पगाराची चिंता; सध्या कमी होणारा बॅंकबॅलन्स: ‘हे’ उपाय आताच केले नाहीत तर पश्चातापाची वेळ येईल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
‘सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही’. ही म्हण आज तंतोतंत लागू पडत आहे. कोरोना मुळे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत.
तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असा किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये, कमी अधिक टक्के पगार कपात ही निश्चित असणार आहे. तुम्ही जर का या परिस्थितीची तरतूद करून ठेवलेली असेल तर चांगलंच आहे. अन्यथा, अजूनही उशीर झालेला नाहीये.
मार्केट ची परिस्थिती दिवसेंदिवस इतकी खराब होत आहे की तुम्ही ऐन वेळी कोणाकडून पैसे उधार सुद्धा घेऊ शकणार नाही.
तेव्हा येणाऱ्या आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही उपाय आम्ही या लेखातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहोत.
आपण ज्या कंपनी साठी काम करत आहोत त्याचं उदाहरण घेऊया. कमी पैशात प्रत्येक कंपनी सध्या काय करत आहे ?अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचं काम.
हेच आपल्याला सुद्धा आपल्या घरात करायचं आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या तब्येतीची काळजी घेणं ह्यालाच फक्त आपलं प्राधान्य असलं पाहिजे.
ज्यामध्ये अत्यावश्यक खाण्या पिण्याच्या गोष्टीत आपण कुठेही काटकसर करणं अपेक्षित नाहीये. गरज आहे ती अनावश्यक खर्च शोधणं आणि त्याला कात्री लावणं. साधारणपणे घरात आपण घरातील ह्या गोष्टी टाळू शकतो:
१. कार इन्शुरन्स प्रीमियम:
सध्या जर का आपल्या करचं इन्श्युरन्स renewal करायची वेळ आली असेल तर तुमच्या संस्थेशी किंवा त्यांच्या एजंट शी बोला आणि प्रीमियम कमी करता येईल का याची विचारणा करा. थोडं negotiate करा.
तुम्ही हे कारण सांगू शकता की, एक महिना कार ही जास्त फिरणारच नाहीये. त्यामुळे थोडा तरी discount द्यायला पाहिजे. विचारायला काय हरकत आहे?
२. Gym Membership:
आपल्याला माहीतच आहे की आपण ह्या काळात घराबाहेर कुठल्याच कारणासाठी पडू शकत नाहीत आणि पडलं सुद्धा नाही पाहिजे.
अशा परिस्थितीत आपण आपली जिम ची फीस सुद्धा पुढील काही महिन्यांसाठी एकत्र भरण्याचं टाळावं आणि शक्य असल्यास जर काही रिफंड मिळत असेल तर तो सुद्धा घ्यावा.
या काळात तुमच्याकडे जितके पैसे असतील तितके तुम्ही secure असाल. कारण येणाऱ्या महिन्यात तुम्हाला हेच पैसे घर चालवायला कामी येऊ शकतात.
जर का तुमच्या जिम ने तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग द्यायचं ठरवलं असल्यास त्यांना त्यामध्ये सुद्धा फीस कमी करण्याचं निवेदन करा. कारण, तुम्ही त्यांची जागा, electricity ह्या गोष्टींची बचत करून देत आहात.
३. ऑनलाईन कोर्सेस:
तुमच्या ऑफिस ने तुमच्यासाठी काही ऑनलाईन कोर्स चे जर क्लास नियोजित करून ठेवले असतील आणि जर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ह्या दिवसात तुम्ही घरी असणार आहात.
आणि जे काही त्या कोर्स मध्ये शिकणार आहात त्याचं प्रात्यक्षिक ऑफिस मध्ये करू शकणार नाहीत तर या कोर्सेस ला काही दिवस ब्रेक घेतलेला कधीही चांगलं.
त्यामुळे जर का तुम्हाला द्यावी लागणारी फीस कमी होणार असेल किंवा काही दिवस ते देणं लांबणीवर पडत असेल तर त्याचा फायदा तुम्हालाच होऊ शकतो.
काही कोर्सेस कॅन्सल करायला सुद्धा ३० दिवसांआधी सांगावं लागतं. तेव्हा वेळ घालवू नका. आजच निर्णय घ्या.
४. EMI :
आपल्या सर्वांचा नेहमी चर्चिला जाणारा विषय. आपण असं म्हणतो सुद्धा की आपण काम करतो ते फक्त EMI वेळच्या वेळी भरण्यासाठीच.
तुमच्या पगारात होणारी संभाव्य पगार कपात लक्षात घेता सरकारने आणि बँकेने पुढील तीन महिने तुमचे EMI स्थगित करण्याची परवानगी दिलेली आहे.
गरजू लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे जेणेकरून तुमच्या सेविंग मधील पैसे वापरण्याची गरज पडणार नाही. त्यावर काही व्याज लागणार असेल तर त्याची पूर्ण माहिती बँकेने त्यांच्या वेबसाईट वर उपलब्ध करून दिलेली आहे.
ती व्यवस्थित वाचून तुमचा निर्णय घ्या आणि योग्य ती कृती करा.
५. मुलांच्या फोन वरील खर्च:
आपल्याकडे आजकाल प्रत्येक माणसाला एक याप्रमाणे फोन वापरले जातात आणि त्यांचे दर महिन्याला बिल भरले जातात. प्रत्येकाचा मोबाईल चा बिल प्लॅन, इंटरनेट खर्च हा वेगवेगळा असतो.
सध्या मिळालेला वेळ ही योग्य संधी आहे त्या सर्वांवर अंकुश लावण्याची आणि सर्वांनी घरातील कॉमन WiFi वापरण्याची. मुलांना आपण फोन या कारणासाठी देतो की ते कुठे बाहेर असले की संपर्कात असावेत.
पण सध्या तसं होणारच नाहीये. सगळे जण घरातच एकत्र असणार आहेत. या महिन्या पुरता फोन चा रिचार्ज न करता तेच पैसे वापरून घरातील सर्वांना इंटरनेट उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू शकतो.
त्याच बरोबर आपले इतर बिल्स जसं की लाईट बिल, पाणी बिल हे सुद्धा आपण एक महिन्यासाठी hold वर ठेवू शकतात. कोणतंही खातं लगेच तुमचं कनेक्शन कट करणार नाहीये.
६. ऑनलाईन ordering:
या दिवसात असं होणार आहे की घरात बसून आपण सारखं काही ना काही ऑर्डर करण्याकडे आपला कल असेल. ह्याला आजकाल ‘पॅनिक buying’ असं सुद्धा म्हटलं जातं.
एखादी गोष्ट उद्या किंवा पुढच्या आठवड्यात मिळणार नाही या भीतीने केलेली खरेदी. असं करण्याची काही एक गरज नाहीये. त्यामध्ये विनाकारण जास्तीचे पैसे वाया घालवू नका. तेच पैसे तुम्हाला पुढे कामी येतील.
गरजेपुरतं ऑर्डर करा. ते संपवा. मगच पुढची ऑर्डर द्या. सरकारी निर्देशानुसार जीवनावश्यक गोष्टीचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकार आणि आपली यंत्रणा सर्व प्रयत्न करत आहेत.
त्याच बरोबर काही घरात ऑनलाईन इंटरनेट टीव्ही जसं की Netflix, Amazon prime वगैरे कित्येक चॅनल चे subscription घेऊन ठेवले आहेत आणि त्यावर खूप जास्त खर्च देखील होत आहे.
तो खर्च कमीत कमी ठेवा. ऑर्डर करायचं असेल तर जवळपास असलेल्या हॉटेल मधून खाण्याचे पदार्थ मागवा. त्या बिजनेस ला आता तुमच्या सहकार्याची गरज आहे.
आपण पाहिलं की किती तरी माध्यम आहेत ज्यामधून होणारा वायफळ खर्च आपण कमी करू शकतो आणि स्वतःला या कठीण काळात physically आणि financially सुद्धा healthy ठेवू शकतो.
मिळालेल्या वेळात आपण एखादं ऑनलाईन काम करून पैसे कमाई करून देणारं माध्यम असेल तर ते शोधू शकतो. त्या माध्यमाची पूर्ण माहिती, reviews आपण या दिवसात आपण वाचू शकतो.
मगच त्यांच्यासोबत एखादा ऑनलाईन व्यवहार करू शकतो. ऑनलाईन ट्रेडिंग हे सुद्धा तज्ञ लोकांकडून समजून घेल्यास या काळात तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.
कोरोना सारखं संकट किती दिवस असेल हे माहीत नाहीये. असं संकट परत येणारच नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये.
काळाची पाऊलं ओळखून गरज आहे ती आपण आपल्या रिटायरमेंट ची व्यवस्थित प्लॅनिंग करून घेण्याची आणि त्यानुसार आजपासूनच पैसे invest करण्याची.
ती रक्कम सुरुवातीला कमी असेल तरीही चालेल. पण, ती रक्कम आपण सातत्याने बाजूला ठेवण्यातच शहाणपण आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.