त्याचा हा व्हिडिओ सगळ्या समाजमाध्यमांवरून खूप प्रसारीत होत आहे.

देशांतील बडे उद्योजक असलेले आणि वाहनांचे निर्माते महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा देखील त्याची ही करामत पाहून खुश झालेत. त्यांनी त्याच्या रिक्षाचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर वरून अपलोड केला आहे.

आणि सध्या त्या व्हिडीओची सगळीकडे खूप चर्चा सुरू आहे.

परंतु आनंद महिन्द्रा केवळ त्याचा व्हिडिओच अपलोड करून थांबलेले नाहीत, तर या रिक्षावाल्याला त्यांनी आपल्या कंपनीत नोकरी देखील देऊ केलेली आहे.

व्हिडिओ शेअर करताना आनंद महिन्द्रा यांनी टिप्पणी केली आहे की, आपल्या लोकांची परिस्थितीला अनुसरून त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेण्याची ही क्षमता पाहून मला थक्क व्हायला होते.

आम्हाला आमच्या आर ऍन्ड डी विभागात प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीमचा सल्लागार म्हणून याला नेमायलाच हवं. आनंद महिन्द्रा एवढं बोलूनच थांबलेले नाहीत.

त्यांनी आपल्या महिंद्रा ऍन्ड महिन्द्रा कंपनीच्या ऑटो ऍन्ड फार्म सेक्टर्सच्या एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर, राजेश जेजुरीकर यांना या ड्रायव्हरला आपल्या कंपनीतील प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीमचा सल्लागार म्हणून नेमून घेण्याबद्दल सल्ला देखील दिला आहे.

 

 

त्यांनी हा व्हिडीओ अपलोड केल्यापासून त्याला २२००० लाईक्स मिळालेले आहेत आणि ४००० रीट्विट्स झाले आहेत. कोलकात्यात या बॅटरी रिक्षाला टुक टुक रीक्षा म्हणत असावेत.

त्यामुळे एका ट्विटर युजरने या रिक्षाला, ‘क्वारंटाईन टुक-टुक’ असे नावही देऊन टाकले आहे. सगळीकडे या ड्रायव्हरचे कौतुक होत आहे.

कदाचित येत्या काळात अशाच प्रकारे बदललेल्या स्वरुपातल्या रीक्षा रस्त्यावरून धावताना आपल्याला दिसतील. सध्या रीक्षात बसताना आपल्याला दाटीवाटीने बसावं लागतं.

नाईलाजाने अनोळखी व्यक्तींनाही खेटून बसावं लागतं. त्यात स्त्री-पुरुष दोन्ही अनोळखी बसले की त्यांना बसताना अवघडल्यासारखेही होते.

 

et auto

 

त्यामुळे जर अशा रीक्षा निघाल्या, तर केवळ कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंगचाच प्रश्न सुटणार नाही, तर या बाकीच्या अडचणी देखील दूर होतील.

यावरून हेही दिसून येते की कल्पकतेचा संबंध पुस्तकी शिक्षणाशीच जोडलेला असतो असं नाही. एक सामान्य माणूस देखील आपल्या डोक्यातून अशा भारी भारी कल्पना आणून राबवू शकतो.

अशा सामान्य पण कल्पक माणसाच्या कल्पनेची कदर करणारे आनंद महिंद्रासारखे मोठ्या मनाचे मोठे लोक देखील आपल्या देशात आहेत. या दोघांचेही कौतुक आणि दोघांचाही आपल्याला अभिमान वाटेल असंच हे उदाहरण आहे.

दरम्यान भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असलेला दिसतोय. आतापर्यंत जवळपास २३,४५२ पर्यंत हा आकडा पोचलेला आहे. आणि आपल्याला त्याच्याशी लढत द्यावी लागणार आहे.

त्यामुळे अशा प्रकारे ताबडतोब आपल्या रिक्षेत बदल करून घेणारा हा ड्रायव्हर म्हणजे आशेचा एक किरण आहे. परिस्थितीवर मात कशी करायची हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे.

त्यामुळे कोरोनाशी लढण्याकरता प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात अशा नवीन नवीन कल्पना शोधून काढेल आणि या विषाणूवरही मात मिळवेल यात शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version