' कोरोनासारख्या कित्येक गंभीर आजारांत लाखोंचा जीव वाचणाऱ्या या खास यंत्राबद्दल नक्की वाचा – InMarathi

कोरोनासारख्या कित्येक गंभीर आजारांत लाखोंचा जीव वाचणाऱ्या या खास यंत्राबद्दल नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या जगभरातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी यामध्ये मोलाचा हातभार व्हेंटिलेटर लावत आहे.

कित्येक ठिकाणी व्हेंटिलेटर्सना अधिक मागणी आहे. केवळ कोरोनाच नाही तर कोणत्याही रोगामध्ये जीव वाचविण्यासाठी मोलाचा हातभार हे व्हेंटिलेटर लावतात.

मात्र काय आहे हे यंत्र, त्याचा वापर नेमका कसा केला जातो, सध्या मर्यादित प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत का, याचाच मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केला आहे.

 

ventilator inmarathi 1
health

 

व्हेंटिलेटर हे वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचे उपकरण आहे, जेव्हा रुग्ण श्वास घेण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा त्याला व्हेंटिलेटर वर ठेवले जाते, यावेळी केवळ ऑक्सिजन वायू मिळत असल्याने रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत नाही.

व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजन वायू असलेले उपकरण होय, या व्हेंटिलेटर ला ऑक्सिजन वायूचे एक सिलेंडर जोडलेले असते. पेशंटला काही मिनिटांपासून ते अगदी तीन ते चार आठवडेसुद्धा व्हेंटिलेटरवर ठेवता येऊ शकते.

यालाच ब्रिदिंग मशिन किंवा रेस्पिरेटर असंही म्हणतात. याद्वारे पेशंटला श्वास घेण्यासाठी मदत मिळते.

काही वेळा पेशंट जर गंभीर अवस्थेत असेल तर त्याला ३० मिनिटाच्या आत व्हेंटिलेटर प्रणाली वर ठेवणे आवश्यक असते.

पेशंटच्या वैद्यकीय स्थितीनुसार आढावा घेऊन कोणत्या प्रकारचे व्हेंटिलेशन पेशंटला द्यावे याचा निर्णय डॉक्टर घेतात.

 

ventilator inmarathi
washington post

 

त्याचबरोबर किती काळ व्हेंटिलेटर असेल, त्यानुसार मिनिटाला श्वासाचा दर काय असेल हे ठरवले जाते. काही वेळा पेशंटला या अवस्थेमध्ये काहीही खाता पिता येत नाही.

त्यामुळे सलाईन किंवा आयव्हीद्वारे जीवनसत्वे आणि आवश्यक घटक पेशंटला दिले जातात.

कोरोनाविरुद्ध व्हेंटिलेटर महत्त्वाचा

कोरोना व्हायरसचा सामना करत असताना व्हेंटिलेटरला जगतभरात महत्त्व आले आहे.

या व्हायरसमुळे श्वसनावर परिणाम होतो तसेच फुफ्फुसांवर सुद्धा परिणाम होतो त्यामुळे या परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटरचा वापर मोलाचा ठरतो. 

अर्थात व्हेंटिलेटरद्वारे कोरोना बरा होत नसला तरीही रुग्णाला श्वसनासाठी मदत यामुळे होते.

 

ventilator inmarathi 2
NBC news

 

फुफ्फुसांचे कार्य नियमित होईपर्यंत आणि उपचार सुरू असेपर्यंत व्हेंटिलेटरचा आधार देऊन श्वसनक्रिया सुरू ठेवता येते. त्यामुळे कोरोनाच्या उपचारामध्ये जगभरात याचा वापर केला जात आहे.

श्वसनाचे कार्य नियमित सुरू झाले की, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद केली जाते. श्वसनाचा वेग, त्यातील बारकावे याचा अभ्यास करून डॉक्टर याबाबतचा निर्णय घेतात.

श्वसनक्रिया काही प्रमाणात नियंत्रणात आली की व्हेंटिलेटर प्रणाली केवळ सपोर्टसाठी ठेऊन श्वसनक्रियेवर लक्ष ठेवले जाते. त्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित श्वसन सुरू झाले की व्हेंटिलेटर काढला जातो.

जगभरात व्हेंटिलेटरची कमतरता

जगभरात व्हेंटिलेटरचा वापर वाढत असल्याने सध्याच्या घडीला व्हेंटिलेटरची कमतरता सगळीकडे जाणवत आहे. कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे व्हेंटिलेटरला जगभरात मागणी वाढत आहे.

 

ventilator inmarathi 4
bbc

 

केवळ भारतच नाही तर ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी सर्वच ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे. श्वसनाला अडचण आली आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसतील तर पेशंटच्या मृत्यूचा धोका आहे.

वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी यावर उपाय म्हणून मशिन्सच्या निर्मितीसाठी तयारी दर्शवली आहे मात्र सध्याच्या घडीला मागणी जास्त आहे.

इटलीने ४००० व्हेंटिलेटर्सची ऑर्डर दिली, पण फक्त ४०० व्हेंटिलेटर्स मिळू शकले.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इटली सरकारने २५ टक्के सरकारी इंजिनीअर व्हेंटिलेटर निर्मितीसाठी पाठवले आहेत. १५० व्हेंटिलेटर प्रति आठवडा तयार केले जात आहेत.

न्यूयॉर्क शहरामध्येच जवळपास १५००० व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे. त्यामुळे जगभरातल्या मागणीचा अंदाज येऊ शकतो.

अमेरिकेत सध्या १ लाख ६० हजार व्हेंटिलेटर आहेत आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी राखून ठेवलेल्या व्हेंटिलेटरची संख्या १२७०० आहे. पण करोनाबाधितांचा आकडा असाच वाढत गेला तर हे पुरेसं नसेल. 

भारतातही हीच समस्या दिसते, देशात जे व्हेंटिलेटर्स बनवले जातात त्यांचे पार्ट्स चीनमधून येतात. यामुळे व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात अडचणी येत आहेत.

 

ventilator inmarathi 5
financial times

 

सरकारने आवश्यक वैद्यकीय उपकरणांवरील आयातीस बंदी घातली आहे. कंपन्यांना व्हेंटिलेटर्सचे उत्पादन वाढवायला सांगितले आहे.

युकेमध्येही F1 व्हेंटिलेटर्स निर्मितीसाठी मदत करत आहे. व्हेंटिलेटरच्या उत्पादनासाठी एकूण तीन गट बनवण्यात आले आहेत.

२० मार्च रोजी फॉर्म्युला वनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात यूकेमधील टीम्स व्हेंटिलेटर प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फॉर्म्युला वनच्या सर्व टीम्समध्ये बेस्ट डिझायनर आहेत. उच्च दर्जाचे मशीन बनवण्याची त्यांची क्षमता आहे. F1 च्या सात टीम्सनी व्हेंटिलेटरचे डिझाइन आणि चाचणीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

या टीम्समध्ये तज्ञ इंजिनिअर्सचा भरणा आहे. करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी वाहन कंपन्यांकडे मदत मागणारा यू.के एकमेव देश नाही.

अमेरिकेतही फोर्ड मोटर, जनरल मोटर्स या कंपन्यांची श्वसनासंबंधीच्या उपकरणाच्या निर्मितीला गती दिली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये प्राण्यांवर वापरण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरचा वापर माणसांसाठी करता येऊ शकेल यावर तेथील वैद्यकीय संस्था आणि वैज्ञानिक अभ्यास करत आहेत.

 

ventilator inmarathi 3

 

याचबरोबर अनेस्थेशिया मशिन्स तसेच रुग्णवाहिकेमधील मशिन्सचा पर्यायसुद्धा त्यांच्यासमोर आहे. मात्र जर रुग्णांचा आकडा वाढला तर परिस्थिती गंभीर होऊ शकेल.

एकंदरच कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आणणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळेच ही समस्या नियंत्रणात येऊ शकेल.

यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन केले पाहिजे असा सल्ला डॉक्टर देतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?