' कोरोनापेक्षाही भयंकर या १० व्हायरसनी घेतले आहेत जगभरातील लाखो लोकांचे बळी – InMarathi

कोरोनापेक्षाही भयंकर या १० व्हायरसनी घेतले आहेत जगभरातील लाखो लोकांचे बळी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे आपण सगळेच घरी आहोत, आणि कोरोनाचं हे संकट कधी टळेल याची वाट पाहत आहोत. अशा प्रकारचा एखादा आजार, एखादी साथ सध्याच्या पिढीला पहावी लागेल असं कोणालाही वाटत नव्हतं.

कारण आताच्या आधुनिक जगात सगळ्याच गोष्टींवर आजारांवर औषध आहे असे वाटत होते. जगामध्ये अशा अनेक साथी आधी येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे गावच्या गावं, देशच्या देश उध्वस्त झालेले उल्लेख आपण वाचलेले आहेत.

पण कोरोनामुळे आता त्याचा आपल्याला अनुभव देखील येत आहे. जगामध्ये अनेक व्हायरस आधी येऊन गेलेले आहेत. कोरोनापेक्षाही भयंकर १० व्हायरस अस्तित्वात आहेत त्यांची माहिती सगळ्यांनाच असणे आता गरजेचे आहे.

 

corona and sari inmarathi 2

 

तसं पाहायला गेलं तर माणसाचं आधुनिक जग सुरू व्हायच्या आधीपासूनच या व्हायरसने आपली चुणूक माणसाला दाखवलेली आहे. अलीकडील काळातील अनेक व्हायरस हे प्राण्यांकडून किंवा पक्षांकडून माणसाला झालेले आहेत.

तरीदेखील माणसाने या व्हायरस वरती कंट्रोल मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. तरीदेखील आजही असे दहा व्हायरस आहेत ज्यामुळे माणसाचं आयुष्य सुरू राहिलं तरी त्याला क्षती पोहोचलेली आहे.

==

हे ही वाचा : करोना व्हायरसला हरवायच असेल तर हे ११ गैरसमज दूर होणं अत्यावश्यक आहे

==

१. इबोला व्हायरस

१९७६ मध्ये सुदान आणि कांगो या देशांमध्ये हा व्हायरस पहिल्यांदा आढळून आला. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, एका उडणाऱ्या किड्यांपासुन हा व्हायरस माणसांमध्ये आला.

आणि आता संक्रमित माणसाच्या रक्त आणि इतर द्रव्यांमधून तो दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो.

 

ebola virus inmarathi

 

त्यामुळे माणूस फक्त आजारी पडत नाही तर इबोला ने होणाऱ्या मृत्युदराचे प्रमाण हे अधिक आहे. सुदानमध्ये तर ईबोला झालेले ७१ टक्के लोक मरण पावतात.

२०१४ मध्ये पश्चिम आफ्रिकेमध्ये इबोलाचा उद्रेक झाला होता आणि त्यात कितीतरी लोक मृत्युमुखी पडले. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा उद्रेक खूप मोठा होता.

आजही आफ्रिकेत अजूनही इबोलाचा संकट तसंच आहे. युगांडा या देशाला इबोला मुक्त असे जाहीर करून दोनच दिवस झाले नाहीत तोपर्यंत तिथे इबोला मुळे दोन मृत्यू झालेले आहेत.

 

२. मारबर्ग व्हायरस

हा व्हायरस १९६७ मध्ये जर्मनी मधल्या एका प्रयोगशाळेतील लोकांमध्ये आढळून आला. युगांडा वरून काही माकडांना जर्मनीमध्ये आणण्यात आलं होतं, त्यांच्या संपर्कात आल्याने जर्मनीच्या प्रयोगशाळेतील लोकांना हा व्हायरस झाला.

 

markburg virus inmarathi

 

इबोला आणि मारबर्ग व्हायरसची लक्षणे साधारण एक सारखीच आहेत. यामध्ये पेशंटना प्रचंड ताप येतो आणि आणि शरीरातून रक्तस्त्राव होतो. त्यातूनच शरीरातील एक एक अवयव निकामी होतो आणि माणसाचा मृत्यू होतो.

हा व्हायरस देखील मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. ज्या लोकांना हा व्हायरस होतो त्यातील ९० टक्के लोक हे मृत्युमुखी पडतात. जगातला सगळ्यात डेंजर व्हायरस समजला जातो.

 

३. रेबीज

सगळ्यांना माहीत आहे की, हा आजार प्राण्यांपासून माणसांना होतो. विशेषतः कुत्र्यापासून. हा आजार झालेले कुत्रे जर माणसाला चावले तर माणसालाही तोच आजार होतो.

 

rabies inmarathi

 

त्यामुळे माणसाचा मेंदू काम करत नाही. हा सर्वात भयानक आणि भयंकर आजार आहे.

रेबीज वर सध्या लस उपलब्ध आहे तरीदेखील भारत आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये अजूनही ही हा आजार गंभीर स्वरूपात समोर येतो. जर वेळेत उपचार केले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू ठरलेलाच आहे.

 

४. एचआयव्ही

एच आय व्ही एड्स हादेखील संक्रमणातून होणारा आजार आहे. एचआयव्ही मुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. १९८० पासून आतापर्यंत ३२ दशलक्ष लोक या आजाराचे बळी ठरलेले आहेत.

 

hiv aids inmarathi

 

आजही जगभरात याचे अनेक रुग्ण आहेत. इतिहासातील सगळ्यात जास्त लागण झालेला एच आय व्ही हा व्हायरस आहे. गरीब आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला.

आफ्रिकेमधील काही देशांमध्ये २५ व्यक्तीमागे एक जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. सध्या केवळ पॉवरफुल अँटिव्हायरल औषध उपलब्ध असल्यामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांचे आयुष्यमान थोडे वाढले आहे.

==

हे ही वाचा : कोरोनाशी लढत असताना “हे” वेगवेगळे व्हायरस भयावह संकट घेऊन येण्याची काळजी तज्ञांना वाटतेय

==

 

५. डेंग्यू

 

dengue-inmarathi

 

१९५०आली पहिल्यांदा डेंग्यू हा आजार फिलिपिन्स आणि थायलंडमध्ये दिसून आला. डास चावल्यामुळे हा आजार होतो. उष्णकटिबंधीय प्रदेशात अशा डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे या भागातच डेंग्यू जास्त प्रमाणात दिसून येतो.

जगातील ४० टक्के लोकसंख्या डेंग्यू प्रभावी क्षेत्रांमध्ये राहते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी दहा कोटी लोक डेंग्यूमुळे आजारी पडतात.

डेंग्यू झालेल्या माणसाला इबोला होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी डेंग्यू कडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

अमेरिकेच्या एफडीएने २०१९ मध्ये डेंग्यूच्या लसीला मान्यता दिली आहे. आता नऊ ते सोळा वर्षांखालील मुलांना ही लस देण्यात येते.

डेंग्यू प्रभावित काही देशांमध्ये नऊ ते पंचेचाळीस वर्षांच्या व्यक्तींनाही लस देण्याची मान्यता देण्यात आली आहे.

 

६. हंता व्हायरस

उंदारापासून होणार हा आजार आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो आणि यातच माणसाचा मृत्यू होतो. उंदराच्या मलमूत्र पासून हा आजार होतो असं समजलं जातं.

 

hantavirus inmarathi

 

पहिल्यांदा अमेरिकेमध्ये हा आजार आढळून आला होता. फक्त एका माणसापासून दुसऱ्या माणसाला याचा संसर्ग होत नाही. सध्या चीनमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.

१९५० मध्ये कोरियन युद्धाच्यावेळी वेळेस याचा प्रादुर्भाव जास्त झाला. ३००० सैनिकांना या व्हायरसची लागण झाली त्यात १२ टक्के सैनिक मृत्यू पावले.

 

७. स्मॉलपॉक्स (देवी)

देवी हा आजार माणसाला अनेक शतकांपासून झालेला आहे. ज्या माणसाला हा आजार होतो त्याच्या शरीरभर अंगावर पुरळ येतात, प्रचंड ताप येतो. अनेक लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत.

 

devi vaccine inmarathi

 

जे वाचले त्यांच्या शरीरावर पुरळांचे व्रण तसेच राहिले आणि काही जणांचे दृष्टी देखील त्यामुळे गेली. देवीमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. याबाबत काळा इतिहास आहे.

अमेरिकेतल्या रेड इंडियन्सना संपवण्याकरिता युरोपियन लोकांनी तिकडे स्मॉलपॉक्स हा व्हायरस सोडला असं म्हटलं जातं. त्यात अनेक रेड इंडियन्स मृत्युमुखी पडले.

आता विसाव्या शतकात देवी वरची लस तयार करण्यात यश आलं आणि आता जगातून देवी हा आजार संपलेला आहे. १९८० मध्ये वर्ल्ड हेल्थ असेम्बलीने जग देवी मुक्त झालं आहे असं डिक्लेअर केलं.

 

८. इन्फ्लुएंझा

दरवर्षी जगभरात पाच लाख लोक फ्लूमुळे मृत्युमुखी पडतात. जर एखादा नवीन फ्लू आला तर त्याची लागण फार लवकर सगळीकडे पसरते. जेव्हा फ्लूची महामारी येते तेव्हा तिला वेगवेगळे नाव दिले जातात.

 

corona heart inmarathi

 

उदाहरणार्थ स्पॅनिश फ्ल्यू. १९१८ मध्ये आलेल्या या फ्लूमुळे जगभरातील ४० टक्के जनता आजारी पडली. ५० दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार फ्लू’ची अशी एखादी साथ जर परत आली तर आणि माणसांमधला संक्रमण वाढलं तर नक्कीच प्रॉब्लेम होईल.

 

९. रोटाव्हायरस

 

rota virus inmarathi

 

हा शक्यतो लहान मुलांना होण्याचा आजार आहे परंतु सध्या यायावर लस उपलब्ध असल्यामुळे याचा धोका आता कमी झाला आहे.

जन्मलेल्या बाळाला ही लस देण्यात येते.

==

हे ही वाचा : या प्राण्यात सापडला कोरोना व्हायरस, म्हणून डेन्मार्कने घेतलाय एक भयंकर निर्णय!

==

 

१०. सार्स cov

सार्स cov या आजाराचा त्रास हा मुख्यतः श्‍वसन संस्थेला होतो. २००२ दोन मध्ये पहिल्यांदा हा व्हायरस चीन मध्ये आला. वटवाघळापासून हा व्हायरस पहिल्यांदा अाला. त्यानंतर त्याचा प्रसार सव्वीस देशांमध्ये झाला.

 

corona virus fight inmarathi

 

त्यावेळेस सार्स मुळे आठ हजार लोकांना याची लागण झाली आणि ८७० पेक्षा अधिक लोक जगभरात मृत्युमुखी पडले. ताप थंडी आणि अंगदुखी याची लक्षणे होती.

त्यानंतर तो ताप प्रचंड वाढायचा आणि निमोनिया व्हायचा शिवाय फुफ्फुसांमध्ये पाणी साठून श्वास घेण्यास त्रास व्हायचा, आणि व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. ह्या रोगाचा प्रसार व्हायचा रेट ९.६% होता. त्यानंतर ह्या आजाराचे रुग्ण दिसून आले नाहीत.

त्यानंतर आला Mers cov….याची लक्षणे देखील सारखीच होती. तो २०१४-२०१५ मध्ये दक्षिण कोरिया मध्ये अाला होता. त्यातही फुफ्फुसाना सूज येऊन श्वास घ्यायला त्रास व्हायचा, निमोनिया व्हायचा आणि रुग्णाचा मृत्यू व्हायचा.

आता नवीन आलेला covid-19 हा देखील सार्स covid या फॅमिलीतील नवीन व्हायरस आहे. याचा उगम देखील चीन मध्येच झाला आहे.

सर्सच्या आजारावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?