' नकळत तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारा छंद – फोटोग्राफी! – InMarathi

नकळत तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारा छंद – फोटोग्राफी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. कुणाला टपालाची तिकिटं जमवण्याचा, कुणाला जुनी चलनाची नाणी जमवण्याचा, कुणाला हिंडायचा तर कुणाला फोटोग्राफीचा! प्रत्येक जण आपापल्या परिने वेळ काढून आपला छंद जोपासतो. छंदामुळे आपल्याला काहीतरी स्वतःसाठी केल्याचं समाधान मिळतं. पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट माहितीये का? आपला छंद आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा करू शकतो?

आजकाल बऱ्याच जणांना तुम्ही DSLR घेऊन फोटोग्राफी करताना बघू शकता. फोटोग्राफीच जणु  व्यसनंच लागतंय अख्या पिढीला. खरं तर चूक त्यांची नाही, फोटोग्राफी आहेच तेवढं cool. आणि छंद म्हणून जर फोटोग्राफीचं व्यसन असेल ना कुणाला तर फोटोग्राफी तुम्हाला Personality Development मध्ये नक्कीच मदत करते. ती कशी हे आपण बघु..

 

प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असणे – Preparation

accessories-Marathipizza

Source

जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करायला जात असता तेव्हा तुम्ही प्रत्येक साहित्य सोबत घेता. ज्या लेन्स ची गरज पडेल ती, फ्लॅश ट्रायपॉड आणि बाकीच्या सामग्री. जिथे जाणार आहेत तिथे कोणत्या वस्तूची गरज पडू शकते आणि त्यांचा कसा वापर करून घेता येईल हा सगळं विचार आपण करतो. ह्याने आपल्याला सर्व शक्यतांचा विचार करण्याची आणि त्यासाठी तयार राहण्याची सवय होते.

 

संयम – Patience

sitting sunset marathipizza

आपण बऱ्याचदा बघतो की हवा तो फोटो मिळवण्यासाठी फोटोग्राफर ला किती संयम ठेवावा लागतो. सतत एकाच जागेवर बसून राहणे ओघाओघाने आलेच. त्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असेल तर विचारूच नका. हवा तो फोटो मिळवताना संयमाची चांगलीच परीक्षा होते. त्यामुळे संयम कमालीचा वाढतो. फोटो तर हवा असतो आणि तो ही जसा ठरवलंय तसाच. मग थोडी कळ सोसा!

 

छोट्या छोट्या गोष्टी – Detailing

imagination marathipizza

प्रत्येक फोटो काढताना फ्रेम मध्ये काय घ्यायचे, छोट्या डिटेल्सवर लक्ष द्यावं लागतं. फोटो बघताना बऱ्याचदा रसिक बारीक गोष्टींकडे लक्ष देतात. काळजी म्हणून आपण फोटो घेतानाच ह्याचा विचार करू लागतो. ह्याने आपल्याला लहान गोष्टींकडे लक्ष देण्याची सवय लागते. आणि ही सवय आपल्या आयुष्यात कोणताही निर्णय घेताना महत्वाची आहे.

 

गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन – Virtue

standing PGR marathipizza

आपण जेव्हा फोटो काढत असतो तेव्हा Object ला सगळ्याच दृष्टिकोनाने बघतो. आपल्याला प्रत्येक दृष्टिकोन विचार करून त्यातला बेस्ट शॉट कोणता असेल हा विचार करून फोटो काढायचा असतो. ह्याने आपल्याला दृष्टिकोन पडताळून बघण्याची सवय होते. ज्याने आपल्याला समोरच्याचं म्हणणं चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होते.

 

फोटोत काढताना तुम्ही संवेदनशील होता – Emotion

emotion boy marathipizza

फोटो काढताना आवडता आणि सोप्पा विषय म्हणजे लहान मुले, म्हातारी माणसे आणि वारकरी. ह्यांचे भाव टिपताना आपण त्यांच्यात गुंतत जातो. आपण भावनांना महत्व देऊ लागतो. अश्याने आपल्याला समोरच्याशी बोलताना समोरच्याला समजून घेणे सोपे होते.

 

स्वतःला व्यक्त करायला शिकता – Express

one click and words marathipizza

Source

फोटो काढत असताना तुम्ही स्वतःला व्यक्त करत असता. तुमच्या फोटोंमधून तुम्ही शब्दांशिवाय स्वतःच म्हणणं व्यक्त करता. ते म्हणतात ना एका फोटोत हजार शब्दांपेक्षा जास्त ताकद असते. म्हणजे तुम्ही काढलेल्या फोटो मध्ये तुमचं मत आणि पर्यायाने तुमचं प्रतिबिंब असतं.

 

सांगा तर आता तुमचा छंद काय आहे? तो तुमच्यात काय सुधार घडवतोय?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?