Site icon InMarathi

कोरोनापासून स्वतःचं रक्षण करायचंय असेल तर औषधांपेक्षा ‘हे’ घटक आहारात नक्कीच ट्राय कराच

girl eating apple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फेब्रुवारी-मार्च मध्ये संपूर्ण जगाला धक्का देणारी, लोकांना मृत्युलोकी नेणारी घटना घडली आणि अजूनही लोकं त्याला बळी पडतायत आणि ती घटना म्हणजे कोविद-१९ किंवा कोरोना व्हायरसचा अतिशय जलद गतीने झालेला संसर्ग.

सगळीकडे एकच हाहाकार उडाला. कारण कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आत जवळ जवळ १८० देशांमध्ये ह्या व्हायरस पसरला, लाखो लोकांना ह्याची लागण झाली आणि परिणामतः हजारोंच्या संख्येने लोकं मृत्युमुखी पडू लागली.

एक तर ह्या रोगाची लक्षणं लवकर दिसून येत नाहीत, जेव्हा दिसून येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि अजूनही ह्यावर रामबाण इलाज, योग्य ती औषधं, लसी उपलब्ध नाहीत, त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे.

 

the daily signal

 

फक्त रोगाचं निदान होतं तेही जवळ जवळ १४-१५ दिवसांनी! मग आयसोलेशन, सोशल डिस्टन्स किंवा कुटुंबातही कोणासोबत न राहणे ह्या मनस्ताप देणाऱ्या आणि अत्यंत त्रासदायक गोष्टींना सामोरे जावे लागते.

त्यातही हा आजार बरा होण्याची लक्षणे नाहीतच किंवा १०% खात्री! सगळंच भयावह आणि काळजाचा थरकाप उडवणारं!

ह्या कोरोना विषाणूने गरीब किंवा श्रीमंत, लहान किंवा मोठा असा कोणताच भेदभाव केला नाही. प्रगत किंवा स्वतःला बलाढ्य म्हणवून घेणारे देश ह्या व्हायरसपुढे हतबल झाले.

दुसऱ्या टप्प्यात थांबावयला हवे होते ह्याला असे म्हणून मोठ्या देशाचे पंतप्रधान अक्षरशः रडले. प्रगत, विकसनशील, अप्रगत कोणत्याच देशाला अद्याप ह्यावरचे इलाज मिळाले नाहीत आणि सर्व देश हतबल झाले ह्या कोरोना व्हायरसपुढे.

 

 

ह्यावर प्रत्येक देशाने आपापल्या परीने उपाय करायला सुरुवत केली. भारतात संपूर्ण लॉकडाऊन जाहिर झाले. टी.व्ही, रेडिओ, सोशल मिडिया ह्यांच्या द्वारे समाजिक अंतर ठेवा, योग्य स्वच्छता राखा अशा सूचना देण्यात येत आहेत.

थोडक्यात काय तर, जोपर्यंत लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत ह्या व्हायरसचा संसर्ग रोखायचा, ह्याची साखळी तोडायची हाच एकमेव मार्ग आहे.

त्यासाठी आपापल्या घरात थांबायचे, सरकारच्या सूचनांचे पालन करायचे आणि स्वच्छता ठेवायची, सतत हात धुवायचे, गरम पाणी प्यायचे अशा सूचनांचे पालन करणे हेच सध्या करणे जरूरीचे आहे.

आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा ह्या व्हायरसवर काय परिणाम होतो ह्याचे संशोधन करताना संशोधकांना असे आढळून आले आहे की आहारात ह्या गोष्टींचा समावेश असेल तर आपली प्रतिकार शक्ती वाढते.

 

 

प्रतिकार शक्ती आपल्याला विषाणूंच्या हल्ल्यापासून वाचवते, आपला बचाव करते, अगदी कोरोना व्हायरस पासूनही आपला बचाव होतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

आज आपण ह्या लेखात हेच बघूया की आपल्या आहारात अशा कोणत्या घटकाचा समावेश हवा ज्यामुळे आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकतो.

आहार घटकांबाबत बरेच संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा निर्वाळा दिला आहे की आपल्या आहारात “व्हिटॅमिन सी” युक्त पदार्थांचे सेवन केले तर आपली प्रतिकार शक्ती वाढते.

व्हिटॅमिन सी हे एक सशक्त ऍंटिऑक्सिडंट आहे. आपल्या शरीरात अशी काही संयुगे आहेत जी अस्थिर असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, ती क्षीण किंवा कमी होते.

 

 

ह्या संयुगांना स्थिर करण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. सर्दी, स्वाइन फ्ल्यु ह्यांसारख्या आजारांना व्हिटॅमिन सी उत्तम पर्याय आहे. सर्दी कमी होणे, थंडी वाजणे कमी होणे ह्यांसारखे बदल व्हिटॅमिन सी मुळे होतात हे आधीच सिद्ध झाले आहे.

आपल्या आहारात जर भाज्या आणि फळे ह्यांचा मुबलक प्रमाणात समावेश असेल तर आपल्याला कधीच व्हिटॅमिन सी ची कमतरता भासणार नाही. जसे संत्रे आपल्याला भरपूर विटॅमिन सी देऊ शकते.

ह्याशिवाय अनेक भाज्या आणि फळे अशा आहेत ज्यामुळे आपण व्हिटॅमिन सी मिळवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.

कशा कशात असते व्हिटॅमिन सी? चला तर मग आज पाहूया व्हिटॅमिन सी ची माहिती! कशात असतं ते? कोणत्या भाज्या आणि फळे व्हिटॅमिन सी युक्त असतात?

* पेरु –

 

organic facts

 

पेरूमध्ये उच्च प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात. ह्या दिवसांमध्ये पेरू मुबलक प्रमाणात आणि छान मिळतात.

* संत्री –

 

 

संत्री आपल्याला भरपूर व्हिटॅमिन सी देतात. संत्र्याने आपली प्रतिकारशक्ती वाढतेच शिवाय अशक्तपणाही दूर होतो. उन्हामुळे डिहायड्रेशन सारखे काही विकार असतात तेही संत्र्याच्या सेवनाने दूर होण्यास मदत होते.

* ढोबळी मिरची –

 

 

विटॅमिन सी ने युक्त असणारी ढोबळी मिरची आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आपल्या जेवणात हीचा नक्कीच समावेश करावा.

* मिरची –

 

मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे हीचा वापर भाज्यांमध्ये वगैरे जरूर करावा.

* पपई –

 

healthline

 

पपई ह्या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे प्रत्येकाने पपई जरूर खावी.

* टमाटा –

 

financialtribune.com

 

व्हिटॅमिन सी युक्त टमाट्यांचा वापर आपल्या आहारात जरूर करावा. ग्रीन सॅलड बनवल्यास कच्चा टमाटा खाण्यात येतो.

टमाट्याची भाजी, चटणी करता येते किंवा दुसऱ्या भाजीमध्ये, आमटीमध्ये सप्लिमेंटरी म्हणून घालून खाता येतो. थोडक्यात काय तर टमाट्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

* कोबी –

 

amazon.in

 

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आपल्या आहारात ह्याचा समावेश नक्की करावा. ह्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

भाजी किंवा कोशिंबिर कारून खाता येते कोबी.

* किवी फळ –

 

 

किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आहारात ह्याचा समावेश जरूर करावा. ह्याशिवाय ह्या फळामध्ये रक्तातील प्लेटलेटस् वाढतात असे तज्ञांचे मत आहे.

त्यामुळे हे फळ जरूर खावे.

* मटार –

 

ndtv food

 

मटार हे व्हिटॅमिन सी ने पूर्ण असते. त्यामुळे मटार आपल्या आहारात जरूर असावेत. अर्थातच ह्याची उसळ, पॅटिस, इतर भाज्यांमध्ये सप्लिमेंटरी म्हणून वापरता येतात.

कोणत्याही स्वरूपात ह्यांच आहारात समावेश करण्यात यावा.

ह्या वैश्विक संकटावर मात केव्हा करता येईल, ह्या व्हायरसविरूद्ध औषध, लस मिळेल तेव्हा मिळेल पण, आपण आपल्या आहारात जर वरील गोष्टींचा वापर केला तर नक्कीच ह्या संकटाला तोंड देण्यास समर्थ होऊ.

तज्ञांच्या मते, ह्या भाज्या आणि फळे व्हिटॅमिन सी युक्त आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करणारी आहेत, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला तरी आपण त्याच्यासमोर कमजोर न पडता त्याच्याविरूद्ध नक्कीच लढू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version