Site icon InMarathi

तबलिगी जमातीच्या रुग्णांचे “हे” प्रताप एकीकडे संताप आणतात दुसरीकडे आपल्याला हतबल करतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तीन- चार दिवसांपूर्वी तबलिकी जमातीच्या लोकांनी उत्तरप्रदेशच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या घृणास्पद कृत्यांबाबत आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये बघितलं असेलच.

दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमध्ये सामील झालेल्या देश-विदेशातील तबलिगी जमातीच्या लोकांपैकी ताब्यात घेतलेले अनेकजण कोरोनाबाधित संशयित रुग्ण आहेत.

तबलिगी ही मुस्लिमांची एक कट्टरपंथील संघटना असून तिच्या अनेक देशांत शाखा असल्याचे म्हटलं जातंय. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सामील होण्यासाठी काहीशे लोक येथे गोळा झाले होते.

लॉकडाऊन नंतर देखील हे सगळे तिथेच एकत्रितपणे लपून राहिले होते. ही बातमी कळल्यावर त्यांना तिथून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु दरम्यानच्या काळात अनेक लोक तिथून पलायन करून देशाच्या कानाकोपऱ्यांत विखुरले असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

यामुळे जनतेत भीती आणि राग या दोन्ही भावना एकाचवेळी पसरल्या होत्या.

 

first spot

 

ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्यावर उपचारांसाठी त्यांना राज्याच्या विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले असून त्यांना त्या त्या हॉस्पिटलच्या कोरोनासाठी असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

परंतु ह्या रुग्णांचे वर्तन कळले तर कुणालाही संताप येईल असे त्यांचे हे वर्तन आहे. हे रुग्ण वैद्यकीय किंवा पोलिस कर्मचाऱ्यांना अजिबात सहकार्य करत नसून, उलट त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत.

एवढेच नव्हे तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकणे, इकडे तिकडे मुद्दाम अस्वच्छता करून थुंकून ठेवणे, आपल्याला झालेल्या विषाणूंचा संसर्ग इतरांनाही होईल असे वर्तन करणे असे विविध प्रकार हे रुग्ण करत असतात.

जेव्हा पोलिसांनी त्यांना मरकजमधून काढून हॉस्पिटल्समध्ये नेण्याची कारवाई केली, तेव्हाही हे सगळे रुग्ण कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास तयार नव्हते.

 

india today

 

यातील अनेक तर सरकारच्या हातावर तुरी देऊन तिथून पळालेले आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लपून बसलेले आहेत. त्यांनी आपले मोबाईल देखील बंद ठेवले असल्याच्या बातम्या आहेत.

या लोकांचा उद्देश समाजात कोरोना विषाणूचा प्रसार व्हावा असाच आहे की काय अशी शंका यावी असे त्यांचे वागणे आहे.

जेव्हा पकडलेल्या काही संशयित रुग्णांना त्यांच्या तपासणीसाठी पोलिस हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले होते तेव्हाही पोलिसांच्या व्हॅनमधून जाताना हे रुग्ण मुद्दाम खिडक्यांतून बाहेर रस्त्याने थुंकत राहत होते.

हे पाहून पोलिसांनी व्हॅनच्या खिडक्या लावून घेतल्या तर ते पोलिसांना देखील जुमानत नव्हते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांनी तबलिगी जमातच्या रुग्णांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैर वर्तनावर आणि तेथल्या नर्सशी केलेल्या अश्लील वर्तनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

 

amar ujala

 

हे सहन केले जाणार नाही, आणि त्यांना सोडणार नाही असेही ते म्हणाले. या रुग्णांवर ‘एनएसए’ (रासुका) लावला जाईल असे ते म्हणाले.

गाझियाबादच्या एमएमजी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी तिथे ठेवण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कोरोना बाधित रुग्णांनी हॉस्पिटलच्या महिला परिचारिकांशी आणि इतर महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, अश्लील वर्तन केल्याची तक्रार केली.

शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रुग्णांच्या सेवेत महिला परिचारिका, इतर कर्मचारी आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये असे आदेश दिले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, “ते कायद्याचे पालन करणारे नाहीत. ते मानवतेचे शत्रू आहेत, त्यांनी महिला आरोग्य कर्मचार्‍यांबरोबर जे केले ते एक घोर अपराध आहे. त्यांच्यावर एनएसए लावला जात आहे, आम्ही त्यांना अजिबात सोडणार नाही.”

नेमके काय घडले? 

या आधी देखील तबलिगी जमातच्या मरकजला हजर राहिलेल्या कोरोना बाधित रुग्णांना ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये विलगीकरण कक्षांत ठेवण्यात आले होते, तिथून तक्रारी येत होत्या.

हे रुग्ण वैद्यकीय विभागाला सहकार्य करत नसून, या कोरोनाचा प्रसार होऊन तिथले कर्मचारीही बाधित व्हावेत म्हणून मुद्दाम सगळीकडे थुंकणे, आदेशांचे पालन न करता गैर वर्तन करणे इत्यादी प्रकार करत आहेत.

गाझियाबाद येथील एमएमजी डीस्ट्रीक्ट हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या जमात-ए-तबलिगच्या सहा रुग्णांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

 

toi

 

हे रुग्ण जाणुनबुजून कक्षात नग्न होऊन फिरत होते आणि तेथील महिला परिचारिकांना पाहून असभ्य, अश्लील हावभाव करून दाखवत होते. या रुग्णांना आता ‘राजकुमार गोयल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मध्ये हलवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणा ऱ्यांविरूद्ध राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए) अंतर्गत कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत.

आरोपींवर एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारचे निवेदन आहे.

लॉकडाऊन दरम्यान राज्यातील कोणत्याही ठिकाणी पोलिसांवर हल्ला करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. एनएसएअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने आरोग्य कर्मचार्‍यांवर किंवा पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

 

live law

 

देशाच्या बर्‍याच भागांमध्ये, कोविड -१९ चे संशयित रुग्ण स्थानिकांसह कोव्हीड -१९ च्या चाचण्यांसाठी नमुने गोळा करण्यासाठी त्यांच्या भागात आलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवरही हल्ला करत आहेत.

नुकतंच, रामपूर तांडा भागात काही लोकांच्या टोळक्यांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केल्याने तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.

उत्तर प्रदेशमधील हे जमात-ए-तबलिगचे कोरोनाबाधित संशयित रुग्ण औषधं घेण्यासही नकार देतात आणि विलगीकरण कक्षात स्वतंत्र न राहता एकत्र येऊन बसतात.

वॉर्डमधील नर्सना पाहून अश्लील चाळे करतात, अश्लील गाणी लावून ऐकत बसतात. महिला परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांजवळ विड्या-सिगरेट्स इत्यादी वस्तुंची मागणी करतात.

 

livemint

 

अशा तक्रारी आधी गाझियाबादच्या एमएमजी हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चिठ्ठी लिहून केल्या होत्या.

यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या तक्रारींच्या संदर्भात गाझियाबादच्या पोलिसांना पत्र लिहून या रुग्णांच्या अशोभनीय आणि अश्लील वर्तनाबद्दल कळवले.

हे रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे देखील कठीण जात असून पोलिसांनी आपल्या पातळीवर त्यांना ताळ्यावर आणावे म्हणजे त्यांच्यावर नीट उपचार करता येतील असे आदेश दिले.

तबलिगी सदस्यांच्या या वर्तनाबद्दल देशभरातून संतापाची लाट उमटली आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या या वर्तनाचा निषेध व्यक्त होताना दिसतोय.

कोरोना विषाणूच्या प्रसाराने आणि वाढत्या आकड्यांनी आधीच भयभीत आणि चिंताग्रस्त होऊन लॉकडाऊन असलेली येथील सामान्य जनता या लोकांच्य वर्तनाने अधिकच भयभीत झालेली आहे यात शंका नाही.

कारण जे सापडले नाहीत ते कुठे जाऊन या विषाणूचा प्रसार करत असतील हे सांगता येत नाही. आणि जे सापडलेत त्यांचे वर्तन हे असे संतापजनक आहे.

आधीच नकारात्मक वातावरण असलेल्या या परिस्थितीत हे वागणे हतबलता आणणारे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version