लॉकडाऊनच्या काळात एका नवीन नात्याची सुरुवात करायचा विचार करताय? आधी या गोष्टी वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
फेब्रुवारी मार्च मध्ये ह्या कोरोना व्हायरसने भारतात धुमाकुळ घालायला सुरुवात केली. १५ मार्च पासून शाळा महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी देण्यात आली.
पण ह्या व्हायरस मुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. रुग्णांची आणि बळींची संख्या वाढत चालली होती. २२ मार्चला सरकारने जनता कर्फ्यू लागू केला होता.
पुढे लागू झालेलं लॉकडाउन १४ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आलं, पण माणसांची बेफिकिरी आणि इतर काही कारणांमुळे हा रोग बळी घेतच होता. ह्या रोगाला दुसऱ्या स्टेजला थांबविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत.
अधिक धोका वाटल्यानंतर सरकारने आता टोटल लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवले. शाळा महाविद्यालये तर बंदच होती पण आता खाजगी ऑफिसेस् पण बंद.
इतकेच नाही तर खाजगी, सरकारी वाहने (अगदी रेल्वे पण बंद जे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होते), विमाने सर्व सर्व बंद! सगळीकडे घाबरलेली, गोंधळाची परिस्थिती आहे.
सगळं काही बंद असताना फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही.
पोलिस, डॉक्टर्स्, नर्सेस्, सफाई कामगार ह्यांच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे कोणी फिरताना दिसले तर झालाच लाठी चार्ज त्याच्यावर! सगळ्यांनी कंपल्सरी घरात थांबायचं आणि ह्या कोरोना व्हायरसला हरवायचे एवढंच उद्दिष्ट आहे आता.
आता आपल्याकडे एप्रिल मे हा सुट्ट्यांचा काळ! त्यामुळे ह्या सुट्ट्यांचे ‘प्लॅनिंग’ बऱ्याच जणांचे आधीपासूनच झाले असते. कोणी फिरायला जाणार असतं, कोणी गावी जाणार असतं.
आता ह्या परिस्थितीत कुठेच जाऊ शकत नाही. मग करणार काय? आत्ताची तरूण पिढी टि.व्ही. बघण्यात अज्जिबात रस नसलेली आहे.
मग काय मोबाइल, लॅपटॉप ह्यावर वेब सिरीज बघणे, सोशल मिडिया वर वेळ घालवणे, डेटिंग ऍप्स बघणे इत्यादी गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतात.
घराबाहेर तर पडता येत नाही. प्रत्यक्ष भेटणे तर आता शक्य नाही. त्यामुळे ह्या लग्न ठरलेल्यांनी, प्रियकर -प्रेयसी ह्यांनी काय करायचं अशा परिस्थितीमध्ये?
आधीच भेटण्यामध्ये अडथळे कमी नसतात, घरच्यांची परवानगी मिळणे कठिण असते, त्यातून ती मिळाली तरी भेटायचे कुठे आणि कसे? त्यातूनही भेटले तरी एकमेकांशी मनमोकळेपणे बोलता येईलच ह्याची खात्री नाही.
मग आता तर भेटण्याची पण शक्यता नाहीये. आज ह्या लेखातून आपण बघूया काय करायचं ते.
आता आपल्या जोडीदाराने सुरक्षित असणे जास्त गरजेचे आहे. अशात नवीन नातं असेल तर बोलण्यास संकोच वाटतो. भेटणं मुश्किल आहे ह्या लॉकडाऊन मध्ये.
तर आता नवनवीन गोष्टी आहेत, बोलण्यासाठी फोन आहेत, व्हिडिओ कॉलिंग आहे. ह्या माध्यमातून शक्यतो एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करता येईल.
सामाजिक अंतर राखून आपण आपलं म्हणणं आपल्या जोडीदाराला फोनवरून सांगू शकतो. विडिओ कॉलिंग वरून एकमेकांची ख्यालीखुशाली, एकमेकांना सुखरूप बघू शकतो.
आपण ह्या साथीच्या रोगात अडकलोय, त्यामुळे आपल्या साथीदाराबद्दल चिंता वाटणे साहजिकच आहे. ही चिंता तणावात बदलू शकते. जास्त तणाव तीव्र नैराश्यात बदलू शकतो ज्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
त्यासाठी आपल्या दिनक्रमावर कॉन्सट्रेट करणे गरजेचे आहे. आपली दिनचर्या, आपली चिंता कमी करू शकते. सामाजिक अंतर आणि त्यात जोडीदाराला भेटणे देखील मुश्किल ह्यामुळे नैराश्य वाढू शकते.
त्यामुळे आपण आपले मन कामात गुंतवणे सोयीस्कर ठरते. आपली कामं करताना आपलं मन गुंतुन राहतं आणि नकारात्मक विचार मनात येत नाहीत.
खरं तर जोडीदार नसेल तर आत्ता ही योग्य वेळ आहे डेटिंग साठी, नवीन नाते जोडण्यासाठी. कारण हीच वेळ आहे जेव्हा आपल्याला एकमेकांना जास्त समजून घेता येईल.
एकमेकांना आपापल्या जोडीदाराशी मनाच्या तारा (वेव्ह लेन्ग्थ) जुळवण्यासाठी ही वेळ अगदी परफेक्ट आहे. आपल्याला अडचणीच्या काळातच एकमेकांच्या स्वभावा विषयी जाणून घेता येणं सोप्पंय.
त्यामुळे नवीन नातं जोडण्यासाठी ही वेळ एकदम बरोबर आहे.
आता ह्या टोटल लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्सिंग असल्याने प्रत्यक्ष भेटता येत नसलं तरी भावनिक जवळिक वाढू शकते. आपण आपल्या जोडीदाराला खूप व्यवस्थित समजून घेऊ शकतो.
ज्यामुळे आपण मनाने एकमेकांच्या खूप जवळ येऊ शकतो. आपल्या जोडीदाराला आपला स्वभाव समजल्यामुळे तो देखील आपली सवय आपल्या नुसार अॅडजस्ट करू शकतो.
आपणही आपल्या जोडीदाराला समजून घेऊ शक्तो, त्याच्या सवयींप्रमाणे आपणही ऍडजस्ट करू शकतो ज्यामुळे आपण मनाने एकमेकांच्या जवळ येऊ शकतो जे एका नात्यात खूप महत्त्वाचे असते.
ह्या संकटामुळे सगळ्यांचेच आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे, त्यामुळे ह्या परिस्थितीत संकटाला तोंड देण्याची, धीराने घेण्याची आपल्या जोडीदाराची ही क्षमता आपल्याला समजू शकते.
आपल्या जोडीदाराला ह्या गोष्टीमुळे खूप आनंद होईल आणि त्यालाही धीर मिळेल, तोही संकटावर मात करण्यास सज्ज होईल. दोघं एकमेकांना संभाळून घेण्याची, समजून घेण्याची हीच वेळ योग्य आहे.
आपण आपल्या नात्यामधला विश्वास, आपल्याला नात्यात जे हवं आहे ते मिळण्याची, आपण आपल्या जोडीदारात जे शोधत असतो ते मिळण्याची, तो विश्वास मिळण्याची ही वेळ योग्य आहे.
आपण आपले नाते ह्या काळात अधिक मजबूत करू शकतो ह्या काळात. ही वेळ आपण एकमेकांना जाणून घेण्याची आहे ज्यामुळे आपला एकमेकांवरचा विश्वास वाढण्यास मदत होते.
नात्यांचा पाया विश्वासावरच अवलंबून असतो. तोच विश्वास ह्या काळात द्विगुणित होईल.
आपला जोडीदार किती सकारात्मक आहे हे ह्या संकटामुळे लक्षात येईल. जोडीदार सकारात्मक असेल तर आपण देखील सकारात्मक होऊ शकतो.
आणि कधी कधी एखाद्याला ह्या परिस्थितीमुळे निराशा येऊ शकते अशा वेळी आपला जोडीदार आपल्याला कसा धीर देऊ शकतो ह्यावर आपले नाते अधिक मजबूत होऊ शकते.
ह्या संकटामध्ये आपण आपला जोडीदार जर निवडला तर त्याच्यातले सगळे गुण आपल्याला समजतील आणि एकमेकांना समजून घेणे, संभाळून घेणे शक्य होईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.