आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सध्या ह्या कोरोना व्हायरसमुळे सरकारने टोटल लॉकडाऊन जाहिर केलंय. ह्या लॉकडऊनच्या काळात सगळेजण सक्तीने घरात थांबले आहेत. सुरुवातीला सगळ्यांना जरा हायसे वाटले, मजा वाटली.
कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत, घर भरलेलं आहे, मुलांचा दंगा सुरू आहे, सगळे एकत्र जेवत आहेत, गप्प-गोष्टी होत आहेत पण, जसजसे ह्या व्हायरसचे संकट वाढत गेले तसतसे लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे लॉकडाऊन वाढले.
सगळे चिंतीत झाले. आनंदाची जागा आता चिंतेने घेतली. कारण एक तर हे जीवावरचे संकट त्यात कधी हे संकट टळेल, कधी मुक्त श्वास घ्यायला मिळेल हे कोणालाच माहित नाही.
सगळे घाबरून गेले, गोंधळून गेले. सरकारने सर्वतोपरी लोकांच्या सुरक्षिततेसाठी पाव्ले उचलली. टि.व्ही., रेडिओ, बातम्या ह्यामधून माहिती देण्यात येते, स्वच्छतेसाठी काय करावे हे सांगण्यात येते.
मालिकांची देखील चित्रीकरणं थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे त्याच त्याच कंटाळवाण्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत.
त्यातदेखील कट-कारस्थानं, एकमेकांबद्दलचा द्वेष,विवहबाह्य संबंध, सासू-सुनांची भांडणं अशा चुकीच्या संदेश देणार्या!
ज्यामुळे कोणत्याही प्रकारचं उद्बोधन तर होत नाहीच उलट आणखीनच नकारात्मकता वाढते.
लोकं आता निराश होतायत, खूपच हताश झालीयेत हे लक्षात आल्यावर सरकारने एक मस्त आदेश दिला आहे.
लोकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी, निराशा दूर करण्यासाठी! दूरदर्शनवर “रामायण” मालिका पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आणि त्वरित अंमलात देखील आणले.
आता घरा घरात ऐंशी नव्वदीच्या दशकाचेच पुनरावर्तन होऊ लागले. सकाळी ९:०० वाजता सगळे जण टि.व्ही. समोर जमू लागले.
फक्त तेव्हा आळीत कुणाच्या एकाच घरी टि.व्ही. असायचा मग, आख्खी गल्ली, आळी त्यांच्या घरी जमायची ह्या रामायणासाठी!
ह्यावरून तेव्हाच्या अजून काही मालिका आठवतात, ज्या कधीच विस्मृतीत जाऊ शकत नाहीत. त्या कधीच रटाळ वाटल्या नाहीत.
महाभारत, देख भाई देख, मालगुडी डेज्, नुक्कड, करमचंद, ये जो है ज़िंदगी ह्या मलिका अजूनही आठवतात. एक अलिकडची मालिका म्हणजे साराभाई वर्सेस साराभाई!
ह्या सगळ्या मालिकांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.
अशीच एक कधीच विस्मृतीत जाऊ शकणार नाही अशी मालिका म्हणजे “हम पांच”!
ही मालिका आणि त्यातील सगळी पात्र ह्याच्याशी सगळे प्रेक्षक एकरूप झाले होते. सगळ्यांनी आपल्या भूमिका हुबेहुब वठवल्या होत्या, इतक्या हुबेहुब की हे माथुर कुटुंब खरंच आहे असं एका क्षणी वाटतं.
आनंद, बीना आणि त्यांच्या पाच मुली…. (आणि फोटोतील आनंद माथुरची पहिली पत्नी जी मधे मधे आनंदला टोमणे मारते, बोलते) असं हे कुटुंब आणि त्यांची धमाल!
त्यांचे वेगवेगळे स्वभाव आणि त्यावरून होणारे विनोद ह्यांनी ही मालिका खूपच लोकप्रिय झाली. आनंद माथुर ह्या मालिकेच्या शीर्षक गीतातून सगळ्यांची ओळख करून देतो ते पण एकदम भारी होतं
खरं तर ह्या मालिका देखील पुनःप्रक्षेपित कराव्यात असं वाटतं ना? आता काय करत असतील ह्यातील पात्र? कशी दिसत असतील? सगळ्यांना ह्या पात्रांबद्दल खूप उत्सुकता असेल ना?
मग आपण बघूया आनंद माथुर आणि त्याचं हे कुटुंब आता काय करत असेल.
१) पहिलं नाव अर्थातच आनंद माथुर!
माथुर कुटुंबाचे सर्वेसर्वा (वास्तविक त्याचं कोणीच काहीच ऐकत नाही). ही भूमिका केली हवी होती अशोक सराफ ह्यांनी.
इ.स. १९६९ मध्ये ह्यांनी मराठी चित्रपट जानकी मधून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अजूनही ते चित्रपटांमधून काम करतात!
गंभीर भूमिका देखील त्यांनी तितक्याच ताकदीने केल्या (भस्म्या, वाट पाहते पुनवेची इत्यादी) आणि विनोदी भूमिका देखील! आत्ताच त्यांचा “प्रवास” हा मराठी चित्रपट आला.
२) बीना- आनंद माथुरची दुसरी पत्नी!
ही भूमिका केली होती शोमा आनंद ह्यांनी! १९७६ मध्ये त्यांनी “बारूद” ह्या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. जुदाई, हिम्मतवाला, प्यार एक मंदिर, कूली ह्यासारख्या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
हम पांच मधल्या बीनाच्या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. कल हो ना हो आणि हंगामा ह्या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी खूप पसंती मिळाली.
३) आनंदची पहिली पत्नी ही भूमिका केली होती प्रिया तेंडुलकर ह्यांनी.
१९७४ मध्ये श्याम बेनेगल ह्यांच्या “अंकुर” मधून त्यांनी पदार्पण केले. पण “रजनी” ह्या त्यांच्या दूरदर्शन वरील मालिकेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली.
१९८५ मध्ये नासूर ह्या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली. “द् प्रिया तेंडुलकर टॉक शो” ह्या त्यांच्या मालिकेने लोकप्रियता तर मिळवलीच पण काही कॉंट्रॉव्हर्सिज् पण निर्माण केल्या.
त्रिमूर्ती, गुप्त, और प्यार हो गया ह्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. २००१ मध्ये प्यार इश्क और मोहोब्बत हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
२००२ मध्ये त्यांचे कॅन्सर मुळे निधन झाले.
४) मीनाक्षी ह्या सगळ्यात मोठ्या बहिणीची भूमिका निभावली होती वंदना पाठक ह्या अभिनेत्रीने.
तेव्हा ‘फेमिनिस्ट’ वगैरे शब्द इतके प्रचलित नव्हते पण ही मीनाक्षी कायम महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवताना दिसते ह्यात! ह्याच सिरीयल मधून त्यांनी पदार्पण केले.
नंतर खिचडी ही त्यांची मालिका प्रसिद्ध झाली. गुजराती रंभूमीवर त्या सक्रिय आहेत. ह्याच वर्षी त्यांचा ‘गोलकेरी’ हा विनोदी गुजराती चित्रपट प्रदर्शित झाला.
५) राधिका ही दुसऱ्या बहिणीची भूमिका केली होती अभिनेत्री विद्या बालन हिने.
सुरुवातीचे काही ऍपिसोडस् ही भूमिका अमिता नागिया हीने केली होती. नंतर विद्या बालनने शेवटपर्यंत ही भूमिका निभावली.
हीनेदेखील ह्याच मालिकेतून पदार्पण केले आणि नंतर मागे वळून नाही पाहिले. एक नॅशनल ऍवॉर्ड आणि ६ फिल्मफ़ेअर ऍवोर्डस् मिळवले आहेत हिने.
परिणिता हा पहिलाच हिंदी चित्रपट, मग कहानी, द डर्टी पिक्चर, तुम्हारी सुलु, हमारी अधुरी कहानी असे चित्रपट सुपरहिट झाले विद्याचे!
२०१९ मध्ये मिशन मंगल मध्ये विद्या बालनने काम केले. ह्यावर्षी एक बायोपिक येणार आहे हिच जो गणितीय कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणार्या शकुंतलादेवी ह्यांच्यावर आधारित आहे.
बॉलिवूड प्रोड्युसर सिद्धार्थ राय कपूर हे विद्या बालनचे पती आहेत आणि दोघे मुंबईमधे राहतात.
६) राखी विजन ह्या अभिनेत्रीने स्वीटी ची म्हणजेच तिसऱ्या बहिणीची भूमिका केली.
जी जराशी भोळी होती. ही लग्नाळू मुलगी दरवाजा उघडताना गाणं म्हणते ते खूपच लोकप्रिय झाले होते. म्हणींचे, बोलण्याचे वेगळेच अर्थ लावणार्या ह्या स्वीटीला लोकांनी खूपच पसंत केले होते.
त्यानंतर तिच्या जस्सी जैसी कोई नहीं, हीना, मधुबाला-एक इश्क एक जुनुन ह्या मालिक लोकप्रिय झाल्या तर गोलमाल रिटर्न्स् आणि क्रिश ३ ह्या हिंदी चित्रपटांमध्ये हिने भूमिका केल्या होत्या.
आत्ता नागिन ४ ह्या हिंदी मालिकेमध्ये ही केतकी ची भूमिका करत आहे.
७) काजल भाई ह्या चौथ्या बहिणीची भूमिका केली होती भैरवी रायचुराने.
ही काजल भाई एकदम टॉम बॉय होती. एकदम टपोरी भाषा बोलणारी, बिनधास्त होती.
वो रहनेवाली महलों की, तृषा, गूटर गू ह्या हिंदी मालिका केल्या आणि प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली ती ससुराल गेंदा फूल मधील रजनी कश्यप ह्या भूमिकेला!
२०१६ पर्यंत बालिका वधू ही तिची मालिका टेलीकास्ट होत होती.
८) प्रियंका मेहेरा
हिने छोटी ची सगळ्यात धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. जी “गॉसिप्स” करण्यात एक्स्पर्ट होती. आता ती प्रोडक्शन करते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.