Site icon InMarathi

कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी या डॉक्टरने जे केलंय ते सर्व “कोरोनायोद्धयांची” परिस्थिती दर्शवतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोनाच्या संकटाने सगळ्यांनाचं घेरलेलं आहे. सामान्य लोकही आता लॉक डाऊनला सरावले असून, बरेच जण नियमांचं पालन करीत आहेत.

ज्यामध्ये विनाकारण घराच्या बाहेर न जाणे, हॅण्डवॉशने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी गोष्टी करत आहेत. बाहेर गेल्यावर तोंडावर मास्क घालणे, सोशल डिसन्सिंग सांभाळणे इत्यादी काळजी सगळी लोक घेताना दिसत आहेत.

पण आपण कधी विचार केला आहे का, की आपल्याच बरोबर राहणारे काहीजण रोजच या कोरूना नावाच्या आजाराशी लढाई लढत आहेत. रोज त्यांना घराबाहेर पडताना मनात कायम एक भीती, एक शंका राहत असते.

परंतु केवळ कर्तव्य भावनेपोटी ही लोकं आपलं काम करत राहतात.

 

CNBC.com

 

ते म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, सगळा पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा देणारी लोकं हे सगळे मात्र रोजच आपल्या घरातून बाहेर जाऊन आपली काम करतात.

आपण महाराष्ट्रात पाहिलंच आहे की मुंबईच्या जसलोक, वोखहार्ट रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आज इंदोर मधील एका डॉक्टरांचा तर त्यामुळे मृत्यू झालेला आहे.

आपण रोजच्या बातम्या पाहतो, वाचतो, ऐकतो. मग विचार केल्यावर लक्षात येतं की, ही माणसं घरातून बाहेर जाताना या लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनामध्ये किती प्रकारची आंदोलन होत असतील?

पण तरीही हे लोक आपलं कर्तव्य बजावतात..

भोपाळमध्ये देखील आरोग्य विभागाशी संबंधित अनेकजण डॉक्टर, नर्सेस यांच्याबरोबरच काही महत्वाचे अधिकारी हे कोरोनाबधितांवर उपचार करत आहेत आणि त्या रुग्णांची काळजी घेत आहेत.

 

the news

 

त्यांच्यातीलच एक डॉक्टर सचिन नायक, जे जयप्रकाश गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांची गोष्ट ऐकल्यावर आपल्याला देखील त्यांचे कौतुक करावसं वाटतं. ते हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करतात.

अगदी त्यांनी स्वतःची उपलब्धता 24 तास आहे असं सांगितलं आहे. त्यासाठी ते घरी देखील जात नाहीत.

त्यांनी त्यांची कार हॉस्पिटलच्या आवारात पार्क केली असून त्या कारलाच त्यांनी एका छोट्या खोलीचे रूप दिले आहे. तिथे त्यांनी छोटासा बेड तयार केला असून कामातून जेव्हा ते ब्रेक घेतात त्यावेळेस कारमध्ये येऊन थोडीशी विश्रांती घेतात.

याबद्दल सांगताना डॉक्टर सचिन नायक म्हणतात, की मी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असून मला कोरोनाचा संसर्ग व्हायचा धोका अधिक आहे.

 

sambad english

 

मी जर घरी जात राहिलो तर माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाला देखील तितकाच धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून मी कार मध्ये राहायचं ठरवलं आहे.

त्यांना एक ३ वर्षांचा मुलगा असून त्यांच्या मनात अनेकदा त्याला जाऊन भेटावं अशी इच्छा होत असते. मात्र तरीही “सध्या सगळ्यांच्याच जीवनाची सुरक्षितता महत्त्वाचे आहे, म्हणून मी घरी जाणं टाळतो” असं डॉक्टर म्हणतात.

हॉस्पिटलमध्ये कधीही माझी गरज लागू शकते म्हणून ते तिथेच राहतात.

त्यांनी कारमध्येच एक बेड करून घेतला आहे त्यासोबतच इस्त्रीच्या कपडे ठेवण्यासाठी एक बार लावला आहे. त्यांचे साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल इत्यादी गोष्टीदेखील कार मध्ये ठेवलेल्या आहेत.

त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा तिथे वाचण्यासाठी पुस्तकांचा एक सेट देखील कार मध्ये ठेवला आहे.

हॉस्पिटलमध्येच मिळणारं जेवण ते घेत असतात.

 

 

covid-19 पासून वाचण्यासाठी आणि कुटुंबाला सांभाळण्यासाठी डॉक्टरांच्या या कृतीचं कौतुक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून ही झालं आहे.

त्यांचं कौतुक करणारे ट्विट शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरवर केलं आहे.

“covid-19 शी लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याचं मध्यप्रदेश सरकार अभिनंदन करत. हाच संकल्प आपण प्रत्येकाने केला तर हे युद्ध आपण लवकरच जिंकू, सचिनजी तुमच्या या कृतीचं अभिनंदन आणि तुम्हाला सलाम.”

अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा अनेकांनी डॉक्टर सचिन नायक यांचं कौतुक केलं. तर काही जणांनी डॉक्टर सचिन नायक हे कारमध्ये का राहत आहेत? त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने का केली नाही? असे प्रश्न उपस्थित करत आहेत.

काहींच्या म्हणण्यानुसार, पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विश्रांती मिळणे गरजेचे आहे, कारण त्यांची तब्येत चांगली राहिली तरच ते रुग्णांवर उपचार करू शकतील.

काही राज्यांमध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी आणि नर्सेससाठी काही हॉटेल्स, अपार्टमेंट यांच्यामध्ये राहण्याची सोय केली आहे. भारतात सध्या ५७०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून १६६ मृत्यू झालेले आहेत.

 

business insider

 

भारताच्या अनेक शहरांमध्ये आता कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तसंच त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी आपले डॉक्टर्स आणि नर्सेस देखील तयार आहेत.

असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये बेळगावातील एका नर्सची छोटी तीन वर्षांची मुलगी आपल्या आईला, फक्त बघायला वडिलांबरोबर टुव्हीलर वर येते.

पण ती आईकडे जाऊ शकत नाही किंवा आई तिच्याकडे येऊ शकत नाही. ही छोटी मुलगी आईला हाका मारून रडतेय आणि आईच्या डोळ्यात देखील अश्रू आहेत.

अत्यंत जड अंतकरणाने ती माऊली आपल्या नवऱ्याला तिला इथून घेऊन जा असं फक्त खुणेनेच सांगते.

 

news 18 lokmat

 

भोपाळमधील डॉक्टर सुधीर डेहरिया यांची गोष्ट देखील वेगळी नाही. ते देखील आपल्या घरी जात नाहीत. अगदीच आठवण आली तर घरी जाऊन घरच्यांना बाहेर यायला सांगतात तिथूनच त्यांच्याशी बोलतात आणि हॉस्पिटलमध्ये परत जातात.

याचं कारण एकच, आपल्या मुळे आपल्या घरच्यांना कोरोनाचा धोका निर्माण व्हायला नको, पण त्यासाठी आपण आपलं कर्तव्य करणं थांबायचं नाही.

भारतातल्या अशा अनेक माहित नसलेल्या डॉक्टरांच्या नर्सेसच्या आणि इतर लोकांच्या धडासामुळे आणि त्यांच्या सेवाभावामुळे खरंतर आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत.

त्यांच्या वरचा ताण जर आणखीन वाढवायचा नसेल तर आपण देखील आपली सुरक्षा नीट ठेवली पाहिजे. विनाकारण बाहेर जाणं टाळलं पाहिजे.

भारतीय आरोग्य संस्थेने सांगितलेल्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. कारण हेच खरे समाजातले हिरो आहेत आणि त्यांना जपून ठेवणे आपलं कर्तव्य आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version