' लॉकडाऊन काळात व्हायरल झालेली ‘डॅल्गोना कॉफी’ नेमकी आली कुठून?? – InMarathi

लॉकडाऊन काळात व्हायरल झालेली ‘डॅल्गोना कॉफी’ नेमकी आली कुठून??

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

सध्या सर्वत्र भयावह वातावरण आहे. कारण आहे अर्थातच कोरोना व्हायरस! इतक्या झपाट्याने तो पसरला आणि लाखोंच्या वर माणसांचे त्याने बळी घेतले!

आणि हे इतक्या वेगाने घडले की काही समजायच्या आत लोकं मृत्युमुखी पडू लागली. बरं, ह्यावर काही इलाजही नाही किंवा लसही उपलब्ध नाही, त्यात हा संसर्गजन्य रोग, झपाट्याने पसरला सगळीकडे!

लोकांचे हाल झाले अगदी, जवळच्या माणसांनीही पाठ फिरवली अर्थातच त्यांचाही नाइलाज होता ह्याला!

ह्या व्हायरसने श्रीमंत, गरीब, लहान, मोठे काही काही बघितलं नाही, सगळ्यांना गिळंकृत केले. मग सरकारने भराभर निर्णय घेऊन टोटल लॉकडाऊन जाहिर केला.

 

corona risk featured
99.1 FM CKXS

 

बाहेरच्या देशातून येणार्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. सगळ्यांची नीट तपासणी होऊ लागली. स्वच्छतेचे महत्त्व सगळ्यांना पटायला लागले.

लोकं सोशल डिस्टंस ठेवणे गरजेचे मानु लागले. टि.व्ही. रेडिओ, सोशल मिडिया सर्वत्र ह्यासंदर्भात माहिती आणि उपाययोजना सांगित्ल्या जात आहेत. काळजी घ्यायला सांगण्यात येत आहे!

अचानक आलेल्या संकटाने सगळेजण गडबडून गेले, गोंधळून गेले. कारण ह्यापूर्वी इतके दिवस टोटल लॉकडाऊन कधीच जाहिर झाला नव्हता.

इतकं भयानक संकट अचानक आलं त्यामुळे ह्याचा खूप मोठा मानसिक धक्का बसला सगळ्यांना! आणि तो धक्का बसण साहजिकच आहे. रेल्वे, विमानं, खाजगी सरकारी वाहने बंद!

 

janata curfew inmarathi
the statesman

 

शाळा, कॉलेजेस् बंद, सगळं ठप्पं. अहो! एव्हढंच काय कधी नव्हे तो खाजगी कंपन्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. बरेच जणं वर्क फ्रॉम होम करत आहेत!

पण, माणूस हा असा प्राणी आहे की जरी संकटात सापडला, गोंधळला, गडबडला तरीही ते काही काळापुरतंच असतं.

काही वेळा सावरायला वेळ लागतो त्याला पण काही वेळा पटकन सावरतो तो संकटातून! आणि हे वेळोवेळी दिसून आलंय! कितीही मोठं मानवनिर्मित संकट असू दे की नैसर्गिक संकट असू दे!

मानव प्रत्यक वेळी त्यातून सावरला आणि काही ना काही मार्ग काढला.

२६ जुलै चा महाप्रलय असू दे, त्सुनामी चा भयंकर दणका असू दे, लातूर, किल्लारी चा भूकंप असू दे किंवा कोणत्याही भागात काहीही संकट येऊ दे माणूस त्यातून सावरला!

नुसता सावरलाच नाही तर त्याने स्वतःला मजबूत बनवून संकटातील इतरांना देखील मदतीचा हात दिला आणि त्यांना देखील सावरलं!

 

26 july flood inmarathi

 

आता हे होम क्वारंटाइन किंवा टोटल लॉकडाऊनच उदाहरण घेऊया ना! अगदी ५वी, ६वी मध्ये (किंवा आधीपासूनच) असल्यापासून आपण शिकतो की, मनुष्य हा समाजप्रिय, समाजशील प्राणी आहे.

मनुष्य शक्यतो एकटा राहू शकत नाही. एकत्र येण्यासाठी काही ना काही कारण शोधत असतो मनुष्य!

मग ते कारण सार्वजनिक किंवा खाजगी उत्सव असते, तर कधी ते कारण लग्न, बारसं, मुंज, साखरपुडा, वाढदिवस असे काही असते.

पण ह्या होम क्वारंटाइन मुळे २४ तास घरातच रहायच कोणालाच भेटायचं नाही, ४ किंवा ५ माणसांपेक्षा कोणीही एकत्र यायचं नाही! आणि बाहेर त्या व्ह्यायरसने घातलेला धुमाकुळ!

त्यातही मानवाने आपला विरंगुळा शोधला. तो म्हणजे सोशल मिडिया! ह्या सोशल मिडिया वर निरनिराळी “चॅलेंजेस्” घ्यायची आणि द्यायची देखील! जसे स्त्रियांनी मध्यंतरी ‘साडी चॅलेंज’ घेतले होते. असो!

 

social media inmarathi
jagran.com

 

आजचा विषय वेगळा आहे ना आपला! ह्या कोरोनाने स्वच्छता, प्रदुषण पातळी कमी करणे, स्वतः मधले छुपे गुण बाहेर काढणे असे काही २, ३ उपकार केलेत.

त्यातीलच एक उपकार म्हणजे माणसं घरचं अन्न चवीने खाऊ लागली. एव्हढेच नाही तर घरच्या घरीच निरनिराळ्या, चविष्ट पदार्थांचे प्रयोग होऊ लागले.

त्यातलाच एक प्रयोग आणि त्याचप्रमाणे सोशल मिडिया वर “हॅश टॅग” होऊ लागलेला हा प्रयोग म्हणजे ही स्पेशल कॉफी!

“#dalgonacoffee hashtag” ह्या नावाने हे चॅलेंज दिलं जातंय! जणू काही या कॉफीचं वादळच उठलंय सगळीकडे! काय आहे ही डल्गोना किंवा डल्गोना कॉफी?

 

dalgona coffee inmarathi
hauterfly

 

चला तर मग बघूया आज! काही कॉफी इतकी प्रसिद्ध झाली? काय विशेष आहे असं त्यात? ह्याची माहिती घेऊया आज आपण.

डल्गोना कॉफी करायला सोपी आहे. चारच इन्ग्रिडियन्स आहेत, चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील असते.

इन्स्टंट कॉफी, थोडंस गरम पाणी, साखर, दूध आणि बर्फ! बस इतकंच! जास्त इन्ग्रिडियन्स नाही आणि घरी तर हे सगळे पदार्थच असतातच आपल्या!

आता जरा ह्याचा इतिहास बघूया आधी! ही कॉफी भारतीय “फेंटी हुई कॉफी” (म्हणजेच फेटलेली इंन्स्टंट कॉफी) वरच आधारित आहे! 

ह्या डल्गोना कॉफीला सोशल मिडिया वर प्रसिद्ध केले ते जंग-इल-वू ह्या दक्षिण कोरियाच्या अभिनेत्याने!

 

jung e vu inmarathi
YouTube

 

तो एके ठिकाणी भोजनासाठी गेला असता त्याला हे पेय दिले ज्यामुळे त्याला कोरियन हनीकोम्ब (मधाचे पोळे) टॉफी ची आठवण आली जिचे नाव आहे ‘डल्गोना’!

आणि नंतर त्याने ही कॉफी एका कोरियन टि.व्ही. वरच्या ‘टॉप रेसिपी ऍट फन्स्टॉरंट’ ह्या कार्यक्रमात सादर केली. ज्यामुळे ही कॉफी खूपच प्रसिद्ध झाली आणि लोकांनी पसंत पण केली.

आपण जी कॉफी करतो ती कॉफी पावडर साखर एकत्र करून मग गरम दूध घालतो किंवा गार दूध आणि बर्फ घालून कोल्ड कॉफी करतो.

पणा ही डल्गोना कॉफी जरा वेगळ्या पद्धतीने केली जाते. थोडंस कोमट पाणी, साखर आणि कॉफी पावडर (इंस्टंट कॉफी) एका भांड्यात साधारण १५ ते २० मिनिटे (हे मिश्रण फेसाळ होईपर्यंत) फेटून घ्यावे.

एका पेल्यात थंड दूध आणि बर्फाचे तुकडे एकत्र करावेत आणि त्यावर हे पाणी, साखर आणि कॉफीचे फेटलेले मिश्रण घालावे.

 

dalgona making
rojak daily

 

खूप वेळ फेटल्याने हे मिश्रण फेसाळ होते आणि वजनाने हलके होते त्यामुळे पेल्यात खाली पांढरे शुभ्र दूध आणि वर हे फेसाळ, थोडेसे चॉकोलेटी हलका सोनेरी रंग असणारे कॉफीचे मिश्रण!

अहाहा! चवीला तर खूप भारी लागते शिवाय दिसायलाही भारी!

ह्या क्वारंटाइन मध्ये आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी, जीभेचे चोचले पुरवणारी, डोळ्यांना सुखावणारी ही डल्गोना कॉफी नक्की करून बघणार ना? चला तर मग लगेच करायला जाऊया आणि घरातल्या सगळ्यांना खुश करूया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?