Site icon InMarathi

घरातल्या या गोष्टी वापरुन तुम्ही आणू शकता तुमच्या त्वचेला “नॅचरल ग्लो”!!

face mask inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. सरकारी वाहने, खाजगी वाहने, रेल्वे, विमान ह्या सगळ्या दळणवळणाच्या सुविधा बंद करण्यात आहेत.

काहींना घरूनच काम करण्यात सांगितले आहे. सोशल डिस्टन्स पाळायचा, घरातून बाहेर पडायचं नाही, गर्दी करायची नाही, ४-५ माणसांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचे नाही ह्या नियमानुसार जिम पण बंद आहे.

महिलांसाठी चिंतेचा विषय म्हणजे सर्व ब्युटी पार्लर किंवा ब्युटी सलोन पण बंद!

आज-कालच्या महिला आपल्या सौंदर्याविषयी, त्वचेच्या आरोग्याविषयी खूपच जागरूक असतात. आपण चांगले दिसावे किंवा आपली त्वचा निरोगी असावी, कांतिमान असावी असे सगळ्याच महिलांना वाटते!

 

 

नोकरी किंवा जॉब करणाऱ्या महिलांना (खरं तर गृहिणींना देखील) प्रेझेंटेबल असावे लागते, त्यासाठी ब्युटी पार्लर किंवा ब्युटी सलोन हा एक उत्तम पर्याय आहे.

पण सध्या ते देखील बंद आहेत आणि उन्हाळा देखील आहे. त्यामुळे घाम येतो आणि उष्णतेने त्वचा देखील काळवंडते (skin tan). मुरमं, सुरकुत्या, काळे डाग इत्यादींसाठी देखील आताशा नवनवीन ट्रीटमेंट उपलब्ध आहेत सलोन मध्ये वगैरे.

पण, काय करणार? सगळंच बंद!

मग अशा वेळी काय करायचं? आता तर महिलादेखील Work From Home करत आहेत, घराबाहेर पडत नाहीयेत. त्यांना आता स्वतः साठी बराच वेळ देता येणार आहे.

चला तर मग हा वेळ सत्कारणी लावूया, स्वयंपाकघरातील कौशल्य दाखवून झाल्यानंतर स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ वापरून आपण आज असे काही फेस मास्क बघूयात ज्यामुळे तुमचा चेहरा घरच्या घरी उजळेल. 

 

 

ह्याने २ गोष्टी होतील १ म्हणजे तुमचा वेळ सत्कारणी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये होणारं काम घरीच होऊन चेहेराही टवटवीत दिसेल. चला तर मग पाहूयात घरच्या घरी तयार होणारे, चेहेरा उजळवणारे “फेस मास्क”!

१) मुरुमांसाठी मास्क –

अंड्याचा पांढरा बलक पिवळ्या बलकापासून वेगळा करा. ह्या पांढऱ्या बलकात कापसाचे पॅडस् बुडवून ते चेहऱ्यावर लावा.

 

infovirales.com.ar

 

हा पांढरा बलक चेहऱ्यावरची मुरुमं, पुटकुळ्या कमी करण्यास मदत करतो. १० ते १५ मिनिटं चेहऱ्यावर ठेवून नंतर चेहेरा स्वच्छ धुवावा.

२) हळद आणि मध –

हळद आणि मध दोन्हीही पदार्थ आपल्या त्वचेला तजेला देण्यास मदत करतात. मध तर आपल्या त्वचेसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. अर्थातच हळद देखील उत्तम आहेच.

हळद केवळ चेहराच उजळवत नाही तर त्याच्यातील औषधी गुणधर्म त्वचेला हानीकारक जंतुंचा (मुरुमं, पुटकुळ्या किंवा इतर स्किन इन्फेक्शानसाठी कारणीभूत जंतुंचा) नाश करतात.

 

darklipstips.com

 

त्यामुळे दोन्ही पदार्थ वापरून तयार केलेला मास्क आपल्या त्वचेसाठी सर्वगुणाकारी असतो.

१/२ चमचा हळद आणि १ ते २ चमचे मध हे प्रमाण घेऊन हा मास्क सधारण अर्धा तास लावावा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करावा. आठवड्यातून दोनवेळा आपणा हा मास्क लावू शकतो.

हायपर पिग्मेंटेशन साठी हा मास्क उत्तम आहे, ज्याची ट्रीटमेंट खूप महाग असते. घरच्या घरी हा स्वस्त आणि योग्य असा मास्क वेळा सत्कारणी लावणारा आणि पैशाची बचत करणारा आहे.

 

३) संत्रे आणि दही –

संत्र्याचा रस आणि दही ह्यांचा मास्क आपल्या त्वचेला कांतिमान करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.

 

stylecraze

 

१ चमचा संत्र्याचा रस आणि २ चमचे दही हे प्रमाण घेऊन मास्क तयार करावा आणि हलक्या हाताने ह्याचा १० ते १५ मिनिटे मसाज करून नंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

 

४) पपई, केळी आणि काकडी –

ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी हा फेस मास्क अत्यंत उपयुक्त आहे. एक चतुर्थांश पपई, एक चतुर्थांश काकडी आणि अर्धे केळे मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.

 

femina.in

 

हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर २०-२५ मिनिटे ठेवावे आणि नंतर  पाण्याने चेहरा धुवावा.

ह्यामुळे त्वचेचा तेलकटपणा जाऊन ती तजेलदार होते.

 

५) बुजलेल्या छिद्रांसाठी मास्क (Clogged pores mask) –

ओटस् आणि बेकिंग सोडा हे दोन्ही पदार्थ त्वचेच्या मृत पेशी दूर करते आणि बुजलेल्या छिद्रांना दुरुस्त करते.

२ टी स्पून ओटस् आणि १ टी स्पून बेकिंग सोडा ह्या प्रमाणात एका भांड्यात हे एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी मिसळावे. जास्त घट्टही करू नये आणि जास्त सैलसर पण करू नये.

 

 

हे मिश्रण चेहऱ्याला साधारण पणे १५ ते २० मिनिटे ठेवा आणि नंतर चेहेरा स्वच्छ धुवून मॉइश्चराझर लावा. ह्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

 

६) केळ आणि लिंबाचा रस –

केळ्यामुळे त्वजेला नुसताच उजाळाच मिळत नाही तर त्वचा जर Dull झाली असेल तर ती एकदम फ्रेश होते आणि लिंबाच्या रसामुळे मुरमं कमी होण्यास आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ होण्यास मदत होते. यामध्ये ऑलिव्ह तेल पण टाकावे.

 

shutterstock

 

१ केळे आणि ९ ते १० थेंब लिंबाचा रस एकत्र करून त्याचा मास्क चेहऱ्यावर लावावा. साधारण १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा आणि नंतर मॉइश्चराझर लावावे.

 

७) काकडी आणि कोरफड जेल –

उन्हाळ्यात काही जणांची त्वचा खूपच टॅन होते. चेहऱ्याची जळजळ होणे, खाज सुटणे, दाह होणे ह्यांसारखे त्रास उद्भवतात. ह्यासाठी खास हा मास्क आहे.

 

sio beauty

 

काकडी आणि कोरफड दोन्हीमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेचा ओलावा टिकून राहतो.

अर्धी काकडी आणि २ चमचे कोरफड जेल व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर हलकेच मालिश करून लावावे आणि साधारण २०-२५ मिनिटे ठेवावे आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

 

८) पपई आणि टमाटा –

कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी हा मास्क अत्यंत उपयुक्त आहे.

 

ndtvimg.com

 

८ ते १० पपईचे चौकोनी तुकडे आणि टमाट्याचा रस आणि गर एकत्र करून त्याचा मास्क साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवावा.

 

९) कलिंगड आणि दही –

त्वचेला गारवा मिळावा तसेच त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हा खास मास्क आहे.

 

taste

 

कलिंगड आणि दही वापरून केलेल्या या मास्कमुळे त्वचेचे उष्णतेपासून तर रक्षण होतेच शिवाय त्वचा उजळून देखील निघते.

 

१०) कोरफड आणि लिंबाचा रस –

कोरफड आपल्या त्वचेला कांतियुक्त बनवते त्याचप्रमाणे त्वचेची छिद्रे स्वच्छ करते, लिंबाचा रस त्वचेला तजेलदार बनवते आणि घामाचा दुर्गंध दूर करते.

१ चमचा कोरफड जेल आणि २ चमचे लिंबाचा रस ह्या प्रमाणात मास्क बनवून चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी धुवून टाका.

 

 

वरील मास्क हे आपल्या त्वचेला कांति तर देतातच ह्यशिवाय अनेक फायदे देतात, जसे घामाचा दुर्गंध येऊ देत नाहीत, त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात.

शिवाय ह्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात सहजरित्या मिळू शकतात, चला तर मग! ह्या लॉकडाऊनचा पुरेपुर फायदा उठवून आपली त्वचा तजेलदार बनवूया!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version