आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
जानेवारीच्या अखेरीस भारतात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. नंतर पूर्ण फेब्रुवारी महिन्यात त्यात फार वाढ झाली नाही. तरी केंद्र- राज्य सरकारने संसर्गिक रुग्णालयांत कोरोनासाठी विशेष वॉर्डची सोय करणं वगैरे चालू केलं होतं.
या कोविद-१९ विषाणू ची चाचणी घेण्याची सोय केवळ पुण्यातल्या National Institute Of Virology मध्येच होती. मार्च महिन्यात जसे जसे रुग्ण वाढू लागले तसे संपूर्ण देशातून घशातील द्रावाचे नमुने पुण्यातल्या या संस्थेत पाठवले जात होते.
महाराष्ट्राबाहेरील रुग्णांच्या तपासणीला त्याने वेळ लागू लागला. शेवटी भारत सरकारने ६२ ठिकाणी कोरोनाची चाचणी उपलब्ध करून दिलेली आहे.
आता हा विषाणू बाहेरचा आणि त्यातही चीनचा असल्याने त्याच्या त्वरित परीक्षणासाठी सगळ्याच देशांना चीनची मदत घ्यावी लागली आहे.
युरोपातील मध्य- आशियातील सर्व देश कोरोना परीक्षणासाठी चीनहून आयात केलेली टेस्ट किट्स वापरत आहेत.
परंतु नुकतेच तुर्कीच्या सरकारने चीन बनावटीचे टेस्ट किट्स रद्द केलेत. त्यांना कोरोना परिक्षणाची ही उपकरणं बनावट निकाल देत असल्याचे आढळून आलं.
तुर्कीचे अधिकारी मीडियाशी बोलतांना म्हणाले, “आम्ही चीन मधल्या एका कंपनी कडून टेस्ट किट्स मागवली होती परंतु त्यांची चाचणी घेतल्यावर लक्षात आलं की ते चुकीचे परीक्षण देत आहेत.
पण आमच्या जवळ दुसरा मार्ग नसल्याने मग आम्ही त्या कंपनीची ऑर्डर रद्द केली आणि दुसऱ्या चायनीज कंपनीला कंत्राट दिलं आहे.”
हा प्रकार या एकाच देशापुरता मार्यदित नाही. इटली नंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या स्पेनने सुद्धा चीन बनावटीच्या चाचणी यंत्राची तक्रार केली आहे.
त्यांना असं दिसून आलं की, चीनच्या एका कंपनी कडून घेतलेली ही टेस्ट किट्स केवळ ३०% विषाणू संसर्ग दाखवतात!
स्पेन मधल्या सूक्ष्म जीवशास्त्र तज्ञानुसार या प्रकारच्या चाचणी साठी ८०% पर्यंत इन्फ्लुएन्झा चे विषाणू दाखवायला पाहिजे! झेक रिपब्लिक आणि जॉर्जिया ने सुद्धा अशाच प्रकारचा आरोप केला आहे.
झेक रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोविद-१९ च्या जलद चाचणी संचांपैकी जवळपास ८०% संच हे बोगस आढळून आलेले आहेत!
महत्वाची गोष्ट म्हणजे हवाई वाहतूक बंद असल्याने झेकने हे टेस्ट किट्स चीन मधून ‘एअर लिफ्ट ‘ करून देशात आणले होते.
या सर्वांवर चिनी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आश्चर्य वाटावी अशी आहे ते म्हणतात,
“माद्रिद ला टेस्ट किट्स पाठवणाऱ्या जीववैद्यकशास्त्रीय कंपन्या या चायना सरकारने कोरोना संबंधित मेडिकल उपकरणे पुरवणाऱ्या अधिकृत कंपन्यांच्या यादीतील नाहीत!
त्या कंपन्यांकडे चीन सरकारचा अधिकृत परवाना सुद्धा नाही” पण प्रश्न हा आहे की, अनधिकृत कंपन्यांचे टेस्ट किट्स चीन बाहेर गेलेच कसे?
जर ह्या कंपन्यांना परवाने नव्हते तर आयात- निर्यात कायद्यानुसार चीन मधूनच त्याची निर्यात व्हायलाच नको होती!
माद्रिद मधील चीन एम्बसी मधील अधिकाऱ्यांनी चीन सरकारचा परवाना असलेल्या कंपन्यांची यादी सरकारला सादर केली.
सध्याच्या घडीला १०० पेक्षा जास्त चीनी कंपन्या कोरोना टेस्ट किट्स ची निर्मिती करून ते युरोपीय देशात पाठवत आहे पण त्यातील बहुतांश कंपन्यांकडे चीन सरकारचेच परवाने नव्हते!
जागतिक स्तरावर वाढलेल्या मागणीने पुरवठ्यावर ताण येणं साहजिक आहे.त्यामुळे अगदी तंतोतंत मापनाचं पालन करणारी किट्स कमी वेळात बनवण कठीण झालंय.
या सर्व पार्श्वभूमीवर भारताने तपासणी केंद्रे वाढवली आहेत पण आपण ही जलद चाचणी करता Made-in-China टेस्ट किट्स वरच अवलंबून आहोत.
नुकतंच पुण्याच्या मायलॅब फर्मने नवीन किट तयार केला आहे.
केंद्र सरकारने याबाबतीत खरोखर सावध असणं जरुरी आहे कारण स्पेन आणि झेक देशांच्या सरकारांनुसार त्यांच्या देशात आणलेली टेस्ट किट्स ही चीन मधल्या व्यक्तींनीच तपासणी करून पाठवली होती आणि तेथील संस्थाना या बाबतीत माहिती होती.
कोरोना आता जगातल्या सर्वच देशात पसरला आहे आणि सर्वच राष्ट्रांना लवकर निदान करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.
कारण एकदा चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुद्धा जलदपणे अलग करण्याची आवश्यकता असते.
आता हा चीन मध्ये उत्पन्न झालेला विषाणू असल्याने सर्वच देश चीन कडून ही किट्स मागवत आहेत. WHO ने आत या संदर्भात काही तत्वे नेमून दिली होती.
सध्याच्या घडीला चीन सरकारच अधिकृतरित्या या टेस्ट किट चा पुरवठा बाकी जगाला करतो आहे आणि त्यांच्या अनुसार या टेस्ट किट्स मध्ये WHO च्या सर्व मार्गदर्शक तत्वांच पालन केलं गेलं आहे.
काही महिन्यांपुर्वी दोन खासगी कंपन्या त्यातील पहिली भारतीय कंपनी My Lab आणि दुसरी जर्मन कंपनी Altona Dignostic ला भारत सरकारला टेस्ट किट्स बनवण्याचं कंत्राट दिलेलं आहे.
जलद चाचणी संचांसाठी सरकारने १२ टेस्ट किट्स ला परवानगी दिली आहे त्यातील ७ हे चीनी कंपन्यांचे आहेत.
कोविद-१९ ची चाचणी हा रुग्णाच्या जीवनाचा प्रश्न आहे. भारतीय बाजारात चायना माल बिनटिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहेच त्यात आता या टेस्ट किट्स ची भर नको पडायला.
अर्थात दिलासादायक बाब म्हणजे भारतीय टेस्ट किट शोधण्यात आली आहे. पण त्याचे जलद उत्पादन करण्यावर सुद्धा वेळेच्या मर्यादा आहेतच.
सध्याही मोठ्या प्रमाणावर भारतीय किट्सना पसंती दिली जात असल्याचे दिसते.
तेव्हा या स्वस्त चिनी माला पेक्षा आपल्या देशातील संशोधनाला बळ देण्याची गरज आहे. जेणेकरून विश्वासू आणि टिकाऊ परीक्षण- उपाय उपलब्ध होतील.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.