Site icon InMarathi

डॉक्टरकीचा पेशा पुन्हा स्वीकारून हा प्रसिद्ध अभिनेता उतरलाय कोरोनाच्या युध्दभूमीत!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज काल सर्वत्र एकच विषय आहे चर्चेचा! तो म्हणजे कोरोना व्हायरस किंवा कोविद-१९.

सगळ्या जगात थैमान घालून माणसांचे बळी घेणारा आणि सगळ्यांना भयभीत करणाऱ्या ह्या व्हायरसने अल्पावधीतच जवळ जवळ १८० देशांमध्ये फैलाव केला.

जवळ जवळ लाखोंच्या वर बळी घेतल आणि जवळपास तेव्हढेच संक्रमित झालेले आहेत.

बलाढ्य, प्रगत देश देखील ह्या व्हायरसपुढे हतबल झालेले आढळून आले. ह्या व्हायरसने गरीब, श्रीमंत- लहान, मोठा असा कोणताच भेदभाव केला नाही.

 

business standard

 

ह्या मोठ्या धक्क्यातून सावरल्यानंतर सगळे देश आपापल्या परीने ह्या व्हायरस विरूद्ध लढा देण्यास सज्ज झाले.

अचानक आलेल्य ह्या संकटाने सर्वजणच गोंधळून, गडबडून गेले आणि त्यातून सावरायच्या आतच बळींची संख्या शेकडोंच्या घरात गेली होती. जगभरात सर्वत्र भयावह वातावरण झाले आहे.

ज्याला संसर्ग झालाय त्याच्या जवळ कोणीही जायच नाही……..संसर्गजन्य रोग आहे ना हा! एक तर संसर्ग झालेला लवकर कळत नाही आणि ह्याची औषधे, लस काहीच उपलब्ध नाही.

फक्त डॉक्टर आणि नर्स पेशंटच्या जवळ जाणार.

कोणत्याही नातेवाईकाला कोरोना संसर्गग्रस्ता जवळ जायची परवानगी नाही. जिवंतपणी हे हाल तर होतातच पण मृत्युनंतरही ह्यांचे हे हाल संपत नाहीत, मृतदेह नातेवाइंकांच्या ताब्यात दिला जात नाही.

तर त्या मृतदेहाचे परस्पर अंत्यसंस्कार केले जातात (इटली मध्ये तर ह्याहून भयानक परिस्थिती होती). ही गोष्ट अंगावर शहारे आणणारी आहे.

 

der spigel

 

अंगाचा थरकाप उडवणारी परिस्थिती आहे सर्वत्र. कोणालाच काय होत आहे आणि पुढेही काय होणार ह्याची माहिती नाहिये.

अचानक ओढवलेल्या ह्या गंभीर परिस्थितीनंतर जरी सगळे गोंधळून गेले होते तरी त्यातून लगेच सावरून परिस्थितीला तोंड देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत.

भारत सरकार देखील यालाअपवाद नाहीये. आपले सरकार ह्या कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यास कटीबद्ध झाले आहे. सरकारने १५ मार्च ते ३१ मार्च शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले.

२२ मार्च रोजी टोटल लॉकडाऊन जाहिर झाले आणि त्याच रात्री परिस्थितीचे वाढते गांभीर्य लक्षात घेता लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले.

१४ एप्रिलपर्यंत म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत खाजगी, सरकारी वाहने अगदी रेल्वे पण (भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे इत्क्या दिवासांपासून बंद असेल) विमाने सर्व बंद. खाजगी कंपन्या पण बंद, काहींना घरूनच काम देण्यात आले.

कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही. २४*७ घरातच रहायचे. आता हाच लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

 

gulf news

अशा परिस्थितीत फक्त चार माणसे लोककल्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ते म्हणजे पोलिस, डॉक्टर्स्, नर्सेस् आणि सफाई कामगार!

स्वतःचा जीव जाणून बुजून धोक्यात घालून ही माणसे निःस्वार्थी पणे इतरांसाठी, बाकीच्यांचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस कसोशीने प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरसने सर्वत्र उच्छाद मांडलाय, तो संसर्गजन्य आहे नुसता संसर्गजन्यच नाही तर जीवघेणा आहे हे माहित असूनही ह्या लोकांनी आपापल्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं आहे.

ही लोकं आपल्या माणसांना लांबूनच पाहतात, त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवतात, आपल्यामुळे आपल्या घरातील इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून काही काही जण तर घरात पण जात नाहीत.

बाहेरच बसून जेवतात (ह्याचे व्हिडिओज् सोशल मिडिया वर व्हायरल झालेत). कर्तव्य आणि कुटुंब ह्यामधून त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. स्वतःचे मन घट्ट करून, स्वतःच्या घरच्यांपासून दूर राहून ते लोकसेवा करत आहेत.

माणसातल्या देवाचं दर्शन घडवणारे हे लोक आहेत आणि आज आपण अशाच एका माणसाची गोष्टा वाचूया ज्याने त्याच्यातल्या देवाचे दर्शन घडविले आहे.

 

CNBC.com

 

तसं बघायला गेलं तर स्वतःला पुढारी किंवा राजकारणी म्हणवून घेणारे, सेलिब्रिटी, सुपरस्टार, मोडेल्स् इत्यादी लोकं “अपनी चमडी बचाव” असे धोरण अवलंबताना नेहमीच दिसतात.

मिस् वर्ल्ड् किंवा मिस् युनिव्हर्स ह्यातल्या सुंदरी प्रश्नांना उत्तरे देताना समाजसेवा करणार असं जाहिर करतात, पण प्रत्यक्षात मात्र काही विपरीत झालं, संकट असेल तर किंवा कोणत्याही गरीब वस्तीत मदतीसाठी जाताना त्या कधीही दिसत नाहीत.

पण आजचा आपला हिरो मात्र ह्याला अपवाद आहे. हिंदी मालिका, तसेच हिंदी-मराठी चित्रटांमध्ये काम करणारा ह अभिनेता अल्पावधीत़च लोकप्रिय झाला.

हिंदी मालिकांमधून घरोघर पोचलेला हा अभिनेता आशिष गोखले (वय ३१ वर्षे)! आज आपण ह्याची कौतुकास्पद आणि प्रत्येकाला अभिमान वाटायला लावणारी प्रेरणादायक गोष्ट बघूया!

 

the tech of tommorow

 

हिंदी मालिका ‘कुमकुम भाग्य’ मधून आशिष गोखले सर्व परिचित झाला. सोनी चॅनल वरील तारा सितारा ह्या मालिकेत त्यांनी काम केले. तसेच गब्बर इज बॅक मध्ये त्याने अक्षय कुमार बरोबर काम केले.

मराठी चित्रपट मोगरा फुलला मध्ये देखील सौरभ गोखले ह्याने काम केले आहे पण, चित्रपट सृष्टीमध्ये किंवा मालिकांमध्ये काम करायच्या अगोदर ते डॉक्टर म्हणून कम करत असत.

साधारण पाचवर्षापूर्वी ते मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. त्यापूर्वी महाराष्ट्रातील कोकण प्रांतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत. मुंबईमध्ये आल्यावर जुहू येथील उपनगरी खाजगी रुग्णायालात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.

नंतर चित्रपट आणि दूरदर्शनवर काम करण्यास सुरुवात केली. पण ते आपला डॉक्टरी पेशा संभाळून! सकाळी शूटिंग आणि रात्री हॉस्पिटल मध्ये पेशंटस् तपासायचे अशी दिनचर्या सुरू झाली.

१४ मार्च २०२० रोजी त्यांनी हिंदी मालिका ‘क्यों रिश्तोम् में कट्टी बट्टी’ चं शूटिंग केलं, मराठी चित्रपट ‘लग्नकल्लोळ’ चे देखील शूटिंग सुरू होते, एक वेब सिरीजचं शूटिग सुरू होण्याच्या मार्गावर आणि नंतर लॉकडाऊन जाहिर झाला.

 

india today

 

एका खाजगी वाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले, “मी अभिनेता नंतर आणि आधी डॉक्टर आहे, त्यामुळे ह्या कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी मी सिद्ध झालो आहे.

त्यामुळे “लाईटस्, ऍक्शन” हे सगळं ‘मिस’ करत असलो तरी ह्या रोगाला हरवायचंय मला.”

त्यासाठी हा अभिनेता आता २४*७ रूग्णांची काळाजी घेण्यास, त्यांना ह्या भयंकर आजारातून बरे करण्यास सज्ज झाला आहे. त्यापुढे ते म्हणतात की, “डॉक्टरच्या भूमिकेत शिरण्यासाठी मला पूर्वतयारी करावी लागत नाही, कारण डॉक्टरची पदवी मिळविण्यासाठी मी साडे पाच वर्षे अभ्यास आणि मेहनत केली आहे.

डॉक्टरची प्रॅक्टिस देखील केली आहे. एक डॉक्टर ह्या नात्याने मला रूग्णांची सेवा करणे, त्यांना कोरोनामुक्त करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे.

त्यासाठी मी येथे २४x७ कार्यरत आहे. जनमानसात डॉक्टरांची प्रतिमा फारशी चांगली नाही, ते पैशांसाठी रूग्णाला कोणतीही चाचणी करण्यास सांगतात, पैशांसाठी रूग्णांना खूप त्रास देतात, कृतघ्न पणे, दुष्ट पणे वागतात असेच वाटते लोकांना!

पण आता डॉक्टर हे देव आहेत, खरे नायक आहेत हे सगळ्यांना मान्य करावेच लागेल.”

खरंच आहे त्याचं म्हणणं! आत्ताच्या घडीला जे नायक आहेत त्यात डॉक्टर्स् चा नक्कीच समावेश होतो. डॉक्टर आशिष सारख्या नायकांना मनापासून मानाचा मुजरा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version