आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
जगभरात झालेल्या कोरोना-प्रादुर्भावाने सध्या सगळ्यात महत्त्व कशाला आलं असेल, तर ते तोंडावरील मास्कच्या वापराला. परंतु सतत तोंडावर मास्क ठेवून कोणतीही व्यक्ती जास्त काळ वावरू शकत नाही.
कोविद-१९ च्या सुरुवातीच्या प्रसारकाळात फक्त ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांनाच मास्क वापरण्यास सुचवलं जात होतं. परंतु आता मात्र सगळ्यांनाच तो वापरण्यास सांगितलं जात आहे.
विशेषतः आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडताना, कुणाशी संपर्क येईल अशा ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावूनच सध्या सगळे बाहेर पडतात.
परंतु हा मास्क अधिक काळाकरता तोंडावर सहन होत नाही. त्यातही जर हा मास्क घट्ट बांधलेला असेल, तर जास्त त्रास होतो.
मास्कच्या अतीवापराने काय होते?
दोन तासापेक्षा जास्त काळ मास्क तोंडावर राहिला, तर मास्कच्या आत त्वचेवर खाज येऊ लागते.
अस्वस्थ वाटू लागतं.
श्वासही कोंडल्यासारखा अनेकदा वाटू लागतो.
मास्कच्या आत चेहऱ्यावर घाम येतो.
घट्ट बांधलेल्या मास्कमुळे चेहऱ्यावर त्याच्या खुणा उमटतात.
या खुणा कधी कधी जखमा निर्माण करू शकतात.
चट्टे उठतात.
पुरळ उठू शकतं.
हा त्रास कोणाला होऊ शकतो?
सर्वसाधारणपणे सामान्य माणूस फार काळ मास्क वापरत नाही. तो बाहेर पडतो तेवढ्यापुरताच वापरतो.
मात्र जे लोक वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत असे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांना हा मास्क दिवसभर अगदी २४ तास तोंडावर ठेवणे सध्या आवश्यक झालेले आहे.
इतका वेळ सतत तोंडावर मास्क ठेवल्याने, आणि तोही जर घट्ट असेल तर त्रास होईलच.
परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क वापरल्याशिवाय सुटका नसते. ते त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहेच.
मग मास्कमुळे चेहऱ्यावर होणारे त्रास होऊ नयेत म्हणून काय करू शकतो?
काही सुप्रसिद्ध डर्मिटोलॉजिस्टनी यावर काही उपाय सुचवले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास ज्यांना सतत मास्क वापरावे लागतात अशा लोकांना या मास्कमुळे होणारे त्रास कमी होतील.
ते उपाय खालीलप्रमाणे आहेत.
दर दोन तासांनी मास्क थोडावेळ काढून ठेवणे.
दर दोन तासांनी जिथे कुणी नसेल, आणि तिथे कोरोनाची लागण होण्याची शक्यता नसेल, अशा सुरक्षित ठिकाणी जाऊन थोडा वेळ साठी आपल्या चेहऱ्यावरील मास्क दूर काढून ठेवा.
थोडा वेळ बाहेरची हवा चेहऱ्याला लागू द्या. त्यानेही बराच आराम मिळेल.
मास्क तोंडावर चढवण्यापूर्वी चेहरा धुणे
मास्क चेहऱ्यावर चढवण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुताना एखादे चांगले क्लिंन्झर वापरा. चेहरा कोमट पाण्याने धुवा. फार गरम पाणी घेऊ नका.
फार गरम पाण्याने त्वचेला रॅशेस येण्याची शक्यता असते. मास्कखालची त्वचा स्वच्छ ठेवणे फार गरजेचं आहे.
मास्क तोंडावर चढवण्यापूर्वी चेहऱ्याला मॉयश्चरायझर लावा
चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावर चांगल्या क्वालिटीचे मॉयश्चरायझर लावा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ते अधिक गरजेचं आहे. कोरड्या त्वचेला मास्कमुळे जास्त त्रास होऊ शकतो.
मॉयश्चरायझेर ऐवजी तुम्ही पेट्रोलियम जेली देखील वापरू शकता.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर प्रोटेक्टींग क्रीम लावा.
जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिवसभर मास्क लावावा लागणार असेल, तर रात्री चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवून त्यावर एखादे प्रोटेक्टींग क्रीम लावून ठेवा.
त्यामुळे दिवसभरात तुमच्या चेहऱ्यावर जर काही मास्कच्या खुणा उमटल्या असतील, तर त्यातून त्या अधिक खोल होऊन जखमा व्हायला नको याची काळजी घ्या.
मास्कच्या आत त्वचेवर घाम येऊ लागतो. घामामुळे अधिक त्रास होतो. घाम तसाच आतल्या आत सुकल्याने तेथे जंतुंचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
त्यामुळे प्रत्येक वेळी मास्क थोड्या थोड्या वेळाने काढून आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करून घ्या. नंतर त्यावर पेट्रोलियम जेली अथवा मॉयश्चरायझर लावून घ्या.
जर तुम्हाला मॉयश्चरायझरने अधिक घाम येत असेल तर ते नका लावू. कोरड्या त्वचेच्या लोकांना मात्र ते लावणं आवश्यक आहे.
मास्क लावण्याच्या आधी चेहरा जितका स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे तितकंच मास्क काढल्यानंतरही पुन्हा चेहरा स्वच्छ धूवून क्रीम्स लावणं गरजेचं आहे.
हे लक्षात राहू द्या. मास्क रोजच्या रोज धुवून टाका. तोच मास्क पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरू नका.
वरील सुचनांचे पालन केल्यास सतत मास्क वापरल्याने होणारे त्रास वाचतील आणि तुमचा चेहराही नेहमीसारखाच राहील. त्यावर कोणत्याही खुणा उमटणार नाहीत.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.