आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
काही महिन्यांपुर्वी सगळं काही सुरळीत असताना अचानक कोरोनाच संकट घोंगावत भारताच्या दिशेने आले.
मग लॉकडाऊन, संचारबंदी यांसारख्या नियमांमध्ये संपुर्ण देशचंं अडकला.
सगळीकडे अचानक आलेल्या ह्या संकटामुळे आपला बिझनेस सुरक्षित प्रकारे कसा सुरू ठेवता येईल ह्याचा विचार सुरू झाला.
सगळी कडे सोशल डिस्टनसिंग आणि वर्क फ्रॉम होम सुरू आहे.
ज्यांना ह्या आधी घरून काम करत येत होता ते तर घरी आहेत च पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना ह्या कोरोना मुळे घरून काम करायला मिळतंय.
आपणास माहीत आहे की, ह्या आधी सुद्धा आयटी आणि डिझाईन मधील लोक घरून करत असत. त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम ही काही नवीन गोष्ट नव्हती.
परंतु आता सर्वच क्षेत्रातील लोक घरून काम करत आहेत.
“कोण कोण घरून काम करतंय?
आयटी व्यतिरिक्त विचाराल तर बँकिंग क्षेत्रातील लोक घरून काम करत आहेत, सर्व व्यवहार करण्यासाठी लागणारे सर्व सॉफ्टवेअर घरून वापरून त्यांचे काम ते करत आहेत.
आता तर शिक्षक सुद्धा घरुन काम करत आहेत. ऑनलाइन क्लास घेऊन ते मुलांना शिकवत आहेत.
कॉलेज प्रमाणे दिवस भराचे टाइम टेबल ठरवून ४५ मिनिटांचे एक या प्रमाणे विविध विषयांचे लेक्चर घेतले जात आहे.
कॉल सेंटर चे लोक सुधा घरुन काम करून लोकांना आपली सर्व्हिस पोचवत आहेत.
काही डॉक्टर सुद्धा वेगवेगळ्या ऍप च्या माध्यमातून लोकांना किरकोळ आजारात फोन वरून तक्रार विचारून औषध सांगत आहेत.
बऱ्याच मध्यम स्वरूपाच्या किराणा मालाच्या दुकान दारांनी सुद्धा ऑनलाइन ऑर्डर मागवून घर पोच पुरवठा सुरू केला आहे. हे असे कित्येक लोक आहेत.
ह्या घरून काम करण्याचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत.
एकीकडे आपण कोरोना महामारी पासून स्वतःला वाचवतोय तर दुसरीकडे आपण घरून काम करताना कॉम्पुटर मोबाईल, लॅपटॉप, आय पॅड इत्यादी वापरून आपल्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण देत आहोत का?
ह्याच उत्तर आहे, हो…
डोळे हा अत्यंत नाजूक अन महत्वाचा अवयव असून जेव्हा वर्क फार होम अनिवार्य ठरते तेव्हा डोळ्यांची काळजी घेणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक ठरते.
खाली दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपल्याला डोळ्यांची काळजी घेण्यास नक्कीच फायदा होईल..
१. डोळ्यांना मसाज –
दिवसातून किमान २ वेळा डोळ्यांना थंड पाण्याने मसाज करणे उपयुक्त ठरू शकते. कोरफडीचं जेल वापरुन १० मिनटे डोळे मिटून बसावे.
ह्याने सलग स्क्रीन पाहून डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.
कोरफड नसल्यास काकडीचे काप डोळ्यावर ठेऊन १० मिनिटे डोळे बंद करून बसावे. डोळ्यांना अराम मिळून पुन्हा डोळे टवटवीत होतील.
२. नियमीत अन ठराविक वेळेनंतर ब्रेक –
दिवसभर आणि सलग काम करण्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्रास होऊ शकतो, हे टाळायचे असेल तर किती ही महत्वाचे काम असो, ओण ठराविक वेळे नंतर ब्रेक घेणे आवश्यक आहे.
ह्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
३. पुरेसा प्रकाश आणि योग्य उपकरणांचा वापर –
आपण जिथे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर काम करत असू, त्या खोलीत पुरेसा प्रकाश असावा.
आजकाल डोळ्यां प्रमाणे कॉम्पुटर ला पण कव्हर मिळतं तो लावला असता स्क्रीन मधून येणारी किरणे अडतात आणि कमी त्रास होतो.
४. लॅपटॉप किंवा कॉम्पुटर स्क्रीन सेटिंग –
लॅपटॉप किंवा कॉम्पुटर सेटिंग हवी तशी बदलता येते. लेटर चे फॉन्ट मोठे असावे, फार भडक रंगात काही टाईप करून नये अथवा लिहू नये.
ब्राईटनेस हा डोळ्यांवर ताण येईल असा नसावा. बाहेरील प्रकाश पाहून ब्राईटनेस कमी अथवा जास्त करावा. शक्यतो बॅक ग्राउंड कलर हा हिरवा अथवा फिकट निळा असावा.
५. २०-२०-२० नियम –
ह्याचा अर्थ २० मिनिट काम केल्यानंतर २० सेकंदा साठी २० फूट दूर असलेल्या कुठल्याही वस्तू कडे पाहावे. ह्यामुळे डोळयांना त्रास होत नाही.
काम करत असताना ठराविक वेळेनंतर विश्रांती घ्यावी. प्रत्येक २० मिनिट काम करून झाल्यावर हिरव्या रंगाकडे पाहावे ज्याने डोळ्यांना आराम पडतो.
६. कॉम्पुटर स्क्रीनला सुद्धा कव्हर बसवून घ्यावे –
ज्यांना आधीच नंबर चा चष्मा असेल त्यांनी अँटी रिफ्लेक्षण काच वापरावी. रोज डोळ्यातील बुबुळ डोळे मिटून घड्याळाकृती आणि त्या विरुद्ध अशी प्रत्येकी २० वेळा फिरवावी!
ह्या व्यायामाने डोळयांना आराम मिळतो.
७. एर्गोनॉमिक्स –
मित्रानो ईंडस्त्री मध्ये काम करत असताना वरील संज्ञेचा अनेक दा वापर केला जातो.
वरील प्रकारात आपल्याला आपण कसे बसावे, कॉम्पुटर डोळ्या पासून किती अंतरावर असावे, खुर्चीचा बाक किती असावा, स्क्रीन कडे पाहताना मानेचा कोन कोटी अंशात असावा,
ह्याबाबत अगदी सविस्तर माहिती ती दिली आहे जी गूगल वर आरामात मिळेल, ती वाचून आपल्या बसण्यात योग्य तो बदल करा जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही.
वाचक हो, वर्क फ्रॉम होम हे येणाऱ्या काळात अनिवार्य होणार आहे. सध्या परिस्थिती पाहता येणाऱ्या ६ महिन्यात अनेकदा ठराविक काळासाठी घरून काम करावे लागेल.
तेव्हा आपल्या डोळ्यांची काळजी घेणं आपल्या हातात आहे. वरील सूचनांचे पालन केल्यास नक्कीच आपले डोळे सुरक्षित राहतील याची खात्री बाळगा…!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.