होम क्वारन्टाईन असताना कोरोना व्यतिरिक्त ‘हा’ गंभीर आजार देखील उदभवू शकतो!!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्याच्या कोरोनाविषाणुच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे घरात अडकलो आहोत. सर्वसाधारणपणे माणूस हा सामाजिक प्राणी आहे.
तो एखाद्या प्राण्याप्रमाणे गुहेत एकांतवासात फार काळ राहू शकत नाही.
त्यामुळे जर का त्याला दीर्घ काळासाठी घरात एकट्याने अडकून पडावं लागलं आणि त्याचा नेहमीच्या सामाजिक जीवनाशी संपर्क तुटला तर त्याचा परीणाम माणसाच्या मनावर होतो आणि पर्यायाने शरीरावर देखील होतो.
खूप दिवस घरात सगळ्यांपासून वेगळं, एकाच ठिकाणी बंदिस्त राहावं लागणाऱ्या लोकांमध्ये केबिन ताप किंवा केबिन आजार हा प्रकार दिसून येण्याची शक्यता असते.
काही तज्ज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा भ्रामिक आजार असतो. तर काहींना वाटते की हा डिसऑर्डर आणि क्लॉस्ट्रोफोबियासारख्या आजाराशी निगडीत असलेला प्रकार आहे.
तर केबिन हा ताप एकटं, सर्वांपासून तुटल्या स्थितीत राहण्याच्या भीतीतून आलेला ताप असतो.
कोरोना विषाणुच्या सध्याच्या प्रादुर्भावाच्या काळात जर तुम्हालाही अशा प्रकारे तापाचा अनुभव येत असेल, तर हा ताप तुम्हाला सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळात असलेल्या अनाठायी भीतीमुळे आलेला आहे असे समजा.
त्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवून अति काळजी करणे आणि त्या अनुषंगाने सतत भीती बाळगत राहणे या गोष्टी सोडाव्या लागतील.
अशा प्रकारच्या सिंड्रोमशी लढण्याचे मार्ग निश्चित आहेत.
केबिन तापची लक्षणे –
–
हे ही वाचा – अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…
–
खाली काही सर्वसाधारण लक्षणं दिली आहेत. मात्र सर्वांनाच ही आणि अशीच लक्षणे जाणवतील असं नाही. परंतु बऱ्याच लोकांना अशी लक्षणे जाणवतात आणि त्यात अस्वस्थता आणि चीडचीड अधिक राहते.
अस्वस्थता
सुस्ती
औदासिन्य
कशात लक्ष न लागणे
घाबरल्यासारखे होणे
खात सुटणे
निरुत्साही वाटणे
कोणाशी बोलावेसे न वाटणे
सारखी झोप येत येणे
निराशा दाटून येणे
वजन कमी जास्त होणे
तणावाच्या स्थितीचा सामना करता न येणं
चीडचीड होणे
अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा, की वरील लक्षणे ही इतर आजारांचीही असू शकतात. केवळ तज्ज्ञ मानसोपचारतज्ञच या लक्षणांतून तुम्हाला केबिन सिंड्रोम आहे की इतर आजार याचे निदान करू शकतील.
मात्र वरील लक्षणांपैकी अधिकाधिक लक्षणे जाणवत असतील तर असा आजार असण्याची शक्यता असते एवढंच.
या आजाराचा सामना कसा करावा?
हा आजार हा प्रत्यक्ष आजार नसून तो एक मानसिक आजार आहे. त्यामुळे इतर कोणत्याही मानसिक आजाराप्रमाणेच या आजारासाठीही तज्ज्ञ मानसोपचाराची गरज आहे. त्यांची मदत घ्यावी.
परंतु जर हा आजार सौम्य असेल, वरीलपैकी लक्षणे सौम्य प्रमाणात जाणवत असतील, तर तुम्ही स्वतःच काही उपाय योजून यातून सहज बाहेर पडू शकता.
बंगला असेल तर आवारात दिवसांतून एक तरी चक्कर मारा. लख्ख सूर्यप्रकाश तुम्हाला उत्साह देतो, एवढंच नव्हे, तर आपल्या शरीराचे बरेचसे नैसर्गिक चक्र सूर्यप्रकाशात सुरळीत होते.
जर घराच्या बाहेर जराही पडता येत नाही अशा स्थितीत असाल, तर खिडकी उघडी ठेवा. अधिकाधिक वेळ खिडकीशी उभे राहा. खिडकीतून बाहेरच्या जगाचे निरीक्षण करा.
खिडकीत पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. त्याने पक्षी येतील. ते पाहून तुम्हाला बरं वाटेल. जमल्यास घरात आपल्या बागेतील फुलांची, पानांची रचना करा.
फ्रेश परफ्युम्सचा शिडकावा करा. चांगली अगरबत्ती लावा. या सगळ्यानेही तुम्हाला प्रसन्न वाटेल.
योग्य आहार घ्या –
घरात बसून राहण्याने अनेकदा आहाराचे तंत्र बिघडते. एकतर सतत खाय खाय सुटून अति खाणं होतं, किंवा मग दोन तीन वेळा बनवण्याचा कंटाळा येऊन जेवणाच्या वेळा टाळणं हे दोन्ही चांगले नाही.
क्वारंटाईन स्थितीत सात्विक आणि वेळच्यावेळी योग्य आहार घ्या. साखर, तेल, जंक फूड, मसालेदार पदार्थ टाळा. जास्तीत जास्त पाणी प्या.
घरात अडकल्यावर पूर्वीची रोजची कामे नसल्याने कंटाळा येतो. एरव्ही रोज बाहेर काम करताना आव्हानांचा सामना करावा लागतो, टारगेट साध्य करावे लागते. त्यात माणसाचे मन गुंतून राहते.
मात्र आता घरी राहिल्याने तसे ध्येय नसले, तरी जमेल तितके काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यात घरातली कामेही निवडता येतील किंवा सोशल नेटवर्कींगच्या साहाय्याने काही गोल्स नक्की करता येतील.
स्वतःच स्वतःला आजमावून पाहा. क्वारंटाईन काळातही ही संधी समजून आतापर्यंत ज्या गोष्टी शिकता आल्या नव्हत्या त्या शिकण्याचा प्रयत्न करा.
मेंदूचा वापर करा –
टिव्ही हे जरी वेळ घालवण्याचे चांगले साधन असले, तरी एका पॉईन्टला तेही कंटाळवाणे होते. कारण त्यात आपल्या मेंदूला चालना देणारे काही नसते.
म्हणून सतत टिव्ही न बघता पुस्तकं वाचा, कोडी सोडवा, इतर खेळ खेळा. त्याने तुमच्या मेंदुला चालना मिळून तुम्हाला उत्साह वाटेल. एकटेपणा कमी वाटेल.
व्यायाम –
क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन काळात घरात बसून बसून वजन वाढू शकतं. जिम मध्ये तर जाता येत नाही. अशा वेळी घरीच राहून जमेल तितका व्यायाम करू शकतो.
योग, प्राणायाम यासाठी काही साधनं लागत नाहीत. ते करू शकतो. सूर्यनमस्कार घालू शकतो. यु ट्यूबवरचे व्हिडिओ पाहूनही व्यायामाचे घरच्या घरी करता येण्यासारखे बरेच प्रकार करू शकतो.
व्यायामाने आणि योगने शारिरीक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही टिकवून ठेवण्यास मदत होते.
आजच्या काळात सोशल मेडिया, मोबाईल्स, व्हाट्सप इत्यादी वरून आपण आपल्या दूरच्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी कनेक्टेड राहू शकतो. त्यांच्याशी संवाद साधा. व्हिडिओ कॉल करा.
चांगली गाणी ऐका. म्युझिकने जीवाला शांत वाटतं. जुने सिनेमे बघा. त्यात मन रमतं आणि औदासिन्य दूर होण्यास मदत होते.
ऋतुमान बदलाने होणारे आजार
केबिन फिव्हर हा आजार ऋतुमानानुसार होणारा आजार नाही. तर हा आजार एकांतवासाचा आहे. घरात काही दिवसांकरता अडकून पडणाऱ्या लोकांना होणारा मानसिक त्रास म्हणजे केबिन फिव्हर होय.
परंतु हा त्रास जरी मानसिक असला, तरी त्याचा परीणाम शारीरिक स्वास्थ्यावर आणि तब्येतीवर होऊ शकतो. म्हणून वेळीच या आजारातून स्वतःची सुटका करून घेणं बरं असतं.
–
हे ही वाचा – मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!
–
ऋतुमानानुसार होणारे आजार किंवा येणारे औदासिन्य आणि घरात अडकून जगाशी संपर्क सुटल्याने येणारा केबिन फिव्हर हा आजार यांत फरक आहे.
ऋतुमानानुसार होणाऱ्या आजारात औषधं, काही व्हिटॅमिन्स इत्यादी घेतल्याने फरक पडतो, तर केबिन फिव्हर हा आजार घरातून बाहेर पडता आल्यावरच दूर होतो. चार लोकांत मिसळल्यावर बरं वाटतं.
पण अनेकदा या दोन्ही आजारांत दिसणारी लक्षणं सारखी असू शकतात.
सर्वात महत्त्वाचे
केबिन फिव्हर हा आजार कोरोनाच्या आजारापेक्षा खूपच सौम्य आणि क्युअरेबल आहे. त्यामुळे कोविद१९ च्या या काळात घरात राहण्याच्या सूचना काटेकोरपणे पाळा.
केबिन फिव्हरवर उपाय म्हणून या काळात घराबाहेर पडणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे घरात बसून कितीही निराश, उदास वाटत असेल तर या आजारावर वर दिलेल्या उपायांच्या सहाय्याने मात करण्याचा प्रयत्न करा.
परंतु घराबाहेर पडण्याचे टाळा.
थोडक्यात काळजी घ्या.. काळजी करू नका. काळजी करत राहिल्याने भीतीची भावना वाढीस लागते आणि केबिन फिव्हरसारखे आजार होऊ शकतात. त्याऐवजी काळजी घेऊन सावध राहिल्याने आपण सुरक्षित राहू शकता.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.