सिनेमाची परिभाषा बदलणारे “राम गोपाल वर्मा” हे सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये का मागे पडले?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राम गोपाल वर्मा, हिंदी आणि तेलुगु चित्रपट सृष्टीमधील एक लोकप्रिय नाव!
७ एप्रिल १९६२ रोजी आंध्र प्रदेश मधील हैद्राबाद येथे जन्म झालेले राम गोपाल वर्मा हे चित्रपट दिग्दर्शक, स्क्रीन रायटर आणि निर्माते देखील आहेत.
विजयवाडा येथील अभियांत्रिकी विद्यालयामधे शिक्षण घेताना त्यांनी व्हिडिओ दुकान सुरू केले. त्यानंतर फिल्म निर्देशन करण्यास सुरूवात केली त्यांनी!

तेलुगु चित्रपट “सिवा (१९८९) “ ह्या चित्रपटाने त्यांच्या फिल्मी करीअरला सुरुवात झाली. सस्पेंस-थ्रिलर असणारा त्यांचा हा पहिलाच चित्रपट १३ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मधे दाखवण्यात आला होता.
ह्या पहिल्याच चित्रटासाठी त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनचा नांदी पुरस्कार, पदार्पणाचा उत्कृष्ट दिग्दर्शन तसेच तेलुगु फिल्म फ़ेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
राम गोपाल वर्मा हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी ९० च्या दशकात जवळ जवळ सगळे प्रेमपट असायचे.
हे “गुडी गुडी” चित्रपट पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना राम गोपाळ वर्मा ह्यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट देऊन मनोरंजनाला एका वेगळ्याच ऊंचीवर नेऊन ठेवले.

भूत, सस्पेंस थ्रिलर, गुन्हेगारी विश्व आणि सामान्य माणूस ह्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेले हे चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावले.
सत्या, भूत, सरकार, डरना मना है, डरना जरूरी है, रंगीला ह्यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. राम गोपाल वर्मा ह्यांचे चित्रपट जास्त करून रोमांचक आणि भयकथा असणारे आहेत.
रंगीला, सरकार, रक्तचरित्र ह्यांसारख्या चित्रपटांना समीक्षकांची वाहवा मिळाली.
१९९५ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या रंगीला ह्या उर्मिला मातोंडकर, जॅकी श्रॉफ आणि आमीर खान ह्यांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटासाठी अनेक नामांकने आणि मानांकने देखील मिळाली.
हा चित्रपट रोमॅंटिक आणि विनोदी अंगाचा होता.
–
- उर्मिलाच्या प्रेमात वेडा झालेल्या रामूने चक्क माधुरीलासुद्धा फिल्ममधून बाहेर काढलं होतं!
- ‘आशाताईंचा कमबॅक’ समजला जाणारा ‘रंगीला’सुद्धा आज २६ वर्षांचा झाला!
–

त्यानंतर १९९८ मध्ये आलेल्या सत्या ह्या चित्रपटाने केवळ पुरस्कारच नाही मिळवले तर समीक्षांनी ह्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. प्रेक्षकांनीही ह्या चित्रपटाची वाहवा केली आहे.
एकीकडे तेलुगु चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. राम गोपाल वर्मांनी हिंदी आणि तेलुगु भाषेतील अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, जे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले.
राम गोपाल वर्मांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
सरकार चित्रपट आणि त्याचे सिक्वेल ह्यामध्ये अमिताभ बच्चन ह्यांच्या अभिनयाची कमाल बघायला मिळते. ९० च्या दशकात राम गोपाल वर्मांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू मेजवानीच दिली.

सस्पेंस, थ्रिलर, गुन्हेगारी जगतातील सत्य त्यांनी प्रेक्षकांपुढे मांडले. एव्हढेच नाही तर भूत, रात, डरना जरूरी है, डरना मना है आणि कौन ह्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांना भय काय असते ह्याची अनुभूती दिली.
हे चित्रपट बघताना प्रेक्षक जागीच खिळून राहतात. ह्यात कलाकारांचा अभिनय श्रेष्ठ आहे ह्याचे श्रेय अर्थातच दिग्दर्शकाला जाते.
कलाकारांकडून योग्य अभिनय करून घ्यायचे काम दिग्दर्शकाचेच असते, राम गोपाल वर्मांच्या सर्व चित्रपटात त्यातील कलाकारांच्या अभिनयाने ऊंची गाठलेली दिसते, इतका जिवंत अभिनय केलाय त्यांनी!
सामान्य माणूस, गुन्हेगारी विश्व ह्याचा गोफ त्यांच्या चित्रपटातून दिसतो, त्यामुळेच चित्रपट बघताना प्रेक्षक त्यामध्ये गुंतुन राहतो. त्यांच्यासगळ्याच चित्रपटात कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय पहायला मिळतो आपल्याला.
रंगीला, सत्या, सरकार, रन, फूंक, अब तक छप्पन, मस्त, जंगल आणि तेलुगु चित्रपट लक्षात राहतात ते केवळ त्यातील कलाकारांच्या भूमिकेमुळे!
ह्या चित्रपटातल्या प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचा कस लागलेला दिसून येतो ते केवळ राम गोपाल वर्मांच्या दिग्दर्शनामुळेच!

पण, आत्ताच्या काळात त्यांचे चित्रपट म्हणावे तसे चालत नाहीत, प्रेक्षकांनी राम गोपाल वर्मांच्या चित्रपटांकडे जणू पाठच फिरवलीये. का बरं झालं असावं असं?
९० च्या दशकात त्यांचे चित्रपट भरपूर चालत सतत, प्रेक्षक, समीक्षक दोघांनीही नावाजलेले मोजके दिग्दर्शक आहेत त्यातील एक राम गोपाल वर्मा!
सगळं कसं नीट चाललं होतं! मग माशी कुठे शिंकली? असं काय झालं की त्यांचे चित्रपट चालेनासे झाले? चला तर मग पाहूया ह्या उत्तम दिग्दर्शकाचं काय चुकलं? काय झालं असं की त्यांना प्रेक्षकांनी नाकारले?
सुरुवात उर्मिला मातोंडकर पासून झाली. तिचे नाव राम गोपाल वर्मा ह्यांच्याबरोबर जोडण्यात आले. त्यावरून तेव्हा खूप वादविवाद उफाळून आले.
परिणामी वर्मा मातोंडकर ही हिट जोडी वेगळी झाली आणि इतर अभिनेत्रीं बरोबर (अंतरा माळी, जिया खान इ.) केलेले चित्रपट फारसे चालले नाहीत.

“राम गोपाल वर्मा की आग” ह्या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी नाकारलेच त्याबरोबरच त्यातील कलाकारांनी जाहिरपणे असं सांगितलंय की हा चित्रपट करणे ही आमची एक चूक होती.
ह्यात अमिताभ बच्चन ह्यांनीही हा चित्रपट करणे माझी चूक होती असे म्हटले आहे.
एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नीबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल त्या दिग्दर्शकाने राम गोपाल वर्मांना वेडा, विकृत मनोवृत्ती असणारा माणूस असे म्हटले. त्यांनी आक्षेपार्ह ट्वीट देखील केले आहेत.
“स्वच्छ भारत अभियान” बद्दल असणाऱ्या जाहिराती अत्यंत वाईट आहेत अशा आशायाचे ट्विट केल्याने ते वादाच्या भोवर्यात अडकले होते.
त्यानंतर २०१७ मधील मार्च महिन्यात महिला दिनाच्या आसपासच त्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते.
ज्यामुळे वर्मा ह्यांनी तमाम चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आणि त्याचा परिणाम प्रेक्षकांनी त्यांच्या “सरकार ३” कडे पाठ फिवण्यात झाला!

–
- राम गोपाल वर्मांनी जेव्हा अभिजित राजेंचा आवाज चोरला होता…!!
- प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना
–
२०१८ मध्ये लक्ष्मीज् एन्.टी.आर्. ह्या चित्रपटातील वेन्नुपोतु हे गाणे वादाच्या भोवर्यात सापडले. त्या गाण्यात आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ह्यांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे असा आरोप झाला!
त्यावरून खूप मोठा गोंधळ झाला होता. पोलिस केस झाली, वर्मांनी माफी मागितली पण त्याचा परिणाम प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.
प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी वर्मांनी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट केले, काही ना काही चुका केल्या ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या वर नाराज झाले.
अगदी नुकत्याच कोरोना व्हायरस ने थैमान घातलेले असताना, संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये असताना, सगळीकडे कुणीच एप्रिल फूल चे जोक्स पसरवू नये अशी विनंती वारंवार होत होती!
पण तरीही राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून एप्रिल फूल करून स्वतःला एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात ओढून घेतलं!

अभिनेत्रींनी देखील त्यांच्यावर आरोप केले. वर्मांच्या ह्या चुका प्रेक्षकांनी गांभीर्याने घेतल्या आणि त्यांच्या चित्रपटांकडे पाठ फिरवली. २००५ नंतर आलेले त्यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत.
दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना देणाऱ्या राम गोपाल वर्मां ह्यांनी केलेल्या ह्या चुका निश्चितच त्यांना महागात पडल्या, प्रेक्षकांनी त्यांचे चित्रपट सपशेल नाकारले. त्यांच्याकडे पाठ फिरवली.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.