Site icon InMarathi

मुद्दाम ‘नो बॉल’ टाकून हा क्रिकेटर ठरला देशासाठी ‘गद्दार’- वाचा, नेमकं काय झालं होतं?

mohammad amir inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वर्ष : २०१०, स्थळ : लॉर्ड्स स्टेडियम. क्रिकेट ची पंढरी. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मधील टेस्ट सिरीज संपते. इंग्लंड शेवटची टेस्ट मॅच २२५ रन्स ने जिंकतो.

पण, ‘मॅन ऑफ द सिरीज’ चं बक्षीस दिलं जातं पाकिस्तानच्या एका १८ वर्षीय क्रिकेटपटू ‘आमिर’ ला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन च्या वेळी त्याचं नाव पुकारलं जातं.

पण आमिर त्याच्या रूम मध्येच थांबणं पसंत करतो. तेव्हा हॉटेल कर्मचारी त्याला समजावून सांगून तिथे घेऊन येतात. तो तिथे येतो पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त नाराजी होती.

ही नाराजी प्रत्येकालाच जाणवली होती. कॅमेऱ्याला सुद्धा. पूर्ण क्रिकेट विश्वाला या घटनेने हादरवून सोडलं होतं. मीडिया मध्ये याच बातमीची चर्चा किती तरी दिवस सुरू होती. काय असेल ?

 

 

आमिर जेव्हा २०१५ मध्ये कायद-ए-आजम ट्रॉफी मध्ये खेळला तेव्हा त्याने ४ मॅच मध्ये ३४ विकेट्स घेतल्या होत्या. त्या नंतरच्या ४ फर्स्ट क्लास क्रिकेट मॅच मध्ये १६ विकेट्स.

बांगलादेश प्रीमियर लीग च्या ९ मॅच मध्ये १४ विकेट्स. २०१६ मध्ये पाकिस्तान प्रीमियर लीग च्या ७ मॅच मध्ये ७ विकेट्स. एशिया कप च्या ४ मॅच मध्ये ७ विकेट्स.

पण ही सगळी आकडेवारी पाच वर्षानंतरची आहे. कुठे होता आमिर ५ वर्ष ? काय झालं होतं ?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आमिर ने धोका दिला होता समस्त क्रिकेटप्रेमींना. ज्यांच्यासाठी क्रिकेट हा एक धर्म आहे. जीव की प्राण आहे. त्याने निर्णायक क्षणी एक नो बॉल टाकून इंग्लंड संघाला जिंकवून दिले होते.

हा आरोप सिद्ध झाला जेव्हा त्याने टाकलेल्या त्या बॉल चा action replay वारंवार मैदानावरच्या मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.

कोणताही आंतरराष्ट्रीय बॉलर बॉल टाकताना क्रिझ च्या इतक्या समोर टाकू शकतच नाही. ही चूक असूच शकत नाही. हे ठरवून केलं आहे हे त्यांच्या टीम मॅनेजमेंट सुद्धा कळलं.

 

 

हे घडवून आणण्यास त्याला साथ दिली होती त्याच्या सहकारी क्रिकेटपटू सलमान बट ने. प्रॅक्टिस च्या वेळी त्याने आमिर कडून नो बॉल करण्याची प्रॅक्टिस करून घेतली होती.

हे घडलं कसं ?

टेस्ट च्या आदल्या दिवशी मुहम्मद आमिर ने त्यांच्या कोच कडे जाऊन त्याचा रन-अप बदलू देण्याची विनंती केली. जी की अर्थातच अमान्य करण्यात आली होती.

आमिर ची एक सवय होती की तो बॉल टाकताना पाय क्रिझ च्या मागे ठेवायचा. त्याच्या कोच ने त्याला बऱ्याच वेळेस ही सूचना दिली की पाय थोडा पुढे आणत जा.

पण त्याला त्याची सवय बदलणं शक्य होत नव्हतं. कालांतराने कोच ने सुद्धा ही सूचना वारंवार करणं बंद केली कारण, त्याची बॉलिंग चांगली होती.

एखादी अशी सवय दुर्लक्षित केल्या जाऊ शकणारी होती. पण रन-अप बदलण्याची परवानगी त्याला स्पष्टपणे नाकारण्यात आली होती.

 

 

कबुली:

घडलेल्या पूर्ण प्रकाराची माहिती आणि कबुली आमिर ने स्वतः स्काय स्पोर्ट्स नावाच्या टीव्ही चॅनल च्या मुलाखतीत दिली होती. त्याने पुढे सांगितलं की,

टेस्ट मॅच च्या दिवशी सकाळी त्याच्या मॅनेजर मजहर मजीद ने सलमान बट च्या समक्ष त्याला हॉटेल च्या पार्किंग मध्ये बोलवून हे सांगितलं की तुला आज नो बॉल टाकायचा आहे.

सलमान बट ने त्याची प्रॅक्टिस करून घेतली होती, पण मॅच सुरू असताना आमिर इतका नर्व्हस झाला की चुकून त्याने पाय क्रिझ च्या जास्तच बाहेर टाकला.

इतका नो बॉल टेस्ट मॅच च्या इतिहासात कोणी बघितला नव्हता.

सर्वांना पडलेला प्रश्न पाकिस्तान टीम च्या हेड कोच वकार युनिस ने आमिर ला विचारला: ” हे काय चाललंय ?”

आमिर ला हा प्रश्न वकार युनिस ने विचारला तेव्हा तो शूज ची लेस बांधत होता आणि अचानक त्यांच्या हेड कोच ला बाजूला बघून तो प्रचंड घाबरला होता.

 

काय उत्तर द्यावं हा विचार करत असतानाच तिथे सलमान बट आला आणि त्याने स्वतः आमिर ला समोर जाऊन बॉल टाकायला आणि बाऊन्सर टाकायला सांगितलं होतं.

असं सांगून सलमान बट ने आमिर वर आलेली वेळ मारून नेली होती.

एक तास दिलेल्या ह्या मुलाखतीत आमिर खचून गेलेला दिसतो. त्याला त्याची चूक मान्य होती. पण, त्यामुळे होणारी शिक्षा कमी होणं शक्य नव्हतं.

मुहम्मद आमिर ला इंग्लंड च्या जेल मध्ये स्पॉट फिक्सिंग च्या गुन्ह्यात सहा महिने शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर ५ वर्ष ICC ने बंदी आणली होती.

असं पहिल्यांदाच झालं होतं की मैदानावर घडलेली एखादी घटना हाच खेळाडू चा गुन्हा होता आणि तोच त्याचा पुरावा सुद्धा होता. जेल मध्ये गेल्यावर आमिर ने पाच दिवस जेवण केलं नव्हतं.

त्याच्या संपूर्ण करिअर वर एक कधीही न पुसणारा डाग त्या मॅच ने लावला होता. त्याने मनोमन हे ठरवून टाकलं होतं की यापुढे आयुष्यात कोणतंही क्रिकेट खेळायचं नाही.

 

 

त्याला शिक्षा सुनावल्या जाण्याच्या काही दिवस आधीपर्यंत तो पाकिस्तान च्या प्रत्येक लहान मुलांच्या गळ्यातील ताईत होता.

प्रत्येकाला मोठं होऊन मुहम्मद आमिर सारखा बॉलर व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांचे पालक सुद्धा त्यांना प्रोत्साहन देत होते. पण, आज चित्र बदललं होतं.

लोकांनी आमिर ची प्रतिकात्मक धिंड काढली होती.

कमबॅक

कोणताही खेळाडू हा एक फायटर असतो हे आपण मैदानावर बघतच असतो. पण कधी कधी त्यांना ही लढाई स्वतःशी सुद्धा करावी लागत असते. ही लढाई कोणत्याही मॅच पेक्षा अवघड असते.

आमिर ने पुन्हा आपल्या फिटनेस वर, बॉलिंग वर प्रचंड मेहनत घेतली. सर्व जुन्या संगतींपासून स्वतःला दूर ठेवलं.

लक्ष फक्त स्वतः च्या खेळावर केंद्रित केलं आणि त्याने पाच वर्षाने कमबॅक केलं एक ओपनिंग बॉलर म्हणून. जी की पाकिस्तानी टीमची सर्वात महत्वाची जागा समजली जाते.

पाच वर्षांआधी त्याचा लूक हा ‘तेरे नाम’ सिनेमा मधल्या राधे भैय्या सारखा होता. डोळ्यापर्यंत येणारे लांब केस, मधून भांग. हे सर्व या शिक्षेनंतर गायब झालं होतं.

आता आमिर हा एक सेन्सिबल व्यक्ती आणि क्रिकेटर म्हणून लोकांसमोर आला होता. हे त्याचा फक्त लूक नाही तर त्याचे आकडे पण सांगत होते.

 

 

आमिर ने त्याच्या फास्ट आणि स्विंग बॉलिंग च्या जोरावर न्यूझीलंड च्या दोऱ्यावर दमदार कामगिरी केली आणि टीम ला सावरलं.

तो बॉलिंग ला जाताना प्रेक्षकांतून काही आवाज येत होते. जे की त्याने टाकलेल्या पहिल्याच ओव्हर नंतर शांत झाले. आमिर ची एनर्जी बघून लोक परत त्याच्या प्रेमात पडले होते.

पण, ही तर फक्त सुरुवात होती. आशिया कप आणि T-20 वर्ल्डकप मध्ये जे प्रदर्शन आमिर ने केलं होतं ते त्याची नव्याने ओळख करून देणारे होते.

त्याचा खरा कस लागणार होता तो परत त्याच ठिकाणी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर. ही तीच जागा होती ज्याने आमिर ला यशाच्या शिखरावरून जमिनीवर आदळलं होतं.

एक वर्तुळ पूर्ण होणार होतं. लॉर्डस् स्टेडियम च्या त्या सुप्रसिद्ध बाल्कनी मध्ये आमिर उभा होता. त्याची दुसरी इनिंग खऱ्या अर्थाने आता सुरू होणार होती.

ही ती गंगा होती जिथे त्याला त्याचे पाप धुवायची एक संधी चालून आली होती. सर्वांची नजर आमिर वर होती. टेस्ट चा तो दुसरा दिवस उजाडला.

तारीख होती १५ जुलै २०१६. मिसबाह ने आमिर ला नवीन बॉल दिला होता बॉलिंग करण्यासाठी.

सुरुवात केली होती ती बाऊन्सर ने आणि नंतर यॉर्कर ने. समोर होता कुक सारखा अनुभवी बॅट्समन. जो की प्रत्येक मॅच मध्ये खेळावर नियंत्रण ठेवून असतो.

 

 

पण, त्या दिवशी आमिर काही चूक करतच नव्हता. त्याच्या बॉलिंग मध्ये एक शिस्त होती, सातत्य होतं. त्या दिवशी एकही नो बॉल त्याने केला नाही.

एलेक्स हेल्स ची त्याला विकेट मिळाली. कूक ची सुद्धा विकेट मिळाली असती पण त्याचा झेल मोहम्मद हफिज ने सोडला.

पूर्ण दिवस कुक आणि रूट हे दोन बॅट्समन मैदानावर खेळत होते आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान चे सर्व बॉलर फिके पडत होते. त्यांना जेरीस आणलं होतं ते फक्त मुहम्मद आमिर च्या बॉलिंग ने.

इंग्लंड चा खेळाडू मार्क निकोलस याने असं सांगितलं की दिवसभराचा खेळ संपल्या नंतर कोणीच आमिर बद्दल हे म्हणत नव्हतं की, “हाच तो स्पॉट फिक्सिंग करणारा खेळाडू”.

त्या ऐवजी प्रत्येक जण असं म्हणत होते की, “हाच तो बॉलर ज्याने इंग्लंड ची या टेस्ट मधली हालत खराब करून ठेवली आहे”. हीच त्याच्या दमदार कमबॅक ची पावती होती.

जेल मधून बाहेर आल्यावर एक इंटरव्ह्यू देताना आमिर ला हे विचारण्यात आलं होतं की,

“तू एकेकाळी लोकांच्या मनातला हिरो होतास. आज नाहीयेस. उद्या परत बनू शकतोस. क्या आमिर अंदर से टूट गया है ?”

आमिर ने उत्तर देण्यास सुरुवात केली पण तो ते पूर्ण करू शकला नाही: “हा टूट तो गया हूं. अंदर से…” आणि पुढे त्याला त्याचे अश्रू अनावर झाले.

 

आमिर ला आजवरची सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली ती म्हणजे विराट कोहली कडून ज्याने या शब्दात त्याचं कौतुक केलं:

“मैने कॅन्सर से जुझते युवराज को क्रिकेट के मैदान मे वापस आते देखा है. टेनिस एल्बो के बाद सचिन को श्रीलंका के खिलाफ ९१ रन मारते देखा है.

लेकिन यकीनन मुहम्मद आमिर का क्रिकेट मे वापस आना अब तक का सबसे बडा कमबॅक है’.

 

 

मुहम्मद आमिर च्या ह्या प्रवासातून आपण काय शिकू शकतो ? शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या कर्तव्याशी कायम प्रामाणिक रहावं असं सांगता येईल.

त्या बरोबरच हा प्रवास त्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरू शकतो जे की वर्षानुवर्ष काही कारणाने टीम च्या बाहेर आहेत कारण आमिर सारखीच त्यांची लढाई ही बाकी जगाशी नसून स्वतःशीच असते.

आज ओपनिंग बॉलिंग करणाऱ्या आमिर च्या त्याच हातात काही दिवसांपूर्वी बेड्या होत्या हे चित्र ज्याला डोळ्यासमोर दिसेल तो या फायटर ला त्याने केलेल्या चुका क्षणभर बाजूला ठेवून नक्कीच सलाम करेल ही खात्री आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version