वेबसिरीज : मनोरंजनाचा नवा डिजिटल रंगमंच!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
भारतात सध्या webseries ला सूगी चे दिवस आलेत अन त्यांना पेव पण खुप फूटलाय. YouTube उघडलं की कुठल्याना कुठल्यातरी webseries चा webisode trending मधे असतोच. या webseries आपल्या एवढ्या अंगवळणी पडल्या आहेत की यातल्या characters ची नावे सहजपणेे आपण आपल्या मित्र/मैत्रीणींना देतो, कळत नकळत यातले कित्येक dialogues रोज वापरतो.
“गुंडे नही entrepreneurs है bc” मग entrepreneurs च्या जागी engineers है, singal है, hostilities है असे शब्द वापरून बोलले जातात. Mikesh च्या style मधे cooool किंवा चितवन सारख “बाआबा” म्हणणं असेल किंवा मग निपुण ने “बोच्या” or कुशलने “आई**ड्या” या पुनरुज्जीवीत केलेल्या शीव्या सर्रास वापरल्या जातात. हे dialogues अन webseries हा काय प्रकार आहे हे माहीत नसणं म्हणजे आजकाल मागासलेपणाच लक्षण समजलं जातं.
भारताला webseries पहायची सवय लावण्याच खर श्रेय जर कुणाला जात असेल तर ते Tvf (the viral fever) यांना! सध्याच्या webseries च्या दुनियेतील त्यांना अनभिषिक्त सम्राट म्हटंल तरी वावग ठरणार नाही. Tvf pitchers या त्यांच्या webseries ला IMDb वर 9.4/10 rating आहे, जे भारतातल्या आजपर्यंतच्या serials ला मिळालेल्या ratings मधे सर्वांत जास्त आहे.
“अर्नभ कूमार” अन त्याच्या engineering च्या मित्रांनी मिळून स्वतःच film making चं वेड Tvf च्या स्वरुपाने 2010 पासून वेगळ्या प्रकारे लोकांसमोर मांडल. चाकोरीबद्ध पद्धतीने सिनेमा न बनवता, नविन वाटेची कास धरत त्यांनी चित्रपट, खेळ, राजकारण यांसारख्या विषयांवर स्वतःच्या शैलीने आपल्या webseries मधून प्रभावी भाष्य केले आहे.
तसा भारतात webseries बनवण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न हा 2009 मधे प्रतीक अरोरा याने केला होता. Company Bahadur नावाची 18 episodes ची sitcom/office comedy प्रकाराची webseries त्यांनी बनवली होती (YouTube वर उपलब्ध आहे).
webseries चे जनक ज्यांना म्हणता येईल ते म्हणजे Scott Zakarin यांनी 1995 साली the sopt नावाची first episodic online story बनवली होती जी खुप प्रसिद्ध झालेली अन तिथून पुढे webseries चा प्रवास सुरू झाला.
रटाळवाण्या अन तेच तेच दाखवणार्या daily soaps, reality चा अभाव असणारे reality shows यांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना webseries हा उत्तम पर्याय मिळाला. विशेषतः तरुणाई webseries कडे आकर्षित होण्यामागील प्रमुख दोन कारण म्हणजे webseries मधली भाषा अन त्यामधुन हाताळलेले विषय! तरुणांच्या रोजच्या जगण्यातील भाषा मग ती शिवराळ असेल, हिंग्लीश असेल तरी webseries मधे त्यांचा खूबीने वापर केलेला असल्याने त्यातल्या व्यक्तीरेखा या खूप जवळच्या वाटतात. तसंच आज पर्यंत ज्या विषयांवर बोललं गेलं नव्हत किंवा आजच्या काळानुरुप जे विषय मांडण गरजेच आहे त्या विषयांना हे निर्भीडपणे दाखवतात.
उदाहरणार्थ,
- भारतात सर्वात लोकप्रिय झालेली webseries म्हणजे- “Tvf pitchers“! यामध्ये start-up सारखा आजच्या तरुणांच्या आवडीचा तसच अनेक तरुणांना ऊद्योजकतेकडे वळण्यास प्रेरणा देणारा विषय खुप छान दाखवला आहे.
- मुलींचे प्रश्न वेगळ्या पद्धतीने जगाला सांगण्याचा प्रयत्न “Men’s World“मधुन केला आहे.
- “Life sahi hai“ मधुन bachelor मुलांच्या आयुष्यातल्या गमती जमती दाखवल्या आहेत.
- artificial intelligence सारखा वैज्ञानिक विषय “A.I.S.H.A.“ मधुन हाताळला आहे.
- लहान शहरातुन अलेली मुलगी मोठ्या शहरात स्थिरावतांना तिला येणार्या अडचणी “Girl in city” मधुन सांगितल्या आहेत.
- नवरा बायकोच्या नात्यातले कडू-गोड प्रसंग विनोदी अंगाने SIT चॅनलच्या “Men real victim“ मधून दाखवले आहेत.
हिंदी मधे एवढे प्रयोग चालु असताना मराठी कलाकार मागे कसे राहतील? कुशल बद्रीके अन संतोष जुवेकर यांची struggle वर अधारित “Struggler Sala“ मधली दोघांची chemistry पहायला मजा येते.
निपुण अन अमेय यांचा “Casting Couch“ या विचीत्र नावाचा मुलाखत व त्यातुन promotion चा अतरंगी प्रयोग मस्त आहे.
अशी रोजच्या आयूष्यातले नानाविध विषय ऊपहसात्मक,विडंबणात्मक, विनोदी पद्धतीने अन सोप्या भाषेत webseries मांडतात.
webseries चे “अर्थकारण” हे subscribers अन views यांवर आधारीत असते. webseries बनवणार्या चॅनलला YouTube वर किती subscribers आहेत व त्यांच्या webisodes ला किती views मिळतात याच्या गणितावरुन YouTube कडून त्यांना पैसे मिळतात. पण जेव्हा पासून YouTube वर offline video save करण्याचा पर्याय ऊपल्ब्ध झाला तेव्हा पासून अनेक चॅनल्सनी स्वतःची website/app बनवले असून त्यावर ते webseries release करतात. याची सूरवात Netflix या कंपनीने 2013 मधे स्वतःच app काढून केली. त्यांची पहिली webseries “House of cards” ला एव्हढा प्रचंड प्रतीसाद मिळाला की आज Netflix जगातील 190 देशांमधे पोहचलेल आहे.
याच धर्तीवर Tvf ने TvfPlay नावाचं स्वतःच app & website बनवून आपल्या प्रतीस्पर्धी असलेले AIB, EIC, SIT यांच्यापेक्षा एक पाऊल पूढे आहेत.
पण, तरुणाई वर webseries बनवायची म्हणजे हातात दारुचा ग्लास, बोटांमध्ये सुट्टा/जाॅईंट, तोंडात शीव्या, अंग प्रदर्शन अन कथेत अश्लीलता असली म्हणजे webseries हीट होते हा जो काहींचा गैरसमज आहे तो त्यांनी काढुन टाकण गरजेच आहे.
काही दिवसां पुर्वी YouTube वर “fuckar niwas“ नावाच्या webseries चा पहिला webisode आला होता, तद्दन फालतू विनोद अन बाष्कळ कथानक होत. त्यासाठी त्यांना खूप शीव्या व negative कमेंटस भेटल्या की शेवटी त्यांना तो webisode YouTube वरुन काढुन घ्यावा लागला.
अाज ज्या webseries मोठ्या व प्रसिद्ध झाल्या त्या त्यातल्या विषयांच्या अन सादरीकरणाच्या नाविण्यामूळे प्रसिद्ध झाल्या आहेत. अन्यथा content खराब असेल तर टाकलेला webisode काढुन घेण्या ईतपत वाईट वेळ येते.
क्युंकी “ये पब्लीक है,सब जानती है।”
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi