' शासनाचं हे अॅप तुम्हाला कोरोनापासून १००% लांब ठेऊ शकतं; “कसं वापरायचं हे अॅप?” वाचा – InMarathi

शासनाचं हे अॅप तुम्हाला कोरोनापासून १००% लांब ठेऊ शकतं; “कसं वापरायचं हे अॅप?” वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना! जगभरात थैमान घातलेलं संकट. अमेरिका, इटली, चीन मध्ये याचे लाखो केसेस पाहायला मिळत आहेत तर हजारोच्या घरात मृत्यू.

चीनमध्ये याची परिस्थिति सुधारतेय. आपल्याकडे पण कोरोनाला थांबवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

भारतात आतापर्यंत १४१७५ केसेस रजिस्टर झाले. त्यात २५४६ रुग्ण हे बरे झाले आहेत. कदाचित थोड्या वेळाने हा आकडा बदलला असेल. हा आकडा सरकारी वेबसाईटवर पाहता येईल.

पण,

हेच आकडे आपल्या हाताच्या एका बोटावर सुद्धा उपलब्ध आहे. ‘आरोग्य सेतू’ हे कोरोना ट्रॅक करण्यासाठी डेव्हलप केलेलं ऍप्लिकेशन आहे.

 

aarogya setu app inmarathi
dainik bhaskar

 

क्रिकेटचे रेकॉर्ड्स, प्लेयर स्टेटस आणि इन्फॉर्मेशन तसेच मॅच समरी साठी “क्रिकबझ” हे उत्तम ऍप्लिकेशन आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यासारखंच हे ऍप्लिकेशन काम करत.

देशातील एकूण केसेस तर यात कळतातच. शिवाय प्रत्येक राज्याचं स्टेटस सुद्धा इथे आपण पाहू शकतो.

पण नेमकं हे अॅप बनवायचं सरकारचा हेतु तरी काय?

आजच्या घडीला भारतात नाही म्हटलं तरी भारतात प्रत्येक कुटुंबात एक तरी स्मार्टफोन आहे.  त्याच्यामार्फत प्रत्येक घरात कोरोना बद्दल जागरूकता पोहोचावी तसेच राज्यातली आणि देशातली एकूण स्थिती या अॅप मार्फत पोहोचावी हे आहे.

तसेच,

या ब्ल्यू टूथ आणि मोबाईल लोकेशनच्या मार्फत आपल्याला आपण कोणा कोरोना संसर्गित रुग्णाच्या जवळपास आहोत की नाही याची देखील माहिती मिळेल.

आरोग्य सेतू या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो आरोग्याचा पुल. पाच करोड अँड्रॉइड युजर्सनी हे ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं आहे.

आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही प्लॅटफॉर्म वर हे अॅप उपलब्ध आहे.

 

aarogya setu app inmarathi1
huffpost india

 

MyGov  हे अॅप सरकारने आधीच कोरोनाच्या माहिती साठी विकसित केलेलं आहे. पण फक्त कोरोना आणि त्यासंबंधीत कामासाठी उपयोगात येईल म्हणून आरोग्य सेतू अँप बनवण्यात आलं आहे.

हे देशातलं कोरोना ट्रॅकिंगचं पहिलंचं अॅप आहे. मोबाईल सर्व्हिलंसच्या माध्यमातून ठेवलेलं हे एक मोठं पाऊल आहे.

आरोग्य सेतू अॅप वापरायचं कसं?

अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर ते तुमच्या मोबाईलचं ब्ल्यूटूथ आणि लोकेशन एक्सेसची परमिशन मागेल.

परमिशन ग्रांट केल्यानंतर आपली सोयीस्कर भाषा निवडून अॅप चं काम सुरू करा.

सध्या हे अँप ११ भाषेमध्ये उपलब्ध आहे.

मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर आपलं वय, नाव, आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे कोरोना टेस्ट संबंधित पार्श्वभूमीवर विचारल्या जाणारे प्रश्न विचारले जातात.

डेटा फीड केल्यानंतर तो सर्व्हर वर स्टोर करून आपल्या लोकेशनच्या मार्फत आपण कोणा कोरोना संसर्गित व्यक्तीच्या जवळपास आहोत का हे बघितलं जातं.

 

aarogya setu app inmarathi2
scroll.in

 

जर आपण सेफ नाही आहोत हे अॅप च्या रिझल्ट मधून कळलं की ते आपल्याला कोणाशी संपर्क साधायचा, विलगीकरण कसं करायचं हे देखील सांगितलं जातं.

ब्लूटूथ चा वापर करून हे अॅप युजर च्या जवळपासच्या सहा फुटापर्यंत आपलं लोकेशन बघतं. अॅप आपल्याला हाय रिस्क वर आहोत की नाही यासंबंधी थेट सूचना देतं.

जर आपण हाय रिस्क वर असलो तर अॅप आपणास टेस्ट तसेच १०७५ या टोलफ्री नंबर वर संपर्क करून टेस्ट शेड्युल करायला सांगतं.

फक्त एवढंच नव्हे, तर कोरोना संदर्भात प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच्या टिप्स सुद्धा हे अॅप देते.

जर तुम्ही एखाद्या कोरोना संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलात किंवा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर हे अॅप तुमची माहिती थेट सरकारला पुरवते.

तुमचा डेटा इतर कोणाही सोबत शेअर केला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.

 

aarogya setu app inmarathi3
ndtv gadgets

 

के.ललितेश जे पूर्वी गुगलचे कर्मचारी होते,त्यांनी आणि त्यांच्या ३० जणांच्या टीमने हे अॅप विकसित केलेलं आहे.

ललितेश म्हणतात,

एकूण रजिस्टर होणारे केसेस आणि त्याची आकडेवारी सरकारला जलदगतीने कळून याव्यात म्हणून हे अॅप बनवलं आहे. यामुळे ज्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये  हे अॅप आहे त्यामार्फत सर्व्हिलंस चालवलं जाऊ शकतं.

तसेच उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर यामुळे योग्य रीतीने होऊ शकेल.

वेगळ्या शब्दात सांगायच म्हणजे, जर कोरोनाचा आकडा हा वाढला तर सरकार त्या परिस्थितीत सुद्धा स्वतःला तयार करू शकेल. ज्यामुळे वाईटातली वाईट परिस्थिती सुद्धा योग्य पध्दतीने हाताळली जाऊ शकेल.

भारतीयांना रेग्युलर मेडिकल चेकअपची तशी सवय कमीच आहे. असे कमीच आहेत ज्यांना स्वतःच्या आरोग्यसोबत इतरांच्या आरोग्या बद्दल काळजी आहे किंवा आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याबाबत जागरूकता.

त्यामुळे हे अॅप त्या व्यक्तीच्या आरोग्य संबंधित सेन्सेटिव्ह माहितीची मागणी करते.

आपल्याला माहीत आहे की, वयाची साठी ओलांडलेल्याना या कोरोनाची बाधा लवकर होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकार अशा व्यक्तींना प्राधान्य देऊन त्यांना ट्रेस करत असते.

देशाची एकूण लोकसंख्या पाहता, कमीच जणांनी हे अॅप डाऊनलोड केलेलं आहे.

 

aarogya setu app inmarathi4
the quint

 

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हे अॅप  डाउनलोड करायला आवाहन केलेलं आपण पाहिलेलं आहे.

या अॅप मध्ये रोज नवनवीन सुधारणा होत आहेत. वैयक्तिक मेसेजिंग मार्फत अॅप डाऊनलोड करायला प्रोत्साहन दिले जात आहे.

व्हाट्सअँप सारख चॅट फ्रेंडली फिचर लवकरच यात उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक राज्य आणि तिथलं राज्य सरकार कोरोना संबंधित काम करत आहे. शिवाय केंद्रात असलेलं सरकार सुद्धा प्राधान्याने या आपत्ती वर काम करत आहे.

आरोग्य सेतू या अॅप्लिकेशन मार्फत आपण कोरोना संबंधित एकूण एक माहिती मिळवू शकतो.

शिवाय स्वतः सोबत आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा सुरक्षित ठेऊ शकतो.

आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपल्या मित्रांना या अॅप बाबत सांगून कोरोना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यात आपण सुद्धा भाग घेऊ शकतो.

तर आजच हे अॅप  डाऊनलोड करून सरकार घेत असलेल्या मेहनतीत आपण आपला सहभाग नोंदवूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?