वॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
घर बांधताना एक प्रश्न आवर्जून विचारला जातो, घर वास्तुशास्त्रानुसार बांधतोय ना? घरात काही अडचण असल्यास प्रत्येकाचा संशय आधी वास्तुदोष आहे का? हाच असतो. घराचं काम करताना हिंदू संस्कृतीत वास्तुपुरुषाची पुजा नक्कीच करतात. पण मग हे फक्त हिंदु संस्कृतीतच का? नाही फेंग शुई हे सुद्धा वस्तू शास्त्रासारखंच चायनीज शास्त्र आहे.
वास्तुशास्त्र हे सर्वात जुनं शास्त्र आहे. वास्तुशास्त्राचा अभ्यास भारतातच नव्हे तर जगभरात बऱ्याच स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक करतात. वास्तुशास्त्राच्या अभ्यासाने घरातील दोष – वास्तुदोष काढून टाकता येतात. घरात काही छोट्या बदलांमुळे प्रसन्नता आणि सुबत्ता वावरू शकते.
असाच एक छोटासा बदल म्हणजे वॉलपेपर. घरात आपण वॉलपेपर सजावट म्हणून वापरतो. पण वास्तुशास्त्र आणि फेंगशुई च्या मते वॉलपेपरच्या योग्य निवडीने नकारात्मकता आणि मरगळ घालवुन उत्साहाचं वातावरण निर्माण करता येतं. काही वॉलपेपर निगेटिव्ह असतात तर काही पॉझिटिव्ह असतात. ह्यांची निवड योग्य प्रकारे करता यायला हवी. तुमच्या आयुष्य, स्वास्थ्य आणि सुख ह्यावर चांगला आणि जाणवेल असा परिणाम ह्या चित्रांनी पाडता येतो. अनेकांसाठी फेंगशुई हा थट्टेचा, उपहासाचा विषय असतो. त्यांना ही अंधश्रद्धा वाटते. परंतु, ज्या गोष्टी सहज, सोप्या आहेत, ज्यांमुळे प्रसन्नता वाढू शकते, त्या उचलायला हरकत नसावी…हो ना?
घरात पुरेसा प्रकाश येत नसेल आणि त्यामुळे जर अंधार वाटत असेल तर घरात उगवत्या सूर्याचं चित्र लावल्यास घरात चैतन्य जाणवेल.
उडत्या पक्ष्याचा किंवा झाडांच्या चित्राला घरातल्या बैठकीत म्हणजेच महत्वाच्या भागात लावल्यास त्याचा संपत्तीची वृद्धी होते. तसेच जर वाहत्या नदीचं किंवा माशाचं चित्र तुम्ही घराच्या महत्वाच्या भागात ठेवलं तर घरातल्या संपत्तीला स्थैर्य येतं असं फेंगशुई सांगतं.
फेंग शुई मध्ये घरात बांबूच्या झाडाचं चित्र आवर्जून लावायला सांगतात. ह्याने घरात सुबत्ता येते आणि घरातल्या सर्व सदस्यांना लाभदायक ठरते.
कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मुलांच्यात येऊ नये म्हणून मुलांच्या खोलीत चित्र लावतांना खास काळजी घ्यायला सांगितली जाते. हरीणाचे चित्र लावण्याचा सल्ला बरेच फेंगशुई तज्ज्ञ सांगतात. हरीण उत्साह आणि चपळता हे गुण दर्शवतात.
जर घरात नकारात्मकता वाटत असेल तर ती घालवण्यासाठी घरात पाईन झाडाचं चित्र लावावे.
पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं चित्र भिंतीवर लावतांना हिंस्र प्राणी, रडताना, जखमी किंवा मेलेल्या प्राण्याचे चित्र लावणे टाळा त्याने दुःख आणि नैराश्य ह्या गोष्टी प्रतीत होतात. ज्या चित्रात दोन पक्षी असतील त्याला प्राधान्य द्या कारण एकटं पक्षी असलेलं वॉलपेपर एकाकीपण दर्शवतं.
फळांच्या चित्राने व्यक्तीची भूक चाळवल्या जाते. स्वयंपाकघरात फळांनी भरलेल्या टोपलीचं चित्र वॉलपेपर म्हणून लावणे नेहमीच चांगले. आपल्या परिजनांची भूक वाढणे नेहमीच चांगले, नाही का?
एकदा तुम्ही हा प्रयोग करून बघा फरक जाणवला तर आम्हाला नक्कीच कळवा!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi