अव्हेंजर मेकर रुसो ब्रदर्सच्या आगामी सिनेमात ‘थॉरसमोर’ उभे ठाकलेत “हे” २ भारतीय अभिनेते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अवेंजर्स या सिरीज मधला सिनेमा ”अवेंजर्स एन्ड गेम” हा सिनेमा जगभरात एकाच वेळेस प्रदर्शित करण्यात आला होता.
या सिनेमाची मार्केटिंग कॅम्पेन खूप मोठ्या प्रमाणावर चालवल गेलं होतं, आणि सगळ्यात जास्त रेकॉर्डब्रेक कमाई देखील याच सिनेमाने २०१९ मध्ये केली.
सिनेमाचे शूटिंग अटलांटा, न्यूयॉर्क, इंग्लंड, स्कॉटलांड इतक्या ठिकाणी करण्यात आलं होतं. या सिनेमाचे व्हिज्युअल इफेक्टसचं देखील खूप कौतुक करण्यात आलं होतं.

एक्टिंग, म्युझिक ॲक्शन सिक्वेन्स हेदेखील वाखाणले गेले होते. तेव्हा टिनएजर मुलांना या सिनेमाने अक्षरशः वेड लावले होते.
त्याच अव्हेन्जेर एन्डगेमचे दिग्दर्शक रुसो ब्रदर्स हे आता एक नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्याचं नाव आहे Extraction. याचा अर्थ म्हणजे खरंतर शक्ती लावून एखादी वस्तू काढणे.
नावावरूनचं लक्षात येत आहे की हा एक ऍक्शनपट असेल. आणि तो अर्थातच बिग बजेट वगैरे असेल. पण तसं तर हॉलिवूड मध्ये अनेक सिनेमे, बिग बजेट सिनेमे देखील येत असतात.
आणि जगभर त्यांचे मार्केटिंग कॅम्पेन देखील चालतं.
पण मग या सिनेमाची आपल्या भारतात चर्चा होण्याइतपत काय विशेष आहे? याचं कारण म्हणजे या आगामी सिनेमाचं भारताशी कनेक्शन आहे.
भारतातील बॉलिवूडमधील दोन कलाकार रणदीप हुडा आणि पंकज त्रिपाठी हे या सिनेमात काम करत आहेत.
या सिनेमाचं आणखी एक आकर्षण हे आहे की थॉरचं काम करणारा कलाकार ख्रिस हेमस्वर्थ देखील या Extraction मध्ये आहे.
Extraction या सिनेमाची गोष्ट ही साधारणतः भारत-बांगलादेश मधल्या ड्रग्ज स्मगलर यांच्यातील दुष्मनीवर आहे.
यांच्या आपापसातील भांडणात बांगलादेश मधल्या ड्रग्ज स्मगलरच्या मुलाचं किडनॅपिंग होतं. आता त्याला वाचवायचं आहे.
त्यासाठी बांगलादेश मधला ड्रग माफिया परदेशातून एका फायटरला, टायलर रॅकला ढाक्याला बोलवतो, जो अशी कामं पैसे घेऊन करतो.
आता टायलर रॅकवर ही जबाबदारी येते, की त्या मुलाला सुरक्षितपणे शत्रूच्या कब्जातुन सोडवणे आणि त्याला त्याच्या घरी पोहोचवणे.
टायलर रॅक शिताफीने आपली कामगिरी चोख पार पाडतो आणि त्या मुलाला सोडवून आणतो. पण जेव्हा तो त्या मुलाला घेऊन येत असतो याच वेळेस त्याला माहीत होतं, की संपूर्ण ढाका शहर हे लॉक डाऊन आहे.
आता किडनॅपर्सना देखील कळून चुकलं आहे की या मुलाला सोडवण्यात आलं आहे. आता ते या मुलाच्या शोधार्थ निघाले आहेत पण टायलर रॅक आता त्या मुलाला वाचवायची जबाबदारी घेतो.
कारण मुलाला सुखरूप पोहचवल्यावरच त्याला पैसे मिळणार असतात. शिवाय आता त्या मुलाबरोबर त्याचं एक छान नातं तयार झालं आहे.
टायलर रॅक त्या मुलाला त्या किडनॅपर पासून वाचवू शकेल का? पुढे काय होईल हे पाहायचं असेल तर हा सिनेमा पाहावा लागेल.
Extraction हा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा आहे. संपूर्ण सिनेमात ॲक्शन सिक्वेन्स आहेत. परंतु थ्रील कमी असेल अशी शक्यता आहे. कारण ट्रेलर वरूनच संपूर्ण सिनेमाची स्टोरी कळत आहे.
काही ईमोशनल प्रसंग देखील यामध्ये दिसून येतात. ट्रेलर पाहताना हा सिनेमा जास्त करून बॉलिवूडचा वाटतोय, कारण यात बहुतांश कलाकार हे बॉलिवूड मधील आहेत.
केवळ बॅकग्राऊंड स्कोर, ऍक्शन स्क्विन्सेस आणि प्रमुख भूमिकेतील कलाकार पाहून हा सिनेमा हॉलीवूडचा वाटतोय.

या सिनेमातील कथेचा नायक टायलर रेक याची भूमिका केलीय ती प्रसिद्ध हॉलीवूड कलाकार ख्रिस हेम्सवर्थ यांनी.
बांगलादेशी आणि भारतीय ड्रग्स माफियांच्या भूमिकेत आहेत प्रियांशू पनुअली आणि पंकज त्रिपाठी!
यांच्याआधी प्रियांशु पॅन्युअली यांनी ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या सिनेमात काम केले आहे. तर पंकज त्रिपाठी यांनी ‘ मिर्झापूर’ या सिरीजमध्ये काम केले आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रणदीप हुडाचे काही ऍक्शन सिक्न्सेस दिसतात, परंतु त्यावरून रणदीप हुडाची नक्की भूमिका काय आहे हे समजत नाही.
बहुतेक भारतातील ड्रग माफिया गँगमधील एकजण असावेत. याशिवाय डेव्हिड हार्बर हे देखील या सिनेमाचा भाग आहेत.

तसेच यात मुलाला सोडवण्यासाठी संपूर्ण प्लॅनचं प्लॅनिंग करणारी स्त्री कलाकार आहे गोलशिफ्टे फरहानी. जिने आधी ‘पायरेट्स ऑफ कॅरिबियन’, ‘डेड मेन टेल् नो टेल्स’, ‘ अबाउट एली ‘इत्यादी सिनेमांमध्ये काम केले आहे.
मनोज बाजपाई देखील या सिनेमाचा एक भाग आहे म्हटलं जातंय मात्र ट्रेलर मध्ये मनोज वाजपेयी कुठेही दिसत नाही, त्यामुळे त्यांची नक्की भूमिका काय आहे हे प्रत्यक्ष पडद्यावरच पहावं लागेल.
Extraction या सिनेमाची गोष्ट लिहिली आहे ती ज्यो रुसो यांनी. आणि याची निर्मिती देखील ज्यो रुसोने आपल्या भावाबरोबर अँथानी रूसो याच्या बरोबर केली आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन सॅम हरग्रेव यांनी केलं आहे. सॅम हे मुळात स्टंट डायरेक्टर आहेत ८० पेक्षा जास्त सिनेमांसाठी त्यांनी स्टंट डिपार्टमेंट मध्ये काम केलं आहे.
ज्यामध्ये ‘एव्हेवेंजर एण्डगेम’ , ‘थॉर रैगनोरक’ , “कॅप्टन अमेरिका-सिव्हिल वॉर “आणि ‘ सुसाईड स्कॉड’ इत्यादी सिनेमांचा समावेश आहे.
या सिनेमाचं नाव पहिल्यांदा ‘ढाका’ ठेवायचं ठरलं होतं कारण या सिनेमाची गोष्ट ढाक्या मध्ये घडते. नंतर त्याचं नाव बदलून ‘ आउट ऑफ फायर’ असं ठेवायचं ठरलं,
पण सरतेशेवटी आता ‘Extraction’ या नावाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सिनेमामध्ये बांगलादेशात घडणाऱ्या घटनांच शूटिंग हे अहमदाबाद आणि मुंबई या ठिकाणी करण्यात आलं आहे. सिनेमातील काही दृश्य ही थायलंडमध्ये चित्रीत करण्यात आली आहेत.
येत्या २४ तारखेला Extraction नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे. कारण सध्या संपूर्ण जगभरातच लॉक डाऊन सुरू असून सर्व मल्टिप्लेक्स , सिनेमागृह सध्या बंद आहेत.
जगभर लॉक डाऊन सुरू असताना हॉलीवूड मधील एक सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मुख्य म्हणजे आपल्या ओळखीचे खूप चेहरे या सिनेमात असणार आहेत.
अँक्शनपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी तर ही एक पर्वणी आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.