‘ब्रेथलेस’ गाण्याचा इतिहास: ‘शंकर-एहसान-लॉय’ हे त्रिकुट नेमकं कसं जुळलं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
साधारण ९० च्या दशकातली ही गोष्ट आहे ही! ‘कोइ जो मिला तो मुझे ऐसा लगता था….’ ह्या एका गाण्याने सर्वत्र खूपच हंगामा केला होता. हे गाणे होते, ‘ब्रेथलेस’, जे शंकर महादेवन यांनी गायले होते.
एका श्वासात गायलेले हे गाणे अशीच सर्वत्र ओळख झाली होती ह्याची. शंकर महादेवननी ह्यात कमाल केलीये, गाणं बर्यापैकी मोठं आहे, एका श्वासात गायचं ही खूप मोठी गोष्ट आहे.
तरीही ह्या गाण्यातले सगळे शब्द व्यवस्थित समजतात.
अजूनही ते गाणं कधी संपूच नये असं वाटतं. तेव्हा खूप मुश्किलीने ह्या गाण्याचे शब्द बऱ्याच जणांनी पाठ केले होते!
३ मार्च १९६७ रोजी मुंबई मधील चेंबूर येथे शंकर महादेवन ह्यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी वीणा शिकायला सुरुवात केली.
त्यांचे गुरू होते टी.आर.बालमणी! वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी स्टेज परफॉर्मन्स् दिला.
त्यानंतर त्यांची ओळख त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या संगीतकार श्रीनिवास खळे ह्यांच्याशी झाली. इकडे सुरांची ओळख पक्की झाली.
स्टेज परफॉर्मन्स कसा द्यायचा, प्ले बॅक सिंगिंग कसे करायचे ह्याच्याशी ओळख होऊ लागली. त्या काळामध्ये मुलांना डॉक्टर्स्, इंजिनिअर्स बनवावे असे त्यांच्या पालकांना वाटायचे.
शंकर महादेवन ह्यांनाही आपण इंजिनिअर व्हावे असे वाटायचे, त्यातही तेव्हा कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणजे अगदी भारीच!
तसंच शंकर महादेवन ह्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि नंतर ओरॅकल साठी काम करू लागले.
तेव्हा त्यांच्याकडे म्युझिक संदर्भात अनेक प्रोजेक्टस् होते, मग एका क्षणाला त्यांनी विचार केला संगीत की नोकरी एकच काही तरी करायला हवे आणि त्यांनी संगीत हा पर्याय निवडला!
आणि सुरुवात झाली एका नवीन संगीत पर्वाला! संगीत प्रेमींसाठी ही नवीन पर्वणीच होती जणू!
वास्तविक ते एकंच गाणं नव्हतं शंकर महादेवन यांनी गायलेलं! हिंदी, तमिळ, तेलुगु ह्या भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली. पण, ह्या गाण्याने सगळे रेकॉर्डस् तोडले तेव्हा!
पण तुम्हाला माहितेय का की खरंच हे गाणं एका श्वासात गायलं का शंकर महादेवन यांनी? आज आपण बघूया ह्या गाण्यामागचा सगळा इतिहास!
एका इंटरव्ह्यु मध्ये शंकर महादेवन यांनी ह्या गाण्यामागचा इतिहास उलगडून सांगितला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
ते म्हणाले की, ह्या गाण्याच्या आयडिया वर जावेद अख्तर आणि शंकर महादेवन ह्यांनी खूप विचार केला. खूप चर्चा केली.
ह्या कॉन्सेप्ट वर काम करायला लागतं, त्याच्या मेलोडी वर मेहनत घ्यावी लागते त्याच्या ऍरेंजमेंट साठी खूपच काम करावं लागतं, बर्याच गोष्टींवर काम करावं लागतं,
हे जुळून यायला खूप वेळ जातो, खूप मेहनत लागते. एका झटक्यात होणारी ही गोष्ट नाही. ह्या गाण्यावर गीतकार जावेद अख्तर आणि गायक शंकर महादेवन तसेच इतर वादक वगैरे कलाकार ह्यांनी खूप मेहनत केली.
शंकर महादेवन ह्यांनी ब्रेथलेस गाणे गाताना ३ वेळा श्वास घेतला आहे पण, तो कोणालाही कळणार नाही असा घेतला आहे.
हा खुलासा त्यांनी स्वतः अनेक इंटर्व्ह्यु मधून केला आहे. खरंच काय कमाल आही ना! गाण्याचं इतकं कौशल्य, श्वासावरती इतका कंट्रोल की समजतही नाही कुठे घेतलाय!
त्यानंतर त्यांची गायक म्हणून कारकिर्द तर बहरलीच पण, त्याबरोबरच त्यांनी आणि त्यांच्या अजून दोन साथीदारांनी संगीत दिलेले चित्रपट, जाहिरांतीच्या जिंगल्स् लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या.
कोण हे दोन साथीदार? तर ते आहेत एहसान आणि लॉय हे दोघे अवलिया!
ह्या त्रिकूटाने अनेक चित्रपटांना आणि जाहिरातींना संगीत दिलं आहे जे सगळ्या प्रेक्षकांना खूपच आवडले.
दिल चाहता है, कल हो ना हो, बंटी और बबली, कभी अलविदा ना कहना ह्यासारखे अनेक हिट चित्रपट, रिलायन्स, एअरसेल ह्यासारख्या कंपन्यांच्या जाहिरातींच्या सिग्नेचर ट्युन्स् ल्लोकप्रिय झाल्या.
“इन्स्टंट कर्मा” हा त्यांचा म्युजिक बॅंड पण आहे. पण ह्या तिघांची ओळख, मैत्री कशी झाली माहितेय? चला तर मग बघूया ह्या तिघांची मैत्री कशी झाली ते!
कोका कोला आणि पेप्सी (तेव्हाचं लेहेर पेप्सी) ह्यांच्यात १९९४-९५ च्या दरम्यान खूप स्पर्धा होती. त्यामुळे त्यांच्या जाहिरतींवर देखील खूप खर्च केला जायचा.
जाहिरातींचं बजेट खूप असायचं. लेहेर पेप्सीची तेव्हा जाहिरात आली होती त्यामध्ये जुही चावला आणि रेमो फर्नांडिस होते.
ह्या जाहिरातेचे डायरेक्टर होते मुकुल एस्. आनंद ह्यांनी आणि संगीत दिले होते ह्या शंकर, एहसान आणि लॉय ह्या त्रिकूटाने. ही त्यांची एकत्र काम करण्याची पहिलीच वेळ होती.
शंकर, एहसान आणि लॉय ह्यांचे काम मुकुल आनंद ह्यांना खूपच आवडले आणि एक दिवस त्या तिघांना बोलावून सांगितले माझ्या आगामी चित्रपटासाठी तुम्ही संगीत द्यायचे आहे.
आगोदर तर त्या तिघांना ते खरेच वाटत नव्हते, मुकुल आनंद मस्करी करतायत असेच वाटले ह्या तिघांना! पण त्यांनी “दस” ह्या चित्रपटाला तुम्ही संगीत देणार आहात हे सांगितले.
‘दस’ हा त्यांचा तिघांचा एकत्र काम केलेला पहिलाच चित्रपट होता. चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच मुकुल आनंद ह्यांचे निधन झाले.
चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही पण, ह्या त्रिकूटाने जे गाणं बनवलं होतं ते सुपर डुपर हिट झालं आणि ते गाणं होतं ‘सुनो गौरसे दुनियावालों बुरी नजर ना हम प डालो…. ’!
तेव्हा हे गाणं सगळ्या शाळा आणि कॉलेजेसच्या ‘ऍन्युअल फंक्शन’ मध्ये असायचंच!
त्यानंतर ह्या तिघांनी कायम एकत्र काम करायचं असं ठरवलं आणि त्यांचा ऑफिशियली रिलीज झालेला पहिला चित्रपट होता “मिशन काश्मीर”!
ज्याचं संगीत आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत, लोकं आजही त्यातील गाणी गुणगुणतात. त्यातील बुमरो बुमरो आणि आया हों मैं प्यार का नगमा सुनाने (रिंदपोशमार) ह्या गाण्यांवर परफॉर्मन्स करतात.
त्यातील “चुपके से सुन इस पल की धुन” आणि “सोचो के झिलों का शहर हो” ह्या हळुवार गाण्यांनी सगळ्यांनाच भुरळ पाडली.
त्यानंतर ह्या तिघांनी मागे वळून नाही बघितले कधीच!
दिल चाहता है, कल हो ना हो, बंटी और बबली ह्या चित्रपटांपासून आजतागायत हे तिघे जवळ जवळ २५ ते २६ वर्षे एकत्र काम करत आहेत,
आणि त्यांच्या चित्रपटांमधली जवळ जवळ सगळी गाणी हिट होतात हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.