Site icon InMarathi

कूबर पेडी एक संपूर्ण अंडरग्राऊंड शहर : वाचा माहीत नसलेली गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जर तुम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलियामधे काही लोक जमिनीखाली रहातात तर विश्वास बसेल का, नाही नं ? पण हे खरंय !

तुम्ही Australia मधे दक्षिणेकडील वाळवंटात गेलात तर तिथे Coober Pedy एक छोटंसं underground town आहे. पूर्वी ही जागा mining साठी वापरली जात असे परंतु कालांतराने तिथे वाळवंट पसरलं आणि या जागेचं रुपांतर चक्क एका गावामधे झालं. Coober Pedy हे Stuart Highway वर Adelaide ह्या Australia च्या एका मोठ्या शहरापासून ८४६ किमी उत्तरेकडे आहे.

 

 

ह्या जागी फिरतांना जर तुम्हाला ह्या गावाबद्दल माहित नसेल तर तुम्हाला लक्षात पण येणार नाही की इथेच खाली एक मोठं शहर वसलेलं आहे. इथल्या घरांना Australia मधे “Dugouts” म्हणून संबोधलं जातं.

आजही इथे जवळपास ३५०० लोकवस्ती आहे.

हे गाव जमिनीखाली कित्येक मैल लाल मातीत पसरलं आहे. इथे नुसती घरं नसून हॉटेल, ५ church, restaurants पण आहेत. घरांध्ये सगळ्या सोई सुविधा आहेत…अगदी well furnished घरासारख्या.

 

 

तुम्ही विचार करत असाल की हे गाव बनलं कसं असेल ?

Well, १९१५ मध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील सोन्याच्या शोधात असतांना त्यांना वाळवंटातील ही जागा सापडली.त्यांना सोनं तर मिळालं नाही परंतु आज जगप्रसिद्ध असणारा Opel Stone सापडला आणि मग ह्या stone साठी इथे mining सुरु झालं.

ह्या वाळवंटात प्रचण्ड उकाडा असल्यामुळे त्यांनी इथेच राहण्यास सुरुवात केली. हळू हळू जे mining workers होते ते पण इथेच राहायला लागले आणि बघता बघता तिथे १५०० Dugouts तयार झाले.

 

 

आहेत ना गमतीदार गोष्टी ह्या जगात !

मानवाने निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी काय काय करून ठेवलंय आपल्या पृथ्वीवर !

Australia मधे कधी गेलात तर ही जागा बघायला नक्की जा !

 

जिज्ञासूंसाठी एक छोटासा video:

All images : dailystar

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version