Site icon InMarathi

कोरोनाशी लढण्यासाठी आयर्लंडच्या भारतीय वंशाच्या पंतप्रधानांनी उचललंय एक प्रशंसनीय पाऊल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लिओ वराडकर, आयर्लंडचे पंतप्रधान हे नाव तुम्हाला कधी ऐकल्यासारखं वाटत असेल. ते २०१७ मध्ये भारतात आले होते, तेही स्वतःच्या मूळ गावी भेट देण्याकरिता.

वराडकर आडनावावरून लक्षात येतं की ते महाराष्ट्रीयन आहेत, आणि त्यांचे मूळ गाव आहे आपल्या कोकणातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वराड नावाचं गाव.

जन्मल्यापासून ते कधीही आपल्या मूळ गावी आले नव्हते म्हणूनच त्यांनी आयर्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर वराडला भेट दिली.

 

livemint

 

सध्या कोरोनाच्या कचाट्यातून कुठलाही देश सुटलेला नाही. अगदी एखाद दुसरे पेशंट तरी कोरोनाचे प्रत्येक देशात असावेत. तसेच ते आता युरोपातही वाढलेले आहेत, आणि त्यातला छोटा देश म्हणजे आयर्लंड.

तिथेही आता कोरोनाचं थैमान सुरू झालेलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेले असून होणारे मृत्यूदेखील अधिक झालेले आहेत. आत्तापर्यंत तिथे १५८ मृत्यू हे कोरोनामुळे झालेले आहेत.

छोटा देश कमी लोकसंख्या असून देखील कोरोनाचा धोका वाढलेला आहे. त्यासाठीच आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये याकरिता तिथल्या आरोग्य संस्थेने,

‘ज्या लोकांनी आपल्या इतर करियरसाठी डॉक्टरकी सोडलेली असेल त्या सगळ्यांनी परत एकदा डॉक्टर म्हणून आपले नाव रजिस्टर करायला हरकत नाही’, असं सांगितलेलं आहे.

देशावर हे आलेलं संकट पाहून लिओ वराडकर हे देखील आता पुढे आलेले आहेत. ते पेशाने डॉक्टर असून राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी डॉक्टरकी केलेली आहे.

आणि म्हणूनच आतादेखील डॉक्टर म्हणून सेवा द्यायला ते तयार आहेत. २०१३ मध्ये त्याने डॉक्टरकी सोडली आणि राजकारणात प्रवेश केला. ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री बनले.

 

independente eagle

 

डॉक्टर लिओ वराडकर हे आता आठवड्यातून एक दिवस डॉक्टर म्हणून काम करणार आहेत. म्हणजे त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार ज्या ठिकाणी त्यांची गरज असेल त्याठिकाणी ते आता कोरोना पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणार आहेत.

आणि देशाचा कारभार देखील पाहणार आहेत. गरज पडली तर फोनवरून देखील अशा रुग्णांबरोबर बोलून त्यांच्यावर उपचार करणार आहेत. त्यांना सल्ले देणार आहेत.

आयर्लंड मधील वराडकर फॅमिलीतील बरेच लोक हे आरोग्यसेवा मध्ये काम करतात. ४१ वर्षीय लिओ वराडकर यांनीदेखील सात वर्ष डॉक्टर म्हणून काम केले.

त्यांच्या पत्नी मॅथ्यू बॅरेट या सर्जन असून त्यांच्या बहिणी आणि त्यांचे पतीदेखील डॉक्टर आहेत. लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर हे डॉक्टर होते, तर आई आयरिश नर्स होती.

१९६० मध्ये अशोक वराडकर यांनी भारत सोडला. त्यानंतर २०१७ मध्ये लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान झाले तेंव्हा त्यांचे वय ३८ वर्षे होते. आणि २०१९ ला ते भारत भेटीवर आले आणि आपल्या गावी भेट दिली.

 

india.com

 

आयर्लंडमध्ये आत्तापर्यंत पाच हजार रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १५८जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण तपासण्यासाठी देखील आता तिथे जास्त किट्स ची व्यवस्था करण्यात आली आहे.

आधी फक्त २५०० इतकीच होती तर आता एकाच दिवशी ४५०० लोकांच्या चाचण्या करणे शक्य होणार आहे. गेल्या मार्च महिन्यात तिथल्या आरोग्य संस्थेने ‘आम्हाला तुमची गरज आहे’ असं अशी जाहिरात दिली.

कारण कोरोनाचे रुग्ण वाढत होते, त्याला ७० हजार लोकांनी रिस्पॉन्स दिला. त्यासाठीच डॉक्टर लिओ वराडकर यांनीदेखील आपलं नाव पुन्हा एकदा डॉक्टर म्हणून रजिस्टर केलं.

आयर्लंड मधील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचण्यासाठी आता तिथे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तिथेही दोन आठवड्यांचा लॉक डाऊन सुरू आहे.

 

 

त्याची माहिती पंतप्रधान वराडकर यांनी यांनी त्यानुसार तिथे १२ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असणार आहे. घरातून लोकांनी विनाकारण बाहेर पडायचं नाही. जे लोक कामाला जातील ते फक्त अत्यावश्यक सेवेमधील असतील.

म्हणजे आरोग्य, पोलीस आणि जीवनावश्यक वस्तू पुरवणारे त्या लोकांना वेगळे पासेस देण्यात आले आहेत. तिथल्या सार्वजनिक वाहतूक देखील फक्त हेच लोक सध्या वापरू शकतात.

स्वतःचं आयडेंटिटी कार्ड दाखवून त्यांना प्रवास करता येतो. सगळ्या शाळा कॉलेजेस बंद असून सार्वजनिक ठिकाणं देखील बंद करण्यात आली आहेत. म्हणजे बागा, जिम, ग्राउंड, स्विमिंग पूल इत्यादी.

लोकांनी आपल्या घराच्या आसपासच्या परिसरातच सामान घ्यायला जायचे आहे. आणि तेही सोशल डिस्टन्सिंग पाळून.

मेडिकल सर्विसेस सर्व जनतेसाठी मिळत राहतील. घरातल्या लहान मुलांची आणि वृद्ध लोकांची काळजी घ्या असे आवाहन देखील डॉक्टर वराडकर यांनी आयर्लंडच्या जनतेला केलेला आहे.

लोकांनी आपली तब्येत फिट ठेवण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे मग तो घरात करा किंवा घराच्या बाहेर चालू शकता पण तेही सोशल डिस्टन्सिंग पाळून.

ज्या ऑपरेशनची इतकी गरज लागणार नाही, ते ऑपरेशन्स पुढे ढकलण्यात आलेली आहेत. सध्या फक्त कोरोनाव्हायरसच्या पेशंट्सना प्राधान्य देण्यात येत आहे.

वृद्ध लोकांसाठी अधिक सेवा देण्याचे ठरविण्यात आले आहे. कुठल्याही केमिस्टने डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देऊ नये, कारण पुढे औषधांचा तुटवडा भासू शकतो, म्हणून गरज असेल तरच औषध घ्या.

 

internewscast

 

कुठल्याही प्रकारच्या समारंभांना परवानगी देण्यात आली नसून, कोणत्याही कार्यक्रमासाठी लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

सध्या कोरोना व्हायरस आयर्लंडमध्ये इतका पसरलेला आहे की, लिओ वराडकर म्हणतात व्हायरस कदाचित तुमच्याजवळच असेल, त्यासाठी काळजी घ्या, आणि तो दुसऱ्यांना होणार नाही याची विशेष काळजी घ्या.

तुम्ही कोरोनाव्हायरसचे वाहक होऊ नका. लोकांना अन्न आणि आवश्यक गोष्टी मिळत राहतील. फक्त घरीच रहा आणि घराबाहेर जाऊ नका, असाच सल्ला देखील पंतप्रधान डॉक्टर वराडकर यांनी आपल्या जनतेला दिला आहे.

जायचं असेल तर फक्त दोन किलोमीटरच्या परिघातच फिरा असं सांगितलं आहे.

डॉक्टर लिओ वराडकर यांचं यासाठीच अभिनंदन करावसं वाटतं की, एका देशाचे पंतप्रधान असून देखील ते आपल्या देशासाठी संकट समयी गरज ओळखून मदत करायला तयार आहेत.

कारण कोरोनाचा धोका, हा कोरोना पेशंटवर उपचार करणाऱ्या लोकांसाठी ही तितकाच मोठा आहे. पण त्याची पर्वा न करता डॉक्टर वराडकर आपली वैद्यकीय सेवा द्यायला तयार आहेत.

त्यांची वागणूक आणि त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं बघून ते आपले वाटतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version