आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
आपल्याला सतत काही ना काही माहिती हवी असते. आपल्याला रोजच्या आयुष्यात खूप काही अडत असतं, आपल्याला बर्याचशा गोष्टी माहित नसतात.
एखाद्या गाण्याची माहिती हवी असते, कधी चित्रपटाबद्दल माहिती हवी असते. कधी कोणत्या तरी स्थळाची माहिती हवी असते तर कधी एखाद्या फळाची माहिती हवी असते!
तर कधी एखाद्या फेमस व्यक्तीची माहिती! कधी एखाद्या ग्रंथाची माहिती हवी असते तर कधी एखाद्या झाडाबद्दल माहिती हवी असते.
कधी खगोलशास्त्राची माहिती हवी असते तर कधे पृथ्वीच्या उत्पत्तीची माहिती हवी असते.
थोडक्यात काय? तर आपल्याला सारखं काही ना काही माहित करून घ्यायचं असतं. मग ती माहिती वैयक्तिक कामासाठी असो किंवा ऑफिशियल कामासाठी!
मग ते माहित करून घ्यायला आपण काय करतो? तर उत्तर आहे अपण गुगल सर्च करतो आणि पहिला ऑप्शन येतो ‘विकिपिडिया’ किंवा आपण डायरेक्ट विकिपिडिया शोधतो.
आपण खात्रीशीर माहिती विकिपिडिया वर मिळेल असे इतरांनाही सांगतो.
ते ‘लुंगी डांस’ गाणं नाही का? त्यात नाही का एक ओळ आहे “घर पे जाके तुम गुगल कर लो, मेरे बारे में विकिपिडिया पे पढ़ लो”!
थोडक्यात काय तर विकिपिडिया हे असं माहितीचं भांडार आहे जिकडे सर्व माहिती आपल्याला सहजतेने मिळते.
आपल्याला पण पूर्ण खात्री असते की आपल्याला ज्याची माहिती हवीये ती विकिपिडिया वर नक्कीच मिळेल.
पण तुम्हाला माहितेय का? कसं येतं ह्या खजिन्यात ज्ञान? विकिपिडियाला ही माहिती कोण पुरवतं? ह्या खजिन्यात ही माहिती कशी येते? कोणाचं डोकं आहे ह्यामागे? कोणाचं आहे ‘मास्टर माईंड’ ह्यामागे?
इतके माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख कोण लिहितं? तुम्हाला पण उत्सुकता असेल ना? चला तर मग! आज आपण ही सगळी माहिती घेऊया विकिपिडियाबद्दल!
स्टिव्हन प्र्युट (Steven Pruitt) हे त्या माणसाचे नाव आहे जो विकिपिडिया चा मास्टर माईंड आहे.
व्हर्जिनिया येथे राहणारा हा माणूस इतका ग्रेट आहे की गेल्या १३ वर्षांत त्याने जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त संपादने केलीत आणि ३५,००० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत.
म्हणजे विकिपिडिया वरील इंग्लिश विकिपिडिया वरील एक तृतीयांश माहिती ह्या एकाच माणसाने पुरवली आहे. आहे की नाही ग्रेट?
इ.स. २०१७ मध्ये टाइम्स् मॅगेझिनने इंटरनेटवरील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी केली त्यात एक नाव स्टिव्हन प्र्युट आहे. यावरून ही व्यक्ती किती ग्रेट आहे हे लक्षात येतं.
एका दशकापेक्षा जास्त काळ ते सेर मान्टिओ दी निकोलाव्ह ह्या नावाने (त्यांच्या आवडत्या ऑपेरा कलाकाराला वाहलेली आदरांजली आहे) एका वेब पेज वर काम करत आहेत.
ती साइट म्हणजेच विकिपिडिया आणि त्या साइटचे नाव आहे https://en.wikipedia.org/wiki/User:Ser_Amantio_di_Nicolao.
त्यांनी पहिला लेख लिहिला होता तो William & Mary college मध्ये असताना. ते इतिहास विषयाचा अभ्यास करत होते.
इतिहास त्यांचा आवडता विषय आहे, त्यामुळे ह्या अशा ऐतिहासिक लेखांसाठी त्यांनी खूप योगदान दिले आहे.
विकिपिडियावरील त्यांच्या पहिल्या लेखाचा विषय पीटर फ्रान्सिसो हे होते जे क्रांतिकारी युद्धात सार्जंट होते आणि स्टिव्हन प्र्युट ह्यांचे महान आजोबा होते!
आज स्टिव्हन प्र्युट हे एका लेखासाठी कमीत कमी ३ तास घालवतात आणि त्यासाठी ते काहीही मूल्य आकारत नाहीत!
लेख लिहिणे माहिती देणे हा त्यांचा छंद आहे आनि त्यासाठी मूल्य आकारणे त्यांना पटत नाही.
त्यांनी त्यांचा संध्याकाळचा वेळ आणि वीकेण्ड हा वेळ त्यांनी सक्तीने आणि सातत्याने फक्त वेबसाइट साठी काम करण्यासाठी राखून ठेवलाय.
वॉशिंग्टन डी.सी. येथील यू.एस. सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण येथे माहिती आणि प्रशासन विभागासाठी काम करणारे अधिकारी देखील विकिपिडियाच्या माहितीवर समाधानी आहेत!
आणि ते विकिपिडियाचे योग्य माहितीसाठी आभार मानतात.
स्टिव्हन प्र्युट यांनी केवळ संपादकीय किंवा ऐतिहासिक माहितीपर लेख लिहिले असे नाही!
तर त्यांच्या स्त्री विषयक लेखांची संख्या फक्त १५% आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या लेखांमधून त्यांनी प्रेरणादायक, प्रभावी स्त्रियांचे विषय मांडले!
आणि असे शेकडो लेख लिहून त्यांनी लेखांचे हे विषय बॅलेन्स करण्याचे प्रयत्न केले, आता ही संख्या फक्त २ वर्षात १७.६% इतकी वाढली आहे.
२००१ मध्ये हे विकिपिडिया सुरू झाले. तेव्हा स्टिव्हन ह्यांनी कधीही इतकी लोकप्रियता मिळेल असा अज्जिबात विचार केला नव्हता, सुरुवातीच्या काळात त्यांना खूप चढ-उताराला सामोरे जावे लागले.
अजूनही त्यांना खात्री नव्हती की हे यशाचे शिखर गाठू शकेल. पण, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. ह्यामध्ये झोकून देऊन त्यांनी काम केले. खूप मेहनत घेतली.
खूपदा त्यांना असे विचारले जाते की इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी इतका वेळ का देत आहात आणि इतके प्रयत्न का करित आहात ज्यासाठी तुम्ही मूल्यही आकारत नाही.
त्यावर त्यांचे असे मत आहे की,
“जसे प्रत्येकाकडेच खाजगी क्षण असतात तसेच हे माझे खास क्षण आहेत ज्यांचा उपयोग मी माझ्या समाधानासाठी करतो. मला हे लेख लिहिण्यात, त्यासाठी माहिती गोळा करण्यात, माझा वेळ देण्यात खूप समाधान वाटतं.
आज जेव्हा मी माझ्या लेखांकडे वळून पाहतो तेव्हा वाटतं की आज इंटरनेटवर ती माहिती सहजतेने उपलब्ध आहे जी अधी अजिबातच नव्हती.
कोणासाठी तरी काही तरी उपयुक्त केल्याची अद्भूत भावना मनात निर्माण होते.
त्याचप्रमाणे आज जग बदलत चालले आहे आणि त्या बदलणाऱ्या जगाचा ज्ञानाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदवला ह्याचे अतीव समाधान वाटाते आणि आनंदाने ऊर भरून येतो.”
खरंच! स्टिव्हन प्र्युट ह्यांचे हे कार्य महान आहे. ज्यांनी सगळ्यांना हवी ती माहिती इंटरनेट वर उपलब्ध करून दिली तेही कोणताही मोबदला न घेता!
त्यांची मेहनत, कामाप्रती निष्ठा आणि श्रद्धा ह्यामुळेच आज आपल्याला विकिपिडिया वर आपल्याला हव्या त्या विषयाचे ज्ञान ताबडतोब मिळते.
त्यांच्या ह्या कार्याचे अमेरिकन सैन्याने देखील अभिनंदन केले आहे. त्यांचे हे कार्य खरोखरीच प्रशंसनीय आहे.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.