' सौंदर्य आणि फिटनेस यांचा उत्तम मेळ साधणारा हा पदार्थ दररोज खाल्लाच पाहिजे – InMarathi

सौंदर्य आणि फिटनेस यांचा उत्तम मेळ साधणारा हा पदार्थ दररोज खाल्लाच पाहिजे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सुका मेवा म्हणलं की बदाम, काजु, मनुके, अक्रोड हे लगेच डोळ्यासमोर येतात.

बदाम कुशाग्र बुद्धीसाठी आणि स्मरणशक्तीसाठी खातात. असे प्रत्येकाचे काही ना काही फायदे आहेतच. पण चवीला आवडणारा सुका मेवा म्हणजे काजु.

योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास वर्षानुवर्षे टिकणारा. घरात शिऱ्यापासून बासुंदीपर्यंत जेवणाला चव आणणारा काजु लहानांमध्ये विशेष प्रिय आहे.

समुद्रतटांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या काजुचं फळ दिसायला अगदी पेरूसारखं दिसतं. आणि त्याखाली त्याला आलेलं कोंब म्हणजे आपण खातो ते काजु.

भारतात  आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि ओडिसा ह्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काजुचं उत्पादन घेतलं जातं.

 

Cashew_apples marathipizza

 

महाराष्ट्रातही कोकणात काजुचं उत्पादन घेतलं जातं. रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग ह्या गावांमध्ये काजू विकले जातात.

डॉक्टर लहानांपासून मोठ्यांना काजू खाण्याचे सांगतात. याचा अर्थ काय तर काजू आरोग्यवर्धक आहे.

पण फक्त एवढंच जाणून घेणं पुरेसं आहे का? काजूचं सेवन हृदयापासून केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

ह्या काजूचे आरोग्यकारक पण नेमके काय फायदे आहेत हे आपण बघुया..

हे ही वाचा :

===

 

हृदयविकारांवर फायदेशीर

 

Plane-heart-attack-inmarathi01.jpg
clevelandclinic.org

 

आक्रोड, पिस्ता, बदाम आणि काजूसारख्या मेव्यांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जेणेकरून हृदयविकाराचं प्रमाण कमी होतं.

काजू आहारात समाविष्ट केल्यामुळे हृदयातून कोलेस्ट्रॉल यकृताकडे नेणाऱ्या घटकाची क्षमता वाढते आणि जास्तीत जास्त कोलेस्ट्रॉल यकृताकडे नेला जातो जिथे कोलेस्ट्रॉलचं व्यवस्थापन करतात.

हृदयविकाराचा धोका कमी होतो म्हणून डॉक्टर काजुचं सेवन करायला सांगतात.

अभ्यासानंतर असं लक्षात आलं की काजूच्या प्रमाणात सेवनामुळे हृदयविकार आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. पर्यायाने काजूंमध्ये असलेल्या प्रोटिन्स व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स हृदयाचं रक्षण करतात.

त्वचेचं आरोग्य जपतं

 

skin-marathipizza

 

 

काजूच्या बियांपासून बनवलेल्या तेलाने त्वचा टवटवीत होते.

ह्या तेलात सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम आणि लोहाचं प्रमाण मुबलक असतं. सोबतच पॉली केमिकल्स आणि अँटी-ऑक्सिडंट त्वचेला तजेला आणतात.

त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी काजूच्या बियांचं तेल वापरायला सुरु करा.

रक्तदोषांपासून रक्षण

 

needle-blood marathipizza

 

नियमित आणि प्रमाणातल्या काजुच्या आहारात समावेश असल्याने रक्तदोष होत नाही.

काजूंमध्ये शरीराला आवश्यक अश्या तांबं ह्या घटकाचं प्रमाण मुबलक असतं. हे तांबं शरीरातुन सर्व अशुद्ध गोष्टी बाहेर फेकण्याचं काम करतं.

जर तांब्याच्या शरीरातल्या प्रमाणात घट झाली तर त्याचा परिणाम लोहावर होतो. अश्या वेळी ऍनिमिया चा धोका निर्माण होतो.

तांब्याचं रक्तातील प्रमाण नेहमी पुरेसं असावं आणि त्यासाठी काजु नक्कीच सोपा मार्ग आहेत.

केस घनदाट आणि मजबूत ठेवतं

 

healthy-hair-marathipizza

 

 

काजु खाल्याने आणि काजुच्या बियांच्या तेल लावल्याने केस मजबुत होतात.

काजुंमधल्या तांब्यामुळे केसांखालची त्वचा – स्कॅल्प आणि केसांची मुले मजबूत होतात. केसांची वाढ लवकर होते. लिनोलिक आणि ओलिक आम्लांमुळे केसांचा रंग आणि सिल्की टेक्श्चर छान होतं.

हे ही वाचा :

===

 

दृष्टिदोष लांब ठेवतं

 

eyes-tired marathipizza

 

आजकालच्या प्रदूषणामुळे डोळ्यांची आग आग होणे, खाज सुटणे सोबतच दृष्टी मंदावणे सारखे त्रास होतात.

काजुमध्ये Zea Xanthin नावाचं एक अँटी-ऑक्सिडंट असतं. आपल्या डोळ्याचा रेटिना हे अँटी-ऑक्सिडंट शोषून घेतं.

ह्याने एक पापुद्रा तयार होतो जो संरक्षण कवचासारखं काम करतो आणि डोळ्यांना UV रेज पासून वाचवण्यात मदत करतो.

वजन घटवण्यात मदत

 

loss weight marathipizza

 

वरील सर्व उपयुक्त अश्या परिणामांसोबतंच काजु शरीरातील अतिरिक्त वजन घडवण्यात सुद्धा मदत करतात.

काजु शरीराचा BMI इंडेक्स नियंत्रणात ठेवतात. तसेच काजूच्या नियंत्रित आहारात समावेश केल्याने वजन वाढण्याचं प्रमाण खूप कमी होतं.

काजुमध्ये असलेल्या ओमेगा ३ घटकामुळे शरीराच्या हालचालीला प्रोत्साहन मिळून जास्त असलेली चरबी जाळण्यास मदत होते.

अनेक आहारतज्ञांच्या मते ज्यांना वजन घटवण्यावर काम करायचं आहे त्यांनी आहारात काजूचा समावेश नक्की करावा.

पोषक द्रव्यांनी भरपूर असल्यामुळे काजुमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहते.

हे सर्व फायदे वाचून तुम्ही काजू खायला कधी सुरुवात करताय?

Source

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?