Site icon InMarathi

कोरोनापासून वाचण्यासाठी जगभरात ज्यावर प्रयत्न सुरू आहेत, ते भारतीय विद्यार्थ्यांनी तयार करून दाखवलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सगळं जग प्रयत्न करीत आहे त्यावर काही औषध मिळेल का? लस मिळेल का? यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

त्याच बरोबर कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता सगळ्या देशांमधील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी लॉक डाऊन, आणीबाणी, कर्फ्यू, संचारबंदी असे विविध उपाय केले जात आहेत.

काही ठिकाणी या प्रयत्नांना थोडेफार यश येत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्यापासून रोखून धरण्यात यश येत आहे.

तरीदेखील सध्या कोरोना हा अत्यंत वेगाने संपूर्ण जगात संक्रमित होताना दिसत आहे. आणि त्याच बरोबर लोकांचे बळी देखील घेत आहे.

भारतासारख्या देशात विकसनशील देशात ज्या ठिकाणी आरोग्यसुविधा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही तिथे तर सगळीकडेच आरोग्यविषयक सुविधांचा अभाव आढळून येतो.

 

benzinga

 

डॉक्टर्स, नर्सेस यांना लागणारे आवश्यक असणारी उपकरणं कमी आहेत. त्याचबरोबर रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा देखील कमी आहेत. आणि दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून होणारे मृत्यूदेखील वाढताहेत.

देशभरातील सगळ्यात जास्त मृत्यूचा दर हा आपल्या महाराष्ट्रातच आहे. कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. म्हणजेच आपल्याकडच्या सोयीसुविधा तोकड्या पडताहेत हे तर नक्कीच.

अशा वेळेस रुग्णांना जास्त आवश्यकता असते ती व्हेंटिलेटरची आणि त्याचीच कमतरता सध्या जाणवत आहे.

औषधांबरोबरच ही उपकरणे देखील सहजासहजी उपलब्ध होतील का याचा सगळीकडून प्रयत्न होताना दिसतोय. सरकार काही उपकरणं, औषध परदेशातून मागवत आहे, तर काही देशातच निर्माण करता येईल का याचाही विचार होताना दिसतोय.

त्यासाठीच यावरच्या संशोधनात आयआयटीचे विद्यार्थी देखील सहभागी होताना दिसतात.

असेच काही व्हेंटिलेटर अत्यंत कमी किमतीत आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. जे सहजासहजी कुठेही नेता येऊ शकतील, आणि वापरता येतील.

आयआयटी कानपूर चा हा दावा आहे की सध्याची व्हेंटिलेटर्स जी व्हेंटिलेटर परदेशातून मागवली जातात त्याच्या एका व्हेंटिलेटरची किंमत ही साधारणतः चार लाखाच्या घरात असते.

 

health

 

परंतु आयआयटी कानपुर मध्ये जे व्हेंटिलेटर तयार करण्यात आलं आहे त्याची किंमत ही केवळ ७० हजार रुपये आहे आणि यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी या भारतात मिळणार्‍या सामानातूनच बनवल्या आहेत.

आयआयटी कानपूरचे दोन विद्यार्थी निखिल कुरुले आणि हर्षित राठोड यांनी हे बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या दोघांची एक स्टार्टअप कंपनी असून ज्याचं नाव नॉक्का रोबोटिक्स आहे.

याचसोबत आयआयटी रूरकी आणि AIIMS हे देखील “प्राणवायू” नावाचा व्हेंटिलेटर तयार करत आहेत.

आयआयटी कानपूरच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय पायाभूत सुविधांना आधार देण्यासाठी पोर्टेबल व्हेंटिलेटर प्रोटोटाइप विकसित करीत आहे.

 

livemint

 

हे व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी आयआयटी कानपुर ने नऊ जणांची एक टीम केली आहे. त्यामध्ये नारायण इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्स, बेंगलोरचे डॉक्टर देखील सहभागी आहेत.

देशातील वैद्यकीय व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची अत्यंत आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काळात हजारो व्हेंटिलेटर लागू शकतात.

म्हणूनच सध्या युद्धपातळीवर काम करून एका महिन्यात १००० व्हेंटिलेटर तयार करण्याचे उद्दिष्ट आयआयटी कानपूर ने ठेवले आहे.

हे, जे व्हेंटिलेटर आहेत ते दबाव नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहेत. हे व्हेंटिलेटर्स मोबाइल फोनशी कनेक्टेड असतील. ज्यामुळे व्हेंटिलेटरवर नियंत्रण ठेवता येईल आणि पेशंटची क्रिटिकल कंडिशन मोबाइलवर डिस्प्ले होईल.

व्हेंटिलेटरला विशिष्ट हवा, तापमान याची गरज लागणार नाही कुठल्याही हवेत आणि तापमानात हे व्हेंटिलेटर काम करतील. गरज लागल्यास ऑक्सीजन सिलेंडर ही या व्हेंटिलेटर्सना जोडण्यात येतील.

Covid-19 ने संपूर्ण जगाचे चित्र जणू बदलले आहे. अगदी आरोग्यसुविधा उत्तम असलेल्या इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स देशात देखील याचा कहर दिसून येत आहे.

 

 

त्यांनादेखील covid-19 ने ग्रासलेल्या रुग्णांना हाताळणे अवघड जात आहे. त्यामुळेच भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येने जास्त असलेल्या देशात तर अजूनच परिस्थिती अवघड आहे.

covid-19 सारख्या साथीचा सामना करायला आरोग्यसुविधेतील यंत्रणा इथे सक्षम नाही, यासाठी लवकरात लवकर उत्पादन करणे गरजेचे आहे.

“Covid-19 सारख्या आजारात रुग्णांना विशेषतः वृद्ध व्यक्तींना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. आता भारतात व्हेंटिलेटरची संख्या कमी आहे. आणि बेसिक उत्पादनांच्या शिवाय व्हेंटिलेटर तयार करणे अवघड आहे.

म्हणूनच लवकरात लवकर व्हेंटिलेटर तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यासाठी एक टीम तयार केली आहे, हे दोन विद्यार्थी या टीमचा भाग आहेत.

ज्यांनी हे व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे. व्हेंटिलेटर लवकर तयार करून लाईफ सपोर्ट सिस्टीम लवकर कार्यान्वित करण्याकडे आमचा कल आहे.

या टीममध्ये डॉक्टर्स आणि तंत्रज्ञ एकत्र काम करत आहेत,” असं आयआयटी कानपूरचे प्राध्यापक डॉक्टर बंदोपाध्याय सांगतात.

 

jagran.com

 

पण हे करताना त्यांना व्हेंटिलेटरची किंमत वाढणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. कारण पण खूप महागडे व्हेंटिलेटर सगळ्यांना परवडणार नाहीत.

परंतु हे व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी देखील काही निधीची आवश्यकता आहे त्यासाठीच आता फंड गोळा करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे ज्याचं नाव ‘केअर इन इंडिया’ असं आहे.

ज्यासाठी कोणीही फंडिंग करू शकेल.

केअर इन इंडिया बरोबरच इतर सर्व स्तरांतून ही मदत घेतली जात आहे. या कामासाठी सगळ्यांच्याच मदतीची गरज असून सगळ्यांनी मिळून काम केलं तरच आपण covid-19 वर मात करू शकतो. असं डॉ. बंदोपाध्याय म्हणतात.

समाजाच्या सर्वच स्तरांमधून आयआयटी कानपूर येथील विद्यार्थी आणि डॉक्टर्स, तंत्रज्ञ यांचं कौतुक होत आहे. त्यांचा हा उपक्रम यशस्वी होवो आणि भारतातल्या रुग्णांना त्याचा फायदा होवो हीच अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version