Site icon InMarathi

बिझनेस + पर्यावरण संवर्धन! ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

Environment friendly उद्योगांना अश्यात बरीच प्रसिद्धी मिळत आहे. अनेक पर्यावरणस्नेही तरुण अश्या उद्योग-संधींच्या शोधात आहेत, ज्याने पर्यावरणपूरक उद्योग उभे करता येतील आणि रोजगार उपलब्धीदेखील होईल.

केनियामध्ये ह्याची सुरुवात थोडी-थोडकी नाही तर १९ वर्षांपूर्वीच झाली आहे. Ocean Sole च्या रूपाने.

 

ही कंपनी १९९९ पासून समुद्रात वाहून गेलेल्या किंवा समुद्रकिनाऱ्यावर पडून असलेल्या चपलांची खेळणी बनवते. खेळणीसुद्धा नाविन्यपूर्ण असते. प्राण्यांचे आकार, pen-top, आकर्षक bracelets, की-चेन्स…असं बरंच काही.

 

 

कंपनीच्या founder, Julie Church म्हणतात की त्यांचं ध्येय लोकांना आवडेल अश्या वस्तू बनवणं हे आहे. लोकांना आधी वस्तू आवडाव्यात – मग त्यांना ह्या वस्तू कश्या बनल्या आहेत हे आवडावं.

म्हणजेच केवळ “कचऱ्यापासून बनवलेल्या वस्तू” म्हणून ह्या वस्तू घेतल्या जाऊ नये – लोकांना खरोखर आवडतील अश्याच वस्तू बनवाव्या असं त्यांचं vision आहे.

 

 

Church आधी WWF साठी marine scientist म्हणून काम करत असताना त्यांना काही मुलं समुद्रकिनाऱ्यावर चपला गोळा करताना दिसली. त्या किनाऱ्यावर इतका कचरा होता की अनेक कासवं पाण्यात जाण्यासाठी अक्षरशः वाट शोधत पुढे सरकत होती.

त्याचवेळी, एकीकडे समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची आणि त्यासोबतच आकर्षक वस्तू बनवण्याची योजना आखली गेली.

WWF ने १५,००० की-चेन्सची ऑर्डर दिली आणि Church ह्यांचा eco-friendly प्रकल्प सुरु झाला.

 

 

४५ कामगाराना रोजगार मिळवून देणारी ही कंपनी अजूनतरी फारसा नफा कमवत नाही. पण नवीन investment मिळाल्याने आता कंपनी मोठी होत आहे. स्वतःचं branding करत आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीची विक्री विक्रमी पटींनी वाढते आहे.

 

 

विशेष म्हणजे, अर्थार्जनातील बहुतांश भाग आपल्याच तयार केलेल्या वस्तूंना डोनेट करण्यात, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात खर्च केला जातो.

कचऱ्यात पडलेल्या चपलांपासून १०० विवीध प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या ह्या कंपनीकडून अनेकांना प्रेरणा मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version