सूर्यकिरणांनी कोरोनाचे विषाणू मरतात म्हणे!! खरंय का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जसाजसा वाढत आहे तसंतसं सोशल मीडियावर कोरोनाचे विषाणू कसे मारावेत याच्या संबंधात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.
त्यातलीच एक पोस्ट म्हणजे सूर्य किरणांमध्ये कोरोनाचे विषाणू मरतात. त्यासाठी प्रत्येकाने दहा मिनिटे उन्हामध्ये उभ राहीलं पाहिजे.
अमेरिकेत ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये,असं म्हटलं गेलं की, ‘सरकारने बीचवर आणि इतर ठिकाणी लोकांना जाण्यास जी बंदी केली आहे ती चुकीची आहे.
कारण सनबाथ घेतलं तर कोरोनाचे विषाणू मरतात.’ ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाली.
बरं ही पोस्ट शेअर करणारे अमेरिकेतील डॉक्टर मंडळी आहेत.
मर्फी नावाच्या एका डॉक्टरने,जो मूत्रपिंड प्रत्यारोपण करतो, त्याने हे वक्तव्य केलं आहे.
त्यामुळेच लोकांना या गोष्टीत तथ्य असेल असं वाटतं.
थायलंडमधील एका वृत्तपत्रात देखील covid-19 या सात गोष्टींपासून दूर राहतो असं एक आर्टिकल छापून आलं आहे.
त्यातील एक गोष्ट म्हणजे सूर्यकिरणांमध्ये covid-19 ला मारायची क्षमता असते. त्यामुळे सूर्य किरणांमध्ये थांबलं पाहिजे असे सांगितलं होते.
अल्ट्रावायलेट लाईट मध्ये देखील covid-19 ला मारायची क्षमता असते असं म्हटलं जातं. परंतु त्यात थोडसं तथ्य आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार सूर्यकिरण किंवा अल्ट्रावायलेट लाईट मध्ये covid-19 हा विषाणू मरत नाही, त्यासाठी जास्त क्षमतेचे अल्ट्राव्हायोलेट किरण आवश्यक असतात.
म्हणून त्यासाठी खूपच जास्त वेळ उन्हामध्ये उभे रहावं लागेल.
परंतु त्यामुळे खरंतर वेगळेच साईड इफेक्ट माणसाला त्रास देतील ते म्हणजे त्वचेची जळजळ होईल, त्वचेचे विकार जडतील किंवा त्वचेचा कॅन्सर देखील होऊ शकतो.
अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर देखील याविषयी सांगितलेलं आहे.
कोरोना विषयी असणाऱ्या मिथबस्टर मध्ये हा विषय हाताळण्यात आला आहे. आणि कोरोनाव्हायरसला मारण्यासाठी अल्ट्रावायलेट लाईटचा वापर करू नका, असं डब्ल्यू एच ओ सांगितले आहे.
लोक कोरोनाव्हायरसला मारण्यासाठी अल्ट्रावायलेट लॅम्पचा वापर करत आहेत, जी अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
हात स्टरलायझेशन करण्यासाठी अल्ट्राव्हायलेट लाईट वापरणे योग्य नाही कारण त्याच्या सततच्या वापरामुळे स्किनचे आजार होण्याची भीती असते.
सूर्यप्रकाश किंवा अल्ट्रावायलेट लाइट्स यांच्यामुळे कोरोना थांबणार नाही.
हीदेखील समजुत होती की, ज्या प्रदेशातील तापमान हे 30 डिग्री पेक्षा अधिक असेल तिथे कोरोनाचा प्रभाव जास्त दिसणार नाही, परंतु हीदेखील माहिती अत्यंत चुकीची आहे.
बाहेरच्या तापमानाचा कोरोनावर कोणताही परिणाम होत नाही.
अगदी टाईम मॅगझीनमध्ये देखील अल्ट्राव्हायलेट लाईट आणि कोरोना याच्यावर लिहिलं गेलं आहे.
अल्ट्राव्हायलेट लाईटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल का? त्यांचं परस्पर संबंध आहे का? यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे असे म्हटले आहे.
कोरोना व्हायरस जगात येऊन अजून एक वर्ष देखील झाले नाही त्यामुळे त्याच्याविषयी आत्ताच काही सांगणे अवघड आहे.
तरीही काही काही लोक अल्ट्राव्हाईट लाईट मुळे कोरोनाव्हायरस नष्ट होतो का असा प्रश्न विचारत आहेत.
त्याला बीबीसी फ्युचरमधील एका आर्टिकल मध्ये या प्रश्नावर उत्तर देण्यात आलं आहे.
त्यानुसार covid-19 नष्ट करू शकेल असा एकच अतितीव्र नील किरण सध्या अस्तित्वात आहे परंतु माणसाने त्याचा वापर करणे चुकीचे ठरेल, कारण तो खूपच धोकादायक आहे. म्हणजे अक्षरशः त्या किरणांमुळे माणूस जळू शकेल, असं म्हटलंय.
आत्तापर्यंत तरी अल्ट्रा व्हाईट किरणांचा covid-19 नष्ट करण्यासाठी किती उपयोग होतो यावरती संशोधन झालेलं नाही.
मात्र आधीचे जे कोरोनाव्हायरस होते उदा. सार्स त्यांच्यावरती मात्र अतिनील किरणांवर अभ्यास झालेला आहे. आणि त्यात सार्स चे विषाणू नष्ट झाले आहेत.
त्यासाठीच आता covid-19 बद्दल देखील अशाच अतिनील किरणांना एकत्र आणून नष्ट करण्याचं विचार केला जातोय पण हे अत्यंत धोकादायक आहे असं यातील तज्ञ म्हणतात.
कारण covid-19 ला मारण्यासाठी जी अतिनील किरण वापरली जातील त्यांना एकवटून ठराविक काळासाठी ती वापरावी लागतील आणि त्यातच खरा धोका आहे.
कारण कोणालाही माहीत नाही की हा वेळ किती आहे? किती वेळा मध्ये covid-19 नष्ट होतं.
म्हणूनच सूर्यप्रकाशात उभं राहणं देखील धोक्याचंच आहे. अति सूर्यप्रकाशसुद्धा माणसाला काळ ठरू शकतो.
आपण दरवर्षी पाहतो की उष्माघाताने कितीतरी लोकांचा जीव भारतासारख्या देशात जातो. उन्हाळ्यात उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही अधिक असतं.
शिवाय दिवसभरात सूर्याच्या किरणांची प्रखरता वेगवेगळी असते त्यावरती त्या प्रदेशातील हवामानाचा, पावसाचा परिणाम सुर्यकिरणांवर होत असतो म्हणूनच सूर्यकिरणे हा covid-19 नष्ट करण्याचा उपयुक्त मार्ग नाही.
थायलँड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर हंसासुता यांनी covid-19 वर बरंच संशोधन केलं आहे.
यांच्या म्हणण्यानुसार सूर्यापासून येणारी अतिनील किरण ही नोवेल कोरोनाव्हायरस, covid-19 ला मारण्याइतपत सक्षम नाहीत.
त्यासाठी जर covid-19 संपवायचा असेल तर अतिनील किरणे एकत्रित करून त्यांचा मारा करावा लागेल.
परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर तज्ञ यांच्या म्हणण्यानुसार असे करणे धोकादायक आहे. याच्यामुळे माणसांच्या शरीरातील त्वचा पेशींना धोका निर्माण होईल.
म्हणजेच सूर्य किरणांमध्ये कोरोना विषाणू मरतात हे म्हणणे चुकीचे आहे.
त्यामुळे कोरोनासारखी कोणतीही लक्षण आढळली तरी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं महत्वाचं आहे.
तसंच कोरोना होऊ नये म्हणून स्वच्छतेचे नियम पाळणं, मास्कचा वापर करणं, आणि घाराबाहेर न पडणं या उपायांचा अधिकाधिक वापर करावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.