Site icon InMarathi

स्टार्टअप ते अब्जावधी किंमत असलेल्या “झुम” अॅपचा मालक : वाचा या सुपरमॅनचा अद्भुत प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरून काम करत आहेत. अशातच ऑफिसच्या कामांसाठी व्हिडिओ कॉल केलं जातो. “झुम” या अॅपमुळे या गोष्टी अधिक सोप्या झाल्या आहेत.

जाणून घेऊया या अॅपविषयी महत्त्वाच्या गोष्टी- 

एरीक युआन याने २०११ मध्ये झूम अॅपची निर्मिती केली. सिस्को या कंपनीने त्याचे हे अॅप तेव्हा ३.२ बिलिअन डॉलर्सना खरेदी केले.
शेअर मार्केटच्या हिशोबाने आज एरिक युआनची झुम मधील भागीदारी २.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

२०१८ मध्ये त्याची ग्लासडोअर या मोठ्या कंपनीत कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या ९८ टक्के रेटींगने कंपनीचा सीईओ म्हणून नेमणूक झाली होती.

२०११ साली या अॅपची आवश्यकता किंवा महत्त्व कोणालाही वाटत नव्हते. ना युआनच्या जवळच्या मित्रांना, ना सल्लागारांना की ना शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांना.

तेव्हा स्काईप, गो टू मिटींग आणि सिस्कोमधील कॉन्फरन्सिंग अॅप या सुविधा चालू होत्या. आणि युआन स्वतःच या सगळ्यांच्या अभियांत्रिकी टिमचा मुख्य होता.

 

twitter

 

युआनने हे अॅप बाजारात आणले तेव्हाच सगळे म्हणत होते की यात काही नवीन नाही. असे अॅप तर बाजारात आधीच उपलब्ध आहेत.

पण वयाच्या २७ व्या वर्षांपासून म्हणजे १९९७ पासून चीनमधून हाँगकाँगला स्थायिक झालेले एरीक युआन म्हणतात, की त्या उपलब्ध असलेल्या अॅप्समध्ये दोन दशकांपूर्वीचा जुनाच बग्गी कोड असल्याने ती अॅप्स वापरताना कुणालाही मजा येत नव्हती.

आणि एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांना हे देखील कळत होतं, की सध्याचे स्मार्ट फोन आणि टॅबलेट्स हे उपलब्ध असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉलच्या सुविधा देणाऱ्या अॅप्सपेक्षा खूप काही अजून चांगलं काम करू शकतात.

त्यामुळे झूम अॅप्सबद्दल शंका व्यक्ता करणाऱ्या लोकांकडे युआन यांनी दुर्लक्ष केले आणि त्याच्या ग्राहकांकडे लक्ष केंद्रित केले. आज युआन यांचे म्हणणे खरे ठरले आहे.

 

 

झूमने शेअऱ बाजारात पदार्पण केल्यानंतर कंपनीचे मूल्य १५.९ मिलिअन डॉलर इतके होते. कंपनीने ३५६ मिलिअन डॉलर्सनी कंपनीचे मूल्य वाढवल्यानंतर शेअरचा भाव ७२ टक्क्यांनी वाढून तो ६२ डॉलर्सपर्यंत पोचला होता.

झूम आज जगातील बिलिऑनायर कंपनीत गणली जातेय. एका उभरत्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी ही गोष्ट असामान्य आहे. आज हजारो व्यावसायिक झूमचे अॅप व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरतायत.

या कंपनीत जवळपास २० टक्क्यांची भागीदारी असलेले एरिक युआन हे आज आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अब्जाधीश नवश्रीमंत म्हणून गणले जातायत. त्यांची ही भागीदारी २.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

बिजींगमध्ये एक लहान सॉफ्टवेअर स्टार्ट-अप स्थापन करण्यापासून ते जगातील १० टॉपच्या क्लाऊड कंपन्यांचा सीइओ बनून नॅसडॅकमध्ये एवढी धडक मारण्यापर्यंतचा एरीक युआनचा हा प्रवास अद्भूत आहे.

 

 

एरिक युआनसारखे अनेक चीनी अभियंते या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आहेत. परंतु एक एरीक सोडल्यास कोणताच चीनी अभियंता या पदाला पोचलेला दिसत नाही.

सॉफ्टवेअरच्या आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीच्या सीईओपदी चीनी अभियंता दिसत नाही. याच युआनला सिलिकॉन व्हॅलीत जाण्यासाठी त्याचा व्हिसा आठ वेळा नाकारण्यात आला होता.

युआन एरिकच्या या झूम अॅप कंपनीत २०१५ मध्ये लि का शिंग याने ३० मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास २२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

२०१९ पर्यंत या गुंतवणुकीतून काहीही फायदा झाला नाही. परंतु लि का शिंग हा चतुर व्यावसायिक होता. मागील सहा महिन्याच्या काळात त्याच्या या गुंतवणुकीने कमाल दाखवली आहे.

 

china daily

 

आज त्याची ती गुंतवणुक शंभर पटीहून अधिक वाढून त्याची किंमत २२.७ हजार कोटींपर्यंत पोचली आहे.

सध्याच्या लॉकडाऊन काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यासाठी सगळीकडे याच अॅपचा वापर लोक करत आहेत. याच्या सहाय्याने व्हिडिओ कॉलवर मिटिंग होऊ शकतात.

ही सुविधा व्हाटसऍप देखील देत होतं. परंतु व्हाट्सपवर एका वेळी फक्त चारच लोक मिटींग करू शकतात. मात्र झूम ऍपद्वारे एका वेळी कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त १०० लोक देखील मिटींग करू शकतात.

त्यामुळे सध्याच्या घरी बसून काम करण्याच्या या काळात जगभरातले अधिकाधिक लोक या अॅपचा वापर करत आहेत.

सिंगापूरचा सुपरमॅन – लि का शिंग –

या कंपनीत पहिल्यांदा गुंतवणूक करणारा लि का शिंग हा हाँगकाँगचा सर्वात श्रीमंत माणूस आहे. त्याला तिथे ‘सुपरमॅन’ म्हटले जाते, ते त्यांनी कमावलेल्या संपत्तीमुळे नव्हे, तर बिझनेसमध्ये असलेल्या त्यांच्या दुरदृष्टीमुळे.

जेमतेम शाळा शिकलेल्या लि का शिंग यांचा प्रमुख व्यवसाय बांधकाम क्षेत्रात आहे. याच व्यवसायात ते सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले. फोर्ब्सच्या माहितीनुसार आज ते १.९ लाख कोटीच्या संपत्तीचे मालक आहेत.

 

 

२०१५ मध्ये एरिक युआनच्या झूम ऍपमध्ये जेव्हा शिंग यांनी गुंतवणूक केली तेव्हा ही गुंतवणूक म्हणजे ‘घाटे का सौदा’ समजली जात होती. पाच वर्षे त्यांची ही गुंतवणूक तशीच पडूनही राहिली.

मात्र २०१९ नंतर या अॅपला जगभरातून प्रचंड मागणी आली आहे.

या अॅपवर केवळ बिझनेस मिटींग्सच होतात असे नाही, तर दूरवरचे असलेले नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधू शकतात. शाळा-कॉलेज बंद असल्याने अनेक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना याच अॅपद्वारे घरबसल्या शिकवू शकत आहेत.

एवढेच नव्हे, तर या अॅपच्या सहाय्याने लग्नही झाल्याची बातमी होती. सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी या लग्नाला या झूम अॅपच्या माध्यमातूनच हजर राहिले होते.

एरीक युआनसारखा तंत्रज्ञानात मास्टर असलेला एरिक युआन आणि हाडाचा व्यावसायिक लि का शिंग या दोघांनाही आपण जे करत आहोत यावर पूर्ण विश्वास होता.

त्यांना त्या काळात नाऊमेद करणाऱ्या लोकांच्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून एरिक याने आपल्या या अॅपच्या लॉन्चिंगचा धोका पत्करला. त्यात लि का शिंग यांनी मोठी गुंतवणूक केली.

दोघांचीही ही कंपनी पाच वर्षे सुस्त होती. मात्र या लॉकडाऊनच्या काळात या अॅपने आपली कमाल दाखवली. आणि या दोघांची दूरदृष्टी आज त्यांना जगातील श्रीमंतांपैकी एक बनवून गेली.

 

merion west

 

झूम अॅप हे भविष्य काळाला नजरेसमोर ठेवून बनवले गेले होते. कुणाला माहीत होते तेव्हा की असाही काळ येईल, आणि लोक आपापली कार्यालये बंद करून घरी बसतील. आणि त्यांना अशा एका अॅपची गरज भासेल?

आज लि का शिंग हा सुपरमॅन बिझनेसमन म्हणून त्याच्या या किताबाला पूर्णपणे न्याय देणारा व्यावसायिक ठरला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version