आपल्या सगळ्यांचं बालपण मजेशीर करणा-या “मारियो” गेमची जन्मकथाही तितकीच रंजक आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या पैकी बऱ्याच जणांनी लहानपणी व्हिडिओ गेम नक्की खेळला असाल.
प्लंबर असलेल्या मारियो चा खेळ हा कुठल्याही व्हिडिओ गेम ची आवड असणाऱ्या लोकांमधला सर्वाधिक लोकप्रिय गेम!
आजतागायत जगात मारियो चे २०० हुन अधिक गेम तयार करण्यात आले आहेत आणि २४ करोड पेक्षा जास्त गेम युनिट्स विकले गेले आहेत!
या बुटक्या माणसाचं नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल पण, याच्या निर्मिती पासून ते आत्तापर्यंतची गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल.
मारियो ची निर्मिती व्हिडीओ गेम उद्योगातील एका बड्या हस्तीने केली त्यांचं नाव आहे शिगेरू मियाँमोटो. १९७७ ला त्यांनी निन्टेंडो कंपनीत प्रवेश केला त्याच वेळी कंपनी कात टाकत होती.
कंपनी ने पत्यांच्या खेळांची निर्मिती वरून आपले लक्ष व्हिडीओ गेम च्या निर्मिती वर केंद्रित करण्याचं धोरणं अवलंबल.
मियाँमोटो नी इथे सगळ्यात लोकप्रिय व्हिडियो गेम्स ची निर्मिती केली जस की, ‘डॉंकि काँग’, ‘मारियो’, ‘द लिजेंड ऑफ झेलदा ‘ आणि ‘स्टारफॉक्स’.
त्यांना कॉमिक्स ची प्रचंड आवड होती. निन्टेंडो त काम सुरू करण्यापूर्वी एक खेळणी बनवणारे ही त्यांची ओळख होती.
त्या काळी आलेल्या ‘स्पेस इन्वेडेर्स’ या गेम चा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता आणि या कारणामुळेच व्हिडिओ गेम क्षेत्रात मियाँमोटो नी प्रवेश केला.
‘शेर्रीफ’ हा व्हिडीओ गेम बाजारात अपयशी ठरल्याने निन्टेंडो कंपनी ला एका सुपर हिट गेम ची नितांत आवश्यकता होती.सुपर मारियो च्या निर्मितीचं हे एक प्रमुख कारण होतं.
मियाँमोटो ना गेम मध्ये ‘पोपाय’ मधल्या पात्रांचा वापर करायचा होता त्याची परवानगी मिळवण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला पण त्याचा परवाना काही त्यांना मिळाला नाही.
मारियो मधले जवळपास सर्वच पात्रं ही साधी दिसण्यावर भर देण्यात आला जेणेकरून ते कमीत कमी पिक्सल मध्ये तयार होतील.
कदाचित हेच कारण होत की मारियो ला कायम टोपी घातलेलाच दाखवण्यात आलं कारण त्यामुळे त्याच्या केसांच्या हालचालींची चिंता मिटली.
त्याचप्रमाणे त्याच्या मिश्या इतक्या भरदार करण्यात आल्या की त्याचा अर्ध्याधिक चेहराच झाकून जाईल! त्या मुळे चेहऱ्याच्या ऍनिमेशन चा त्रास वाचला.
मारियो चा निळा शर्ट आणि लाल पॅन्ट चा पेहराव सुद्धा याच कारणासाठी ठरवला गेला. मारियो पात्राला समोर येणाऱ्या ‘धुराड्या’ पलीकडे जाण्यासाठी उडी मारण्याची मुभा देण्यात आली.
आणि एका स्टार चा जन्म झाला यातल्या प्रमुख पात्राचं नाव ‘मिस्टर व्हिडीओ’ ठेवण्यात आलं पण नंतर मियाँमोटो नी नाव बदलून त्याचं नाव ‘मारियो’ ठेवलं आणि जे अजरामर झालं!
निन्टेंडो च्या अमेरिकेतल्या गोदाम मालकांच नाव होतं मारियो सेगेल. गोदामात काम करणारे कामगार व्हिडियो गेम मधल्या ‘मिस्टर व्हिडिओ’ ला मारियो म्हणू लागले!
कारण तो हुबेहुब गोदाम मालकासारखा दिसायचा.
जेव्हा मियाँमोटो नी हे नाव ऐकलं तेव्हा त्यांना सुद्धा हे सुटसुटीत नाव आवडलं आणि अश्या रीतीने मारियोच नामकरण झालं.
मारियो ला इटालियन दाखवण्यात आलं कारण ऍनिमेशन कमी करण्याच्या प्रयत्नात त्याची मिशी एखाद्या इटालियन माणसारखी भरदार झाली होती. अर्थात मारियो ला जाणून बुजून इटालियन बनवण्यात आलं नव्हतं.
मियाँमोटो ने त्यानंतर निर्माण केलेल्या प्रत्येक गेम मध्ये त्यांना मारियो वापरायचा होता.प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डिझाइन टिम्स मारियो च्या पेहरावात त्यांच्या कल्पनेप्रमाणे बदल करत गेल्या.
जेव्हा ग्राफिक्स तंत्रज्ञान प्रगत झालं तेव्हा मारियो थ्री डी स्वरूपात सादर झाला.त्याच दरम्यान मारियो चे डोळे निळे करण्यात आले, त्याचा पोशाख बदलण्यात आला त्यावर सोनेरी बटण लावण्यात आले.
मारियो या पात्राचा खरा प्रवेश १९८१ मध्ये आलेल्या ‘डॉंकि काँग’ या गेम मधे झाला. या गेम मध्ये त्याला सुतारकाम करताना दाखवलं होतं.
मजेशीर गोष्ट म्हणजे मारियो हा सुरवातीपासून प्लंबर नव्हता किंवा नंतर सुद्धा बऱ्याच गेम्स मध्ये त्याला तसं दाखवण्यात आलं नव्हतं.
काही गेम्स मध्ये तो डॉक्टर तर काही ठिकाणी पुरातत्व तज्ञ किंवा अजून कोणी व्ययसायिक होता. १९८३ ला मारियो ला स्वतःचा गेम मिळाला.. ‘मारियो ब्रदर्स’ च्या रुपात!
यात त्याचा भाऊ लुईगी हा न्यू यॉर्क शहरात गटारातून आलेल्या व्यक्तींना मात देताना दिसून येतो.१३ सप्टेंबर १९८५ ला जपान मधे ‘सुपर मारियो ब्रदर्स’ गेम प्रदर्शित झाला.
नंतर त्याची उत्तर अमेरिकेत सुद्धा विक्री करण्यात आली आणि लवकरच या गेम च्या ४ करोड कॉपीज खपल्या. सगळ्यात जास्ती लोकप्रियता या गेम ला मिळाली.
या गेम मुळेच खरंतर तो मिशिवाला इटालियन प्लंम्बर – मारियो, निन्टेंडो चं प्रतीक बनून गेला!
१९८५ ला आलेल्या ‘सुपर मारियो ब्रदर्स’ मध्ये राजकन्या तोडस्टूल ला प्रवेश करवण्यात आला नंतर ती ‘पिच’ नावाने ओळखली गेली.
या गेम मधे ती एक संकटात सापडलेली छोटी मुलगी दाखवली. तिचं धनुष्यपासून रक्षण करणं हे मारियो बंधूंच कामं असतं.
पिच खरं तर केवळ एका गेम – ‘सुपर प्रिन्सेस पिच’ मधे मुख्य पात्राच्या भूमिकेत होती तरी सुद्धा ती प्रचंड लोकप्रिय होती!
नंतरचा एक मुख्य टप्पा होता तो म्हणजे १९९० ला बनलेला ‘सुपर मारियो वर्ल्ड’ याचं वैशिष्ट्य म्हणजे ‘योशी’ नावाचा हिरवा डायनॉसोर!
हा प्राणी त्याच्या शत्रूंना गिळतो आणि वेगवेगळ्या रंगाचं कवच खाऊन विशेष शक्ती मिळवतो!
१९९२ ला ‘सुपर मारियो कार्ट’ बाजारात आणला गेला. हा गेम खेळताना, मारियो च्या आता पर्यंत आलेल्या ८ अवतारांपैकी कुठलाही अवतार निवडण्याची मुभा देण्यात आली. हा गेम सुद्धा प्रचंड गाजला.
२००९ ला गिनेस च्या ५० काँसोल गेम च्या यादीत हा सर्वप्रथम होता! १९९३ ला आलेल्या ‘मारियो अँड वारियो’ गेम मधे मारियो चा राक्षसी अवतार असलेला वारियो दाखवण्यात आला.
या गेम मध्ये’ वांडा’ नावाचे पात्र वातावरण दूषित करते. आंधळ्या मारियो ला एक परी प्रत्येक लेव्हल मध्ये लुइगी ला भेटण्यासाठी मदत करताना दाखवलं आहे.
१९९९ ला ‘सुपर स्मॅश ब्रदर्स’ मधे निन्टेंडो च्या सर्व गेम मधील पात्रांची लढाई दाखवण्यात आली. नंतर च्या काळात मारियो चा गेम अधिक बदलत गेला.
नवीन तंत्रज्ञान, ग्राफिक्स चा वापर करून मारियो ला अजून स्मार्ट बनवण्यात आलं. मारियो चा वापर काही शैक्षणिक गेम्स मधे सुद्धा करण्यात आला जस की
‘मारियो टीचेस टायपिंग’ ,भूगोलाच्या अभ्यासाशी निगडित ‘मारियो मिसिंग’!
आता निन्टेंडो ने नवीन गेमिंग प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. मारियो सोबत इतर कुठल्याही गेम्स ची भागीदारी करून त्यांनी नवीन गेम्स बाजारात आणण्याचं नियोजन केलंय.
त्याचंच उदाहरण म्हणजे २०१७ चा ‘सुपर मारियो ओडिसी’ ज्याच्या जवळपास एक करोड कॉपीज विकल्या गेल्या!
‘टाइम्स’ मासिकाला २०१० ला दिलेल्या मुलाखतीत मियाँमोटो सांगतात की ‘मला खरंतर नाविक पोपॉय सारखं पात्र गेमिंग मधे बनवायचं होतं. पण अपघातानेच मारियो चा जन्म झाला!
सुरवाती पासूनच मला मारियो ला माझ्या सर्व पुढील गेम्स मध्ये मुख्य पात्र म्हणून वापरायचं होतं. जपान मधे ही परंपरा आहे की एक गाजलेलं पात्र तयार करून तेच सगळ्या भागांमध्ये अंतर्भूत करायचं.
जसं की हिचकॉक त्याच्या सगळ्या सिनेमात कुठे ना कुठे तरी झळकायचा. तसंच माझ्या सगळ्या गेम्स मध्ये मारियो तुम्हाला दिसेल भलेही त्याला फार काही रोल नसेल पण त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवत राहील’
या वर्षी अँपल ने निन्टेंडो सोबत भागीदारी करून ‘सुपर मारियो रन’ गेम आणण्याची घोषणा केली.
या वरून हे दिसून येतं की मियाँमोटो ची कल्पकता त्यांच कामं हे कधीच विस्मरणात जाऊ शकणार नाही आणि तो मारियो इटालियन प्लंबर व्हिडियो गेम्स च्या इतिहासात अजरामरच राहील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.