' घरून काम करताय? या १३ गोष्टींचं पालन केलं तर बॉस १००% खुश होईल! – InMarathi

घरून काम करताय? या १३ गोष्टींचं पालन केलं तर बॉस १००% खुश होईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाला रोखण्यासाठी सुरु झालेल्या लॉकडाऊन आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाली असली, तर जनजीवन अद्याप पुर्ववत झालेलं नाही.

अनेक ऑफिसेसचे कर्मचारी घरातच अडकून पडले आहेत.

अर्थात हे सर्व आपल्याच भल्यासाठी आहे कारण, कोविद-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणं हा एक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.

सगळं जग जरी घरी बसलेलं असलं तर आपल्यापैकी बरेच जण घरून काम करत असतील. सध्या बऱ्याच कार्यालयातून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिलेली आहे.

त्यासाठी आवश्यक असणारी साधने जस की, लॅपटॉप, इंटरनेट साठी राऊटर वैगेरे सुद्धा तुम्हाला देण्यात आला असेलच. तुम्ही जर यापूर्वी घरून काम केलेलं नसेल तर आता तुम्ही नक्कीच खूप खुश असाल.

सकाळी लवकर उठण्याचं टेन्शन नाही. ऑफिस मध्ये जाण्यासाठी लोकल, बस पकडण्याची घाई किंवा गर्दीतून भरलेल्या रस्त्यातून बाईक पुढे रेटण्याची चढाओढ नाही.

सगळं कसं निवांत, आपणच आपले बॉस!अगदी एखाद्या स्वप्नाची पूर्तता झाल्यागत वाटत असेल!

 

work from home inmarathi 2
womens web

 

हे जरी खरं असलं तरी तुम्हाला काम तर करावं लागणारच आहे. फरक असणार तो म्हणजे, तुमची ऑफिस ला ये-जा करण्यात होणारी दमछाक वाचेल कारण काम करण्याची जागा बदलून घरातच झालेली आहे.

जेव्हा तुमची कंपनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला घरून काम करण्याची मुभा देते तेव्हा तुम्ही नक्कीच त्या विश्वासाला सार्थ ठरवलं पाहिजे.

जर तुम्ही घरून काम करण्यास सुरुवात केली असेल तर तुम्हाला हे नक्की जाणवलं असेल की ही वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नक्कीच नाही.

 

work from home inmarathi 4

 

घरातून काम करताना आपलं लक्ष इतरत्र वेधलं जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात. आजूबाजूला घरातली बरीच पेंडिंग कामं दिसू लागतात आणि मग घरची आणि ऑफिस ची कामं यांची सांगड घालताना अजून गोंधळ वाढू शकतो.

त्यामुळे वर्क फ्रॉम होम म्हणजे सुट्टी नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला महिन्याकाठी पैसे कमावण्यासाठी काम करणं गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

अर्थात घरून काम करण्याने तुम्हाला बरीच मोकळीक सुद्धा मिळणार आहेच जसं की येण्या- जाण्याची कटकट नाही. तुम्हाला हवे ते कपडे घालून, अगदी पायजमा घालून ही तुम्ही काम करू शकता!

प्रवासाच्या वाचलेल्या वेळात घरची काम करू शकता. कामाचे तास तुमच्या सोयी प्रमाणे ठरवू शकता. पण तरीही तुम्हाला काम आहे ह्याची जाणीव ठेवण महत्वाचं आहेच.

चला तर पाहूया काही छोट्या गोष्टी, ज्या अमलात आणून तुम्ही वर्क फ्रॉम होम उत्तम प्रकारे करू शकता.

कामाचं वेळापत्रक ठरवून घ्या 

 

work from home inmarathi

 

तुम्ही जरी घरून काम करणार आहात आणि तुमच्यावर देखरेख ठेण्यासाठी जरी कोणीही नसलं तरी ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करायचा प्रयत्न करा.

एक ठराविक वेळापत्रक बनवून घ्या, ज्यायोगे तुम्हाला घरच्या आणि ऑफिस च्या कामाची घरबसल्या उत्तमपणे सांगड घालता येईल. समजा तुमचं लहान मूल असेल तर ते झोपलेलं असताना आपलं ऑफिसच काम उरकून घ्या.

कामाचं वेळापत्रक ठरवताना खालील गोष्टी विचारात घेता येऊ शकतील.
– काम सुरू करण्याची वेळ
– जेवणाची सुट्टी
– काम थांबवण्याची वेळ
– या दरम्यान लागणारे ब्रेक्स जसं की, चहा वगैरे.

तुम्हाला जरी घरून कामाची मुभा असली तरी दिवसातले काही तास ऑफिस कामासाठीच ठेवणं चांगलं.

कदाचित बऱ्याच जणांना रात्री उशिरा काम केलेलं चालतं किंवा सकाळी लवकर उठून दुपार पर्यंत काम उरकणारी सुद्धा लोकं आहेत!

तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या कामाच्या वेळेची आखणी करून घ्या आणि तुमच्या सहकार्यांना सुद्धा त्याबाबत अवगत करून ठेवा.

काम करण्याची जागा ठरवून घ्या

 

work from home inmarathi 1
business insider india

 

वरकरणी क्षुल्लक वाटणारी ही गोष्ट मोठा परिणाम घडवू शकते. कामाच्या वेळापत्रकाइतकंच जागा ठरवणं सुद्धा महत्वाचं आहे.

समजा तुम्ही बैठकीत लॅपटॉप घेऊन कामासाठी बसलात आणि बाकी कोणाला टीव्ही पाहायचा असेल तर तुमचं लक्ष सहज विचलित होऊ शकतं आणि मग त्याचा परिणाम कामाचं शेड्युल बिघडण्यावर पण होईल.

घरातली कुठली ही जागा मग ती बेडरूम असेल किंवा डायनिंग अथवा बैठकीची खोली, स्वतःचा असा एक कोपरा नेमून घ्या.अर्थात तिथे तुम्हाला इंटरनेट सुलभपणे मिळेल याची खबरदारी घ्याच.

घरातल्या इतरांना सुद्धा तुम्ही कुठे बसून काम करताय ते कळेल, म्हणजे ते वारंवार त्या भागात येण्याचं टाळू शकतील.

अर्थात तुमच्या काम करण्याच्या जागेला अगदी ऑफिस बनवण्याची आवश्यकता नाही, पण जिथून तुमचं लक्ष विचलित होणार नाही आणि तुम्ही आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल अशी जागा निवडा.

 

दररोज व्यायाम करा 

 

malaika arora khan inmarathi

 

तुम्हाला हे वाचून नवल वाटलं असेल. व्यायाम करण्याचा आणि ‘वर्क फ्रॉम होम’ चा काय संबंध? पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कंपनीत जाऊन काम करता तेव्हा तुमच्या शरीराची बरीच हालचाल होत असते.

जेवण, चहा साठी कँटीन मध्ये जाणं, मिटिंग्स साठी दुसऱ्या मजल्यांवर जाणं वगैरे, पण घरून काम करताना बराच वेळ एकाच जागेवर बसण्याची शक्यता असते.

त्यामुळे शरीराला सुस्ती किंवा मरगळ येणं स्वाभाविक आहे. शारीरिक हालचाल मंदावल्याने येणारं जडत्व तुमच्या कामावरच लक्ष उडवू शकतं.

हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा. बाहेर फिरायला जाणं तर आता शक्य नाही तेव्हा घरीच सोपे व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार, योगासनं किंवा घरातल्या गच्चीवर फिरा.

लक्षात ठेवा शारीरिक हालचाल ही शरीराच्या आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

 

सहकाऱ्यांशी कनेक्टेड रहा

 

work from home inmarathi 3
the balance career

 

घरून काम करतांना सुद्धा आपल्या कामावर जर इतरांचं काम अवलंबून असेल तर त्यासाठी सर्व टीम सोबत संपर्कात रहा.

तुम्ही जर सॉफ्टवेअर विकसक असाल तर तुमचा कोड वेळीच repository मधे check-in करणं लक्षात ठेवा.

किंवा जर तुम्ही अकाउंट्स च काम पाहत असाल तर तुमचे ऑडिट रिपोर्ट्स, एक्सेल फाइल्स तुमच्या टीम ला ई-मेल करत जा जेणेकरून त्यांच्या कामात सुलभता येऊ शकेल.

कामादरम्यान जर तुम्हाला काही वेळ घरचं काम करायचं असेल तर तुमच्या सहकाऱ्यांना त्याची कल्पना देऊन ठेवा की, तुम्ही अमुक इतका वेळ ऑनलाइन नसाल.

शक्य असल्यास तुमच्या ऑफिस communicator किंवा skype वर अॅक्टिव्ह रहा. दिवसातून संपूर्ण टीम सोबत कामाच्या प्रगती संबंधी एखादा कॉल नक्की ठेवा.

ज्यायोगे तुम्हाला असलेल्या कामाविषयी शंका दूर होऊ शकतील आणि तुम्ही करत असलेल्या कामाची माहिती तुमच्या क्लायंटला मिळेल.

 

लक्ष विचलित करणारे घटक टाळा

वर सांगितल्याप्रमाणे काम करतांना जर आपलं दुर्लक्ष झालं तर कामाच्या वेळापत्रकाचा बट्याबोळ होऊ शकतो.

सध्या कोरोना मुळे बाहेर काय चालू आहे या संबंधीच्या उत्सुकतेपोटी तुम्हाला सहज टीव्ही पाहण्याचा किंवा फेसबुक वर फेरफटका मारण्याचा मोह होऊ शकतो.

 

social media platforms inmarathi
ad week

 

बाहेरील जगाच्या बातम्या घेणं महत्वाचं आहे, पण तुम्ही त्यासाठी एक वेळ ठरवून घ्या किंवा कामादारम्यान च्या ब्रेक मध्ये बातम्या पहा.

पण जेव्हा तुम्ही पूर्णतः काम करत असाल तेव्हा सोशल मीडिया, टीव्ही सारख्या विचलित करणाऱ्या गोष्टीपासून लांबच रहा.

 

लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका

ऑफिस काम करताना समजा घरच्यांनी पटकन होणारं काही काम सांगितलं तर ते जरूर करा पण उगीच तासंतास त्या कामाच्या निमित्ताने ऑफिसच्या कामाला टांग देऊ नका.

 

work from home inmarathi
Malayala Manorama

 

घरी, आई बबड्याला दूध आणायला सांगते आणि बबड्या दूध आणण्याच्या बहाण्याने कोरोना संचारबंदी कशी असते ते पाहत बसतो! कृपया असं करू नका त्याने तुम्हाला रोगाची लागण होऊ शकते. 

बऱ्याच वेळ ऑनलाइन नसल्याने तुमच्या बॉस समोर तुमचं इंप्रेशन सुद्धा खराब होऊ शकतं.

 

छोटे ब्रेक्स जरूर घ्या

 

indian people video call inmarathi
freepik

 

सतत एका जागी बसून कंटाळा येणं साहजिक आहे त्यामुळे ठराविक अंतराने कामादारम्यान थोडी विश्रांती जरूर घ्या.

उदा, ५० मिनिटे काम केलं तर १० मिनिटांची विश्रांती जरूर घ्या.

बऱ्याचदा काम करताना अडकल्यासारखं वाटतं किंवा आता काय निर्णय घ्यावा हे कळत नाही त्या वेळेस ब्रेक जरूर घ्या.

या दरम्यान तुमचं आवडतं गाणं ऐका किंवा बातम्या ऐका. घरच्यांशी गप्पा मारा. यामुळे तुमच्या मनाची मरगळ दूर व्हायला मदत होईल.

 

कामासाठी उपयोगी सॉफ्टवेअर किंवा अँप्स वापरा

 

laptop 2 inmarathi

 

घरून काम करताना तुमच्या ऑफिस कामासाठी तुम्हाला वेगवेगळे अँप्स उपयोगी ठरू शकतात. जसं की, skype, hangout.

तुमच्या कामाच्या आखणीसाठी गूगल- कॅलेंडर किंवा फोन reminder ची मदत घेऊ शकता. तुम्हाला नियमित लागणाऱ्या अँप्लिकेशनचा तुम्हाला घरून ऍक्सेस आहे याची अगोदरच खात्री करून घ्या.

 

वर्क फ्रॉम होम बद्दल घरच्यांना कल्पना द्या

 

laptop working inmarathi
shutterstock

 

तुम्ही घरून काम करताय म्हणजे तुम्ही सुट्टीवर नाही हे घरच्यांना समजावून सांगा. ऑफिसच्या कामासाठी तुम्ही जबाबदार आहात ह्याची घरच्यांना स्पष्ट कल्पना द्या.

तुमच्या कामादरम्यान तुम्ही कुठल्या वेळी खूप व्यस्त असणार आहात, कधी कॉल किंवा मिटिंग्स मध्ये असणार आहात हे घरच्यांना सांगून ठेवा जेणे करून ते तुम्हाला त्या वेळेत डिस्टर्ब करणार नाहीत.

 

गरजेच्या गोष्टी मागा

 

leat night work in laptop InMarathi

 

ऑफिस कामासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुमच्या कंपनी ने तुम्हाला पुरवणे अपेक्षित आहे.

तुम्ही घरून काम करताय हा काय तुमचा स्वयंरोजगार नाही. तेव्हा अतिरिक्त साधने जी कामासाठी आवश्यक आहेत त्यांची मागणी जरूर करा.

समजा तुम्हाला लॅपटॉप देण्यात आलाय पण इंटरनेट जोडणी साठी राऊटर किंवा डोंगल दिलं नसेल तर त्याची तुम्ही मागणी करू शकता. जर तुमचं काम कागदपत्रांवर जास्त असेल तर आवश्यक असलेली स्टेशनरी मागण्यास लाजू नका.

 

आजारी असल्यास सुटी घ्या

 

unwell woman inmarathi
the right moves

 

समजा तुम्ही आजारी असाल तर रीतसर सुटी घ्या आणि आराम करा. ‘घरूनच तर काम करतोय/करतेय त्यात काय सुटी घ्यायची?’ असा attitude ठेवू नका.

तुम्ही सुट्टीवर आहात, हे सकाळीच तुमच्या टीम, क्लायंट किंवा व्यवस्थापकाला नक्की कळवा.

 

वर्क फ्रॉम होम चा पूर्ण आनंद घ्या

 

family inmarathi
childandfamilymentalhealth.com

 

नोकरीत काम तर करावंच लागणार आहे. घरून काम करत असताना दिलेलं काम मनापासून पूर्ण करा. तुम्ही घरच्यांच्या सोबत राहून काम करू शकता याबद्दल आनंदी रहा.

आपल्या लोकांसोबत काम करताना पूर्ण क्षमतेने काम करून आपल्या कर्तव्याची पूर्ती करा. त्याचबरोबर आपली आणि आपल्या घरच्यांची पूर्ण काळजी घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?