' रटाळ तरीही कंपल्सरी : नोकरीबाबत हीच अवस्था असेल तर या टिप्स तुमचा दृष्टीकोन बदलून टाकतील – InMarathi

रटाळ तरीही कंपल्सरी : नोकरीबाबत हीच अवस्था असेल तर या टिप्स तुमचा दृष्टीकोन बदलून टाकतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज काल शिक्षण, नोकरी सगळीकडे स्पर्धा वाढलीये. नोकरीसाठी शिक्षण हे आत्ताचं वास्तव आहे!

बघा ना, आज-कालच्या मुलांचं १० वी, १२ वी मध्येच चांगली, भक्कम पगाराची नोकरी, आय.टी. किंवा तशाच कोणत्यातरी भरपूर पगाराचा जॉब करायचं पक्कं ठरलं असतं! त्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे आत्ता सगळीकडे!

आणि ह्या स्पर्धेत टिकून राहायचं तर आपण  perfect असायला हवं. बॉसच्या अपेक्षा तर वाढतातच आपल्याकडून पण आपण पण स्वतःच्या सुद्धा अपेक्षा वाढवतो स्वतःबद्दल!

बेस्ट परफॉर्मन्स देण्याच्या नादात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. १०-१२ तास नोकरी करायची आणि पगारासाठी ३०/३१ तारखेची वाट बघायची. ह्यात आपल्याला किती आनंद मिळतो? आपल्याला किती समाधान मिळतं?

 

work from home inmarathi
Malayala Manorama

 

आपले काम आपण आनंदाने करायला हवे. कामातून आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. पण कधी आपण असा विचार केलाय का, की ते खरंच मिळतंय का आपल्याला?

आपल्या कामात आपण खूप मोठा बदल करण्याची गरज नाही, काही किरकोळ बदल ज्याने आपल्याला आनंद मिळेल आणि रोजीरोटीही कमवायला मदत होईल असे बदल गरजेचे आहेत.

नोकरीच्या ठिकाणी समाधान कसे मिळवावे? आपल्याला आपले काम कसे आनंदाने करता येईल?

रोजच्या कामात पण आपण असे काही करता येते ज्याने आपले काम रटाळवाणे न होता कामाचा आनंद घेता येईल आपल्याला!

त्यासाठी आपणच आपल्या नोकरीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधल्या पाहिजेत, ज्याने आपला कंटाळा निघून जाईल.

आपण आज हेच जाणून घेऊया की, आपण आपले काम कसे “एंजॉय” करू शकतो!

आनंदाने काम करण्यासाठी आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळवायला हवे, थोडीसी शाबासकी मिळवली की आपल्याला कामाला हुरूप येतो.

म्हणून थोडेसे शाबासकी मिळवण्यासाठी काम करावे, तसेच आपल्याला शाबासकी मिळाली, एखादा छोटासा पुरस्कार मिळाला तर आपली ओळख बनते.

 

boss employee inmarathi
the business journals

 

यामुळे, आपले अंगभूत गुण अजून उजळून येतात आणि काम करायला हुरूप येतो.

एखादा मोठा प्रकल्प, गुंतागुंतीचे -वेळखाऊ काम पूर्ण केल्यानंतर स्वतःचे लाड करायची संधी सोडू नका! एक काम तुम्ही हुशारीने पूर्ण केले आहे तर कामाचा शारीरिक आणि मानसिक तणाव तर असणारच!

तो ताण, तणाव दूर करण्यासाठी होम स्पा करू शकता त्याचबरोबर स्वतःच स्वतःला बक्षीस देऊ शकता.

 

body-massage-inmarathi
whatsonxiamen.com

 

एखादी छान वस्तू किंवा खूप दिवसांपासून एखादी आपल्या घेण्याची इच्छा असलेली एखादी वस्तू स्वतःला गिफ्ट म्हणून द्या! मस्त वाटेल एकदम. काम करायचा उत्साह वाढेल.

आपण बऱ्याचदा “ग्रुप वर्क” करतो. काम मस्तपैकी कंप्लिट होतं पण, आपल्याला हवी तशी त्या कामाची वाहवा होत नाही. तेव्हा आपणच आपल्या सहकाऱ्याची पाठ थोपटायला हवी.

आपणच एकमेकांना शाबासकी द्यायला हवी. आपणच एकमेकांचे कौतुक करायला हवे.

 

office inmarathi

 

ज्यामुळे आपल्याला पुढचं काम करायला हुरूप तर येतोच पण त्याबरोबरच परत त्याच सहकाऱ्यासोबत काम केलं तर ते काम आधीच्या शाबासकीमुळे आणखीनच मस्त होईल.

संतुलित जीवनशैली खूप महत्त्वाची आहे इथे. आपले खाजगी जीवन आणि आपले काम ह्यांचा योग्य ताळमेळ साधला तर कामाच्या ठिकाणी येणारा ताण आपण कंट्रोल करू शकतो.

काम आणि खाजगी आयुष्य ह्यांच्यात गल्लत करता कामा नये. हा बॅलेन्स साधला की कामात योग्य लक्ष लागतं आणि काम सफलतेने पूर्ण होतं.

आपले नातेवाईक, आपले छंद, निरोगी आहर, आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ, व्यायाम, झोप, निरोगी जीवनशैली ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितके आपले काम!

 

jaqueline-yoga-inmarathi
pinterest.co.uk

 

म्हणून काम एके काम ह्यापुरते मर्यादित राहिले तर नक्कीच ते रटाळवाणे होईल. एव्हढेच नाही तर ह्या गोष्टी नसतील तर कामाचा अती ताण येऊन तब्येतीवर त्याचा परिणाम होतो.

सकारात्मक विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचार हा कामावर आणि अर्थातच तब्येतीवर पण वाईट परिणाम करतात. अर्धा पेला भरलेला आहे ही वृत्ती नेहेमीच पुढे जाण्यास, सक्रिय राहण्यास मदत होते.

अर्धा ग्लास रिकामा आहे ही वृत्ती नेहेमीच निराशा आणि कंटाळ्याला आमंत्रण देते.

आपल्या भोवतालची परिस्थिती जाणून स्वतःमध्ये तसे सकारात्मक बदल घडवून आणा. ज्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाइब्ज येतील आणि नवे, परिस्थिती नुसार केलेले बदल आपल्याला काम करायला नवीन ऊर्जा देतात.

कामासाठी सकारात्मक ऊर्जा कायमच खूप फायदेशीर ठरते.

आपल्या व्यक्तिमत्त्वाला, आपल्या आवडी-निवडीला साजेसे कार्यक्षेत्र निवडा. त्यामुळे काम करण्यात सकारात्मकता येते आणि आनंदाने काम केले तर त्या कामाला झळाळी येते.

 

 

जर आपल्या व्यक्तिमत्त्वाला, तसेच आपल्या मनाविरुद्ध काम असेल तर कामाचा ताण जास्त येतो आणि कार्य पूर्ण करण्यास विलंब होतो, निराशा येते आणि ते काम म्हणावे तसे चांगले होत नाही.

आपला दुपारचा आहार, दुपारचे भोजन कायम संतुलितच हवे. हलके हवे किंवा असे हवे ज्यामुळे आपल्याला सुस्तपणा येणार नाही.

जास्तीचे, जड अन्न ह्यामुळे आळशीपणा, थकवा किंवा मंदपणा ही लक्षणे वाढतात आणि त्याचा कामावर विपरित परिणाम होतो.

आपण जेथे कार्य करतो ती जागा आपल्या मानसिक, शारीरिक प्रकृतीला साजेशी हवी.

 

work from home inmarathi 1
business insider india

 

ह्या गोष्टी आपल्या कार्याला सकारात्मक, भावनिकदृष्ट्या पोषण देतात, ज्याने काम योग्य वेळेत आणि अचूक होण्यास मदत होते.

आपल्या कार्यक्षेत्रात नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांबरोबर काम करण्याचा, वेळ घालवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.

त्याने कामाला वेग येतो तसेच काम अचूक आणि योग्य वेळेत पूर्ण होते. नकारात्मक लोकांमध्ये राहण्यामुळे आपल्याला पण निराशा येते.

कामाचा ताण हलका करण्यासाठी एक छोटा ब्रेक घ्या. शरीराला ताण द्या, मानेचा, हातांचा-पायांचा छोटासा व्यायाम करा. स्नायूंना आराम मिळेल असे काहीतरी करा, ज्यामुळे थकवा जाणवणार नाही आणि काम सहजतेने करता येईल.

 

Office Fitness inmarathi
office fitness classes

 

ह्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी आनंद आणि समाधान तर देतातच पण त्या बरोबरच आपल्या कामाचा ताण कमी होऊन आपल्या कामात समाधानकारक प्रगती होण्यात ह्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?