Site icon InMarathi

कोरोनाने बँक बॅलन्सचं गणित बिघडवलंय? आर्थिक समतोल ठेवण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा

tensed man inmarathi 1

knot9

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

कोरोनाच्या लॉकडाऊनने बऱ्याच जणांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. अनेक लोकांचे व्यवसाय ठप्प झालेत. उत्पन्नाचे स्रोत बंद झालेत किंवा कमी झालेत. अशावेळी आर्थिक चिंतेने ग्रस्त होणे स्वाभाविक आहे.

हे कधी संपेल आणि बेरोजगार, अर्धरोजगार कामागारांचंही कसं होईल याची अजून कुणालाच काही कल्पना नाही.

आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असली, तरी बहुतांश उद्योग अद्याप सुरु नाहीत, त्यातही कोरोनाचा वाढता विळखा पाहून अनेकांनी घरी राहणे पसंत केले आहे.

 

outlook india

 

मात्र दुःखात सुख एवढंच आहे, की ही परीस्थिती कुणा एकट्याची नाही. अनेकांची ही स्थिती झालेली आहे. ही एक सार्वत्रिक आपत्ती आहे. बचत राखून असणारी माणसे देखील काळजीत आहेत.

कारण ही परिस्थिती किती दिवस अशीच राहिल हे सांगता येत नाही. अशावेळी आपली आर्थिक स्थिती समतोल कशी राखायची यासाठी पुढील टिप्स तुमच्या नक्की उपयोगात येतील –

आपले उत्पन्नाचे स्रोत तपासा

सर्वप्रथम आपल्याला या काळात कुठून पैसा मिळू शकतो ते स्रोत तपासा. उदा, जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तिथे तुम्हाला सिक लिव्ह किंवा अर्न लिव्ह मिळत असेल तर त्याची माहिती मिळवा.

सिक लिव्हचे काही मदतीच्या स्वरुपात फायदे होतात का ते बघा. तुमची रजा साठलेली असेल आणि ती रजा कॅश करण्याची सोय तुमच्या नोकरीत असेल, तर अशा रजा कॅश करून तात्पुरती पैशाची निकड भागवू शकता.

 

indiatoday.intoday.in

 

नोकरीच्या ठिकाणी फंड इत्यादीची व्यवस्था असेल, तर अशा फंडातून रक्कम उचलू शकता.

छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी, कारणांसाठी, गरजांसाठी बँका कर्ज देत असतात. अशा कर्जांची माहिती काढून त्यासाठी अर्ज करून असे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता.

अनेक सामाजिक संस्था आपत्तीकाळात लोकांना मदत करत असतात. यात रोजचे जेवण देण्यापासून ते आर्थिक मदतही असते. तुमच्या समाजाच्या आणि आसपास अशा संस्था असतील तर अशी मदत घेण्यास संकोच करू नका.

लक्षात ठेवा ही तुमची वैयक्तिक अडचण किंवा समस्या नसून ही राष्ट्रिय आपत्ती आहे. त्यामुळे मिळेल तिथून मदत घेण्यास कोणतीच हरकत नाही.

 

बिलं कशी भरावी

विविध प्रकारच्या नित्य स्वरुपातल्या बिलांची काळजी फार करू नका. उदा. लाईट बिल, घर-भाडे, किराणा-बील इत्यादी.

मुख्य म्हणजे ही सार्वजनिक आपत्ती असल्याने सगळ्यांनाच सगळ्यांच्या परिस्थितीची कल्पना आहे. कोणीही या काळात तातडीने तुमच्याशी पैशाचा तगादा लावणार नाहीए. त्यामुळे फार काळजी करू नका.

 

medium

 

त्यातही कोणती बिलं खरंच तातडीने भरावी लागणार आहेत याचा आधी विचार करा. त्यांची वर्गवारी करा. प्राधान्य क्रम ठरवा.

बिलं तातडीने भरायची नसली, आणि कोणी तगादा लावणार नसलं, तरी शक्य तितकी बिलं देता येतील असे बघा. म्हणजे नंतर एकदम देणी साठणार नाहीत. आणि तेव्हा लोक पैशांसाठी मागे लागणार नाहीत.

त्यासाठी –

घरभाड्यासंबंधी नियम अभ्यासून पाहा. त्यात काही आपत्कालीन सूट मिळते का ते पहा. लाईट-बील ताबडतोब नाही भरले, तरी या काळात तुमची वीज कापली जाण्याची शक्यता नाही.

बँका आणि क्रेडीट कार्डस या काळात काही ऑफर्स देतायत का ते पाहा. त्यांची चौकशी करा. क्रेडीट कार्ड्सचा तुम्हाला या काळात उपयोग होऊ शकतो.

 

innovativeretailtechnologies.com

 

मात्र आवश्यक तितकाच याचा वापर करा. अनावश्यक वापर टाळा.

 

मानसिक स्वास्थ्य सांभाळा

आर्थिक विवंचनेच्या या काळात आपले शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य आधी सांभाळा. तुम्ही स्वस्थ राहाल तर काही उपाययोजनाही करू शकाल.

या काळात आर्थिक ताणतणाव येणं साहजिक आहे. पण या तणावाचा विपरित परिणाम तुमच्या शारिरीक स्वास्थ्यावर होऊ शकतो, याचा विचार करा आणि स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करा.

सतत आर्थिक विचार करत राहण्यापेक्षा आपली दिनचर्या अशी ठेवा की जेणेकरून तुम्ही प्रसन्नही राहाल.

त्यासाठी चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करा थोडा व्यायाम, मेडिटेशन, योगा, ओमकार जप यांची मदत घ्या.

 

cosmoplitan india

 

या काळात नर्वस होऊ नये यासाठी घरातल्या कामांचे आणि आपल्या दिनचर्येचे टाईम-टेबल आखा. त्याप्रमाणे दिनचर्या ठेवा. अशा दिनचर्येमुळे मनात अस्वस्थ करणारे विचार कमी येतील.

जर खूप अस्वस्थ वाटत असेल, परिस्थितीची भीती वाटत असेल, तणाव जाणवत असेल, तर ऑनलाईन मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. ऑनलाईन टिप्सची मदत घ्या.

आर्थिक बाबींची काळजी अधिक करण्यापेक्षा सध्या शारिरीक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याची अधिक गरज आहे हे लक्षात घ्या. 

कोरोनाच्या या आजाराच्या साथीत शारिरीक काळजी घेणंही तितकेच गरजेचे आहे. स्वच्छता, सतत हात धुणे, विनाकारण बाहेर न जाणे, घरातल्या सदस्यांची काळजी घेणे या मुद्द्यांवर देखील विचार करा.

 

 

त्याने तुमचे शरीरस्वास्थ्य टिकून राहील आणि पर्यायाने मनस्वास्थ्य देखील. लक्षात ठेवा, जान है तो जहान है. तुम्हीच स्वस्थ राहिला नाहीत तर कुटुंबाची आर्थिक स्थिती कोण सावरेल?

पर्यायी उत्पन्नाचे स्रोत तपासा

नेहमीचा व्यवसाय, नोकरी, त्यातून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले असेल तर या काळात घरी बसल्या बसल्या आपण कोणते काम करू शकतो आणि त्यातून पैसा कमावू शकतो यावर विचार करा.

किंवा काही ठिकाणी अजूनही नोकऱ्या मिळू शकतात याचा विचार करा.

या कालावधीत अनेक कंपन्यांना कामगारांची गरज आहे. डिलिव्हरी बॉयची गरज आहे. संगणकावर एडीटींग, अनुवाद, ग्राफिक डिझाईन करणाऱ्यांची गरज आहे.

 

business insider india

 

घरबसल्या ऑनलाईन शिकवण्या घेणाऱ्यांची गरज आहे. अशा कामांचा शोध घ्या. त्यातून उत्पन्न कमी मिळेल पण काहीतरी मदत नक्की होईल.

सरकारी मदतीच्या वेबसाईट्स तपासा. या काळात तिथून काही आर्थिक मदत मिळते का ते बघा.

तुम्ही जर वैद्यकीय क्षेत्रातले असाल, तर घरबसल्या नेटवरून आपल्या पेशंट्सना वैद्यकीय सल्ले देऊ शकता. त्याची फी आकारू शकता.

इतर गोष्टी

पुन्हा एकदा लक्षात ठेवा. ही राष्ट्रीय, सामाजिक, सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे यात तुमच्या एकट्याचा काही दोष नाही. हे दिवस आर्थिक बजेट सांभाळण्यापेक्षा आधी शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याचे आहेत.

त्यासाठी आपल्याजवळ असलेला पैसा पुरवून वापरा. अनाठायी खर्च टाळा.

या काळात आपण घरीच असल्याने बाकी अनेक खर्चांना आपोआप कात्री लागलेली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच गरज प्राधान्याने आहे. त्यामुळे तेवढा खर्च सोडता फार काळजी करू नका.

 

 

बीलं भरता नाही आली तर त्याचा ताण मनावर ठेवू नका. या आधी तुम्ही सर्वांची बीलं वेळेवर भरत होतात. पण सध्या नाही भरली गेली म्हणून तुम्हाला कोणी येऊन लगेच विचारणार नाहीए.

त्यामुळे तुमची लगेच इमेज खराबही होणार नाहीए. त्यामुळे अनावश्यक ताण घेऊ नका.

पुन्हा दिवस नॉर्मल झाले की नवीन वस्तू खरीदता येतील. काही शेअर्स, म्युच्युअल फंड्स असतील तर विकून टाकू शकता.

जवळच्या नातेवाईंकांडून मदत मिळवू शकता.

तर अशारीतीने परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक प्रकारे तुम्ही विचार करू शकता आणि प्रयत्न करू शकता. संकटसमयीच समोचित वर्तन महत्त्वाचे असते.

एरव्ही तर सगळं सुरळीत चालूच असतं. त्यामुळे पॅनिक होऊ नका. स्वास्थ्य सांभाळा. आपले आणि आपल्या निकटवर्तीयांचेही.

या कसोटीच्या काळात आपण सगळेच परिस्थितीवर मात करून यातून बाहेर येऊ. आणि पुन्हा वसंताचे गीत गाऊ.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version