' कोरोनापासून जीव वाचवत हा तरुण २०० कि.मी. चालला, पण व्यर्थ… – InMarathi

कोरोनापासून जीव वाचवत हा तरुण २०० कि.मी. चालला, पण व्यर्थ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चीनमधील वूहानमध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातली सगळीच गणितं बदलली, कित्येक देश लॉकडाऊन झाले, या सगळ्याला आता २ वर्षं होतील, आता लसीकरण मोहीम जगभरातच वेगाने सुरू आहे.

भारत तर लसीकरण मोहिमेत अव्वल नंबरवर आहे. सगळीकडेच आता व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात होत असून, सगळं हळूहळू मार्गी लागतंय असं चित्र बघायला मिळतंय.

कोरोना हा काय पूर्णपणे गेला नाहीये, पण आता सगळ्यांचीच त्याच्याशी दोन हात करायची तयारी झाली आहे.

 

covid vaccine

 

मध्यंतरी झालेल्या लॉकडाउनमुळे साऱ्या जगभरात लोकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं, कित्येकांचे रोजगार कायमचे गेले, हातावर पोट असणाऱ्या लोकांची अवस्था तर फारच बिकट होती.

आता जरी परिस्थिति सुधारत असली तरी हातावर पोट असलेल्या लोकांच्या जीवनात तसा काही फारसा फरक पडलेला नाही. आजही ती लोकं रोजगार मिळवण्यासाठी धडपडत आहेत.

लॉकडाऊनदरम्यान लोकं कित्येक किलोमीटर पायपीट करत आपल्या गावी गेली हे आपण समाजमाध्यमांतून बघितलंच असेल. दुचाकी, चारचाकी कोणतीच वाहने उपलब्ध नाहीत. तरीही घरी जायचंच ही जिद्द! कारण राहून तरी काय करणार शहरात!

गावी आपल्या लोकांमध्ये तरी राहता येईल, शहरात पोटापाण्याचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहेच! कारण सगळंच ठप्प ना!

अनेक लोकं शहर सोडून गावाकडे जाण्यास निघाले होते, कोणतेही वाहन नाही त्यामुळे चक्क पायीच! हो चक्क पायी निघाले हे लोक!

 

lockdown effect inmarathi
aljazeera.com

 

आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, जो गावी आपल्या घरी पायी निघाला होता, रणविर सिंह नाव त्याचं!

दिल्लीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणारा रणवीर सिंह हा हजारो परप्रांतीयांपैकीच एक जो जिवंतपणी नोकरी, निवारा किंवा पैसा न मिळाल्यामुळे आपल्या गावी परत जाण्याच्या प्रयत्नात होता.

हातावर पोट भरणारे मजूर पायीच आपलं घर गाठत होते. मात्र हा पायी चालत जाण्याचा प्रवास ३८ वर्षीय रणवीर सिंगच्या जीवावर बेतला.

 

ranveer singh corona inmarathi
timesofindia.com

दिल्लीत एका जेवणाच्या हॉटेलमध्ये रणवीर काम करायचा. मात्र कोरोनामुळे हे हॉटेल पूर्णपणे बंद झालं.

पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं रणवीरनं मध्यप्रदेशमधील दुर्गम भागातील आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

वाहतूक बंद असल्यानं इतर मजूरांसारखाच तो पायपीट करत घराकडे निघाला. मात्र २०० किलोमीटर चालल्यानंतर दिल्ली- आग्रा महामार्गावरच त्याचा मृत्यू झाला.

 

people return inmararthi
news track english

 

त्याचं गाव या महामार्गापासून १०० किलोमीटर आतमध्ये होतं. रणवीरसोबत प्रवासामध्ये दोघजण होते. घेरी येऊन रस्त्यावर कोसळण्यापूर्वी त्यानं छातीत दुखत असल्याचं सांगितलं होतं.

२०० किलोमीटर चालत आल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार त्यानं केली होती.

म्हणून विश्रांतीसाठी ते तिघंही थांबले मात्र तिथेच रणवीरचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी रणवीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

यात हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

 

corona people inmarathi
amarujala.com

 

रणवीर सिंग राष्ट्रीय राजधानीपासून ३२६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात आपल्या गावी चालला होता.

जेव्हा तो उत्तर प्रदेशातील आग्रा येथे महामार्गावर कोसळला तेव्हा एका स्थानिक दुकानदाराने त्यांना चहा आणि बिस्किटांची ऑफर दिली.

पण लवकरच रणवीर सिंगला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.  मृताच्या कुटूंबाला त्याच्या फोनवरून संपर्क तपशील मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना माहिती दिली आहे.

तो मुरैना येथील अंबाह भागातील रहिवासी होता आणि आपल्या गावापासून १०० किमी दूर होता, अशी माहिती एका पोलिस अधिकार्याने दिली.

कालांतराने या गोष्टी कमी झाल्या, हळूहळू सारा देश अनलॉक झाला, आता लसीकरणसुद्धा जोरात सुरू झाले आहे, पण रणवीरसारख्या काही लोकांचा या सगळ्या खेळखंडोब्यामुळे हकनाक बळी गेला.

 

corona breakdown inmarathi
outlook.com 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?